तक्रार निवारण
Grievance Redressal
Last updated 31 October 2026
Read in English ↓मराठी कोशावर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही मजकुराबद्दल तक्रार कशी करावी, ती कोण पाहतो आणि किती वेळात निकाली निघते — हे या पानावर दिले आहे. माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल माध्यम आचारसंहिता) नियम, २०२१ च्या नियम ३(२) अन्वये हे प्रसिद्ध केले आहे.
हे संकेतस्थळ Brahmo Productions LLP (WhatsUp Media या नावाने कार्यरत), जे whatsupmarathi.com आणि मराठी कोश (marathikosh.whatsupmarathi.com) चालवतात, यांचे आहे.
1.तक्रार निवारण अधिकारी
- Entity
- Brahmo Productions LLP
whatsupmarathi.com आणि मराठी कोश — दोन्हींच्या तक्रारी याच पत्त्यावर पाहिल्या जातात.
2.कशाबद्दल तक्रार करता येते
- नोंदीतील चुकीची माहिती, किंवा चुकीच्या स्रोतावरून दिलेला पाठ
- तुमच्या प्रताधिकाराचा किंवा अन्य बौद्धिक संपदेचा भंग होतो असे वाटणारा मजकूर
- श्रेय न देता किंवा परवान्याबाहेर वापरलेले चित्र
- बदनामीकारक वाटणारा, किंवा धार्मिक भावना दुखावणारा मजकूर
- तुमच्याविषयी किंवा तुम्ही प्रतिनिधित्व करत असलेल्या व्यक्तीविषयी असलेली चुकीची वा खासगीपणात घुसणारी नोंद
- वैयक्तिक माहिती पाहण्याची, दुरुस्त करण्याची वा काढून टाकण्याची विनंती
- अन्य काहीही जे बेकायदेशीर आहे किंवा आमच्या अटींचा भंग करते
3.तक्रारीत काय असावे
पुढील गोष्टी असल्या की तक्रारीवर लवकर कार्यवाही होते:
- ज्या पानाविषयी लिहीत आहात त्याचा नेमका पत्ता (URL)
- नेमके काय चुकले आहे — शक्य असल्यास तो मजकूर उद्धृत करून
- तुम्हाला काय अपेक्षित आहे — दुरुस्ती, श्रेय, की मजकूर काढून टाकणे
- हक्काचा दावा असल्यास तो शाबित होईल इतका तपशील
- तुमचे नाव आणि उत्तरासाठी संपर्काचा पत्ता
4.किती वेळ लागतो
- तक्रार मिळाल्यापासून 24 तासांत पोच दिली जाते.
- 15 दिवसांत निकाल, घेतलेल्या निर्णयाच्या कारणांसह.
- उघड चुका यापेक्षा खूप आधी, बहुधा त्याच दिवशी दुरुस्त होतात.
हक्काच्या दाव्यासारखी एखादी गोष्ट तपासावी लागणार असेल, तर तसे कळवले जाते आणि प्रगती सांगत राहिली जाते — मुदत नुसती संपू दिली जात नाही.
5.तपासणीदरम्यान मजकूर बाजूला ठेवणे
तक्रारीतून लगेच निकाली न निघणारा गंभीर प्रश्न उभा राहिला, तर संबंधित नोंद तपासणी होईपर्यंत वाचकांसमोरून काढून ठेवली जाऊ शकते. ती खबरदारी असते, निर्णय नव्हे; तक्रार टिकली नाही तर नोंद पुन्हा प्रसिद्ध होते.
6.न्यायालयीन व शासकीय आदेश
सक्षम न्यायालयाचा किंवा योग्य त्या शासकीय प्राधिकरणाचा वैध आदेश मिळाल्यास, त्यात दिलेल्या मुदतीत मजकूर काढून टाकला जाईल किंवा बंद केला जाईल.
7.समाधान न झाल्यास
आमच्या उत्तराने प्रश्न सुटला नाही, तर कायद्याने तुम्हाला उपलब्ध असलेले सर्व मार्ग तुमच्यासाठी खुले राहतात. वैयक्तिक माहितीसंबंधी तक्रारींसाठी, डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण अधिनियम, २०२३ अंतर्गत भारतीय माहिती संरक्षण मंडळ कार्यरत झाल्यावर तिथेही दाद मागता येईल.
Grievance Redressal
The English and Marathi texts carry the same meaning. Where a reading genuinely differs, this English version governs, as it is the one that matches WhatsUp Marathi’s own policies.
This page explains how to raise a complaint about anything published on Marathi Kosh, who deals with it, and how long it takes. It is published under Rule 3(2) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.
This site is operated by Brahmo Productions LLP, operating as WhatsUp Media, which publishes WhatsUp Marathi (whatsupmarathi.com) and Marathi Kosh (marathikosh.whatsupmarathi.com).
1.Grievance Officer
- Entity
- Brahmo Productions LLP
The same address handles grievances for WhatsUp Marathi and Marathi Kosh.
2.What you can complain about
- A factual error in an entry, or a text set against the wrong source
- Content you believe infringes your copyright or other intellectual property
- An image used without proper credit or outside its licence
- Material you consider defamatory, or offensive to religious sentiment
- An entry about you or a person you represent that is inaccurate or intrusive
- A request to access, correct or erase personal data, or a privacy concern
- Anything else you believe is unlawful or in breach of our terms
3.What to include
A complaint is easier to act on quickly when it carries:
- The exact page address (URL) you are writing about
- What specifically is wrong, quoting the passage where possible
- What outcome you are asking for — correction, credit, removal
- If you are claiming rights in the material, enough detail to establish them
- Your name and a contact address for our reply
4.How long it takes
- Acknowledgement within 24 hours of receiving your complaint.
- Resolution within 15 days of receipt, with reasons for the decision taken.
- Clear factual errors are usually corrected far sooner than that, often the same day.
Where a claim needs to be verified — a rights claim, for instance — we will say so and keep you informed rather than letting the clock run out silently.
5.Content withheld pending review
Where a complaint raises a serious question that cannot be settled immediately, the entry concerned may be withheld from public view while it is examined. That is a precaution, not a finding, and the entry is restored if the complaint is not made out.
6.Court and government orders
Content will be removed or disabled on receipt of a valid order from a court of competent jurisdiction or an appropriate government authority, within the time that order allows.
7.If you are not satisfied
If our response does not resolve the matter, you retain every remedy otherwise available to you in law. For complaints concerning personal data, you may also approach the Data Protection Board of India once it is constituted and functioning under the Digital Personal Data Protection Act, 2023.
तक्रार, दुरुस्ती किंवा संपर्क
या संकेतस्थळाविषयी काहीही — चुकीची नोंद, हक्कांचा प्रश्न, मजकूर काढून टाकण्याची विनंती किंवा तक्रार — यासाठी एकच पत्ता.
Grievances, corrections, rights questions and takedown requests — one address for all of it.
admin@whatsupmarathi.com