गोपनीयता धोरण
Privacy Policy
Last updated 31 October 2026
Read in English ↓marathikosh.whatsupmarathi.com हे Brahmo Productions LLP (WhatsUp Media या नावाने कार्यरत), जे whatsupmarathi.com आणि मराठी कोश (marathikosh.whatsupmarathi.com) चालवतात, यांचे संकेतस्थळ आहे. डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण अधिनियम, २०२३ च्या अर्थाने या संकेतस्थळासाठी Brahmo Productions LLP हे माहिती विश्वस्त (Data Fiduciary) आहेत.
कोश वाचण्यासाठी खाते, नोंदणी किंवा कोणताही अर्ज लागत नाही. त्यामुळे तुमच्याकडून मागितली जाणारी वैयक्तिक माहिती शून्य आहे. तरीही जे काही आपोआप गोळा होते ते नेमके काय, ते कोण हाताळते, आणि त्याबद्दल तुम्ही काय करू शकता — हे खाली दिले आहे.
डीपीडीपी कायदा आणि त्याचे २०२५ चे नियम 13 May 2027 रोजी लागू होण्याआधीच, त्या दर्जाचे हे धोरण लिहिले आहे. WhatsUp Marathi चे मुख्य Privacy Policy संपूर्ण समूहाला — त्यांच्या अर्जांसह आणि स्पर्धांसह — लागू आहे; हे पान फक्त कोशाबद्दल.
1.आम्ही कोण आणि संपर्क कसा
- Data Fiduciary
- Brahmo Productions LLP
2.आम्ही काय गोळा करत नाही
- नाव, ई-मेल, फोन क्रमांक किंवा पत्ता — या संकेतस्थळावर कधीच मागितले जात नाहीत.
- खाते, लॉगिन किंवा पासवर्ड नाही.
- अर्ज, स्पर्धा, लेखन पाठवणे किंवा नोंदणी काहीही नाही.
- जाहिराती नाहीत, त्यामुळे जाहिरातींच्या किंवा पाठलाग करणाऱ्या कुकीजही नाहीत.
- पैशाचे व्यवहार नाहीत, आणि कोणतीही आर्थिक माहिती नाही.
- कोणाचीही वैयक्तिक माहिती आम्ही विकत नाही, भाड्याने देत नाही किंवा कोणत्याही कारणासाठी वाटत नाही.
3.काय गोळा होते आणि कशासाठी
कायदा मागतो त्याप्रमाणे, कारणानुसार वेगवेगळे:
- वाचनाची आकडेवारी — कोणती पाने पाहिली आणि किती वेळ, ब्राउझर, उपकरणाचा प्रकार आणि प्रणाली, देश-प्रदेशपातळीवरचे ढोबळ ठिकाण, आणि तुम्ही इथे कुठून आलात. Google Analytics (GA4) मार्फत, कोणता मजकूर वाचला जातो आणि कुठे काम करायचे राहिले आहे हे कळावे म्हणून. एकत्रित स्वरूपात पाहिली जाते; तुम्हाला ओळखण्यासाठी वापरली जात नाही.
- सूचनांची नोंदणी — तुम्ही होकार दिलात तरच: एक निनावी ओळखचिन्ह आणि तुमच्या ब्राउझरचा सूचना-पत्ता, OneSignal कडे. सण किंवा नवा अध्याय अशा प्रसंगी अधूनमधून कळवण्यासाठी. त्यासोबत नाव किंवा ई-मेल जात नाही, कारण ते आमच्याकडे नाहीच.
- सर्व्हरच्या तांत्रिक नोंदी — IP पत्त्यासह, सुरक्षेसाठी आणि संकेतस्थळ नीट चालावे म्हणून, होस्टिंग सेवेकडे काही काळ.
- पत्रव्यवहार — तुम्ही लिहिलेत तर तुमचा ई-मेल पत्ता आणि तुम्ही जे कळवाल ते, उत्तर देण्यासाठी आणि दुरुस्ती वा तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी.
4.कायदेशीर आधार आणि संमती मागे घेणे
सूचना तुमच्या स्पष्ट संमतीवर चालतात, आणि ती ब्राउझरच्या सेटिंगमधून कधीही मागे घेता येते — कोश वाचण्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आकडेवारी आणि सर्व्हरनोंदी हे संकेतस्थळाचे नेहमीचे चालणे आहे; आकडेवारीतून बाहेर पडायचे असल्यास ब्राउझरच्या सेटिंगमधून किंवा Google च्या opt-out साधनाने करता येते.
पान उघडताच सूचनांची परवानगी मागितली जात नाही. बराच वेळ वाचन झाल्यावरच, एकदाच विचारले जाते; नकार दिल्यास पुन्हा कधीच नाही.
5.आमच्यावतीने माहिती कोण हाताळते
या संकेतस्थळावर चालणाऱ्या बाहेरच्या सेवा एवढ्याच:
- Google (Analytics, Fonts) — वाचनाची आकडेवारी; देवनागरी टंक
- OneSignal — ऐच्छिक सूचना
- Vercel — होस्टिंग आणि सर्व्हरनोंदी
प्रत्येकाचे स्वतःचे धोरण आहे आणि त्यांच्या पद्धतींवर आमचे नियंत्रण नाही. ‘स्टोरीझ’मध्ये दिसणारे लेख whatsupmarathi.com वरून आमच्याच सर्व्हरने आणलेले असतात, त्यामुळे ते पाहताना तुमच्याविषयी काहीही ब्लॉगकडे जात नाही.
6.भारताबाहेर साठवण
या सेवा जगभर चालतात, त्यामुळे वर सांगितलेली माहिती अमेरिका आणि युरोपसह भारताबाहेरील सर्व्हरवर साठवली वा हाताळली जाऊ शकते. आम्ही त्यांच्या नेहमीच्या अटींवर त्या वापरतो आणि इथे सांगितल्यापलीकडे काहीही पाठवत नाही.
7.तुमच्या ब्राउझरमध्ये काय साठवले जाते
काही निवडी तुमच्याच उपकरणावर राहतात, जेणेकरून पुन्हा कराव्या लागू नयेत. त्या आमच्या सर्व्हरवर कधीच पाठवल्या जात नाहीत, आणि संकेतस्थळांमधून पाठलाग करणाऱ्या कुकीज नाहीत:
- mk-theme — उजळ की गडद रंगसंगती
- mk-size, wmFontSize — अक्षरांचा आकार
- mk-font, mk-roman — पाठाचा टंक आणि देवनागरी की रोमन
- mk-os-asked — या भेटीत सूचनांविषयी विचारले गेले का
परतणारा वाचक दोन न मोजता एकच मोजला जावा म्हणून Google Analytics स्वतःच्या कुकीज ठेवते. ब्राउझरचा साठा साफ केल्यास या सगळ्या जातात; कोश सुरुवातीच्या स्थितीत उघडतो आणि बाकी काहीही बिघडत नाही.
8.किती काळ ठेवली जाते
- आकडेवारी — Google Analytics च्या retention सेटिंगनुसार, सध्या तिच्या मूळ मुदतीइतकी.
- सूचनांची नोंदणी — तुम्ही ती मागे घेईपर्यंत, किंवा तुमचा ब्राउझर ती सोडून देईपर्यंत.
- सर्व्हरनोंदी — होस्टिंग सेवेने ठरवलेल्या मर्यादित काळापुरत्या, सुरक्षेसाठी.
- पत्रव्यवहार — तो विषय निकाली निघेपर्यंत आणि केलेल्या दुरुस्त्यांची नोंद राहावी तितका.
- ब्राउझरमधल्या निवडी — तुमच्या उपकरणावर, तुम्ही त्या साफ करेपर्यंत.
9.मुले
कोश सर्व वयोगटांसाठी खुला आहे आणि तो मुलांकडून जाणीवपूर्वक कोणतीही वैयक्तिक माहिती गोळा करत नाही — कारण तो कोणाकडूनच ती गोळा करत नाही. पुढे कधी एखाद्या सोयीत वैयक्तिक माहिती येणार असेल, तर १८ वर्षांखालील वापरकर्त्यांसाठी डीपीडीपी कायद्यानुसार पालकांची पडताळणीयोग्य संमती घेतली जाईल.
10.सुरक्षा आणि माहितीभंगाची सूचना
संकेतस्थळाच्या रक्षणासाठी वाजवी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय उपाय योजले जातात, तरी इंटरनेटवरचे कोणतेही प्रसारण पूर्णपणे सुरक्षित नसते. वैयक्तिक माहितीचा भंग झाल्यास, तो लक्षात आल्यापासून 72 तासांत भारतीय माहिती संरक्षण मंडळाला कळवले जाईल, आणि बाधित व्यक्ती ओळखता व गाठता येत असतील तर त्यांनाही.
11.तुमचे हक्क
आमच्याकडे तुमचे खाते नाही आणि नोंदही नाही, त्यामुळे बहुतेक वेळा पाहण्यासारखे किंवा काढून टाकण्यासारखे काही नसते. तरीही तुम्हाला हे हक्क आहेत:
- आमच्याकडे तुमची कोणती वैयक्तिक माहिती आहे आणि ती कशी हाताळली जाते हे विचारणे
- ती दुरुस्त करून घेणे, पूर्ण करून घेणे किंवा काढून टाकायला सांगणे
- सूचनांची संमती कधीही मागे घेणे
- मृत्यू किंवा असमर्थतेच्या प्रसंगी हे हक्क वापरण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला नामनिर्देशित करणे
- आमच्या प्रसिद्ध केलेल्या पद्धतीनुसार तक्रारीचा निपटारा करून घेणे
- भारतीय माहिती संरक्षण मंडळ कार्यरत झाल्यावर तिथे तक्रार करणे
यांपैकी काहीही करण्यासाठी admin@whatsupmarathi.com वर लिहा. पोच आणि निकालाच्या मुदती तक्रार निवारण पानावर आहेत.
12.भाषा
हे धोरण मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत याच पानावर प्रसिद्ध केले आहे; दोन्हींचा अर्थ एकच आहे.
13.धोरणातील बदल
हे धोरण वेळोवेळी बदलू शकते; बदलाची तारीख या पानाच्या वर नोंदवली जाते. वैयक्तिक माहितीच्या हाताळणीवर लक्षणीय परिणाम करणारा बदल असेल, तर नुसत्या तारखेवर भिस्त न ठेवता तो ठळकपणे सांगितला जाईल.
Privacy Policy
The English and Marathi texts carry the same meaning. Where a reading genuinely differs, this English version governs, as it is the one that matches WhatsUp Marathi’s own policies.
marathikosh.whatsupmarathi.com is operated by Brahmo Productions LLP, operating as WhatsUp Media, which publishes WhatsUp Marathi (whatsupmarathi.com) and Marathi Kosh (marathikosh.whatsupmarathi.com). For the purposes of the Digital Personal Data Protection Act, 2023, Brahmo Productions LLP is the Data Fiduciary for this site.
Reading the kosh requires no account, no registration and no form. We therefore ask you for no personal information at all. What follows sets out exactly what is collected despite that, who processes it, and what you can do about it.
This policy is written to the standard the DPDP Act and its 2025 Rules set, ahead of their enforcement on 13 May 2027. WhatsUp Marathi’s main Privacy Policy covers the group, including its forms and contests; this page covers the kosh alone.
1.Who we are and how to reach us
- Data Fiduciary
- Brahmo Productions LLP
2.What we do not collect
- Name, email address, phone number or postal address — never requested on this site.
- No accounts, logins or passwords.
- No forms, contests, submissions or registrations.
- No advertising, and therefore no advertising or retargeting cookies.
- No payments, and no financial information of any kind.
- We do not sell, rent or trade personal data to anyone, for any purpose.
3.What is collected, and why
Itemised by purpose, as the Act requires:
- Readership statistics — pages viewed and time on them, browser, device type and operating system, approximate location at country or region level, and the referring source. Collected through Google Analytics (GA4) to understand which material is used and where the work is thin. Read in aggregate; not used to identify you.
- Notification subscription — if, and only if, you opt in: an anonymous identifier and your browser’s push endpoint, held by OneSignal. Used to send occasional notices such as a festival or a newly published chapter. No name or email is attached, because we hold none.
- Technical server logs — including IP address, retained by our host for a limited period for security and reliability.
- Correspondence — if you write to us, your email address and whatever you tell us, used to answer you and to act on corrections or complaints.
4.Legal basis and withdrawing consent
Notifications run on your consent, given by an explicit opt-in and withdrawable at any time from your browser’s site settings, with no consequence for reading the kosh. Analytics and server logs are the ordinary operation of the site; you can opt out of analytics through your browser or Google’s own opt-out tool.
No notification prompt is shown when a page loads. It appears only after sustained reading, only once, and never again if you decline.
5.Who processes data on our behalf
These are the only external services running on this site:
- Google (Analytics, Fonts) — readership statistics; the Devanagari typeface
- OneSignal — opt-in browser notifications
- Vercel — hosting and server logs
Each has its own privacy policy and its practices are outside our control. Articles shown under “Stories” are fetched from whatsupmarathi.com by our own server, so nothing about you is passed to the blog when you view them.
6.Storage outside India
These providers operate globally and the data described above may be stored or processed on servers outside India, including in the United States and the European Union. We use them on their standard terms and transfer nothing beyond what is set out here.
7.What is stored in your browser
A few preferences are kept on your own device so you do not have to set them again. These are never transmitted to our servers and are not cookies used to track you across sites:
- mk-theme — light or dark colour scheme
- mk-size, wmFontSize — text size
- mk-font, mk-roman — the typeface for verse, and Devanagari or Roman script
- mk-os-asked — whether the notification prompt has already been shown this session
Google Analytics sets its own cookies to count a returning visitor as one person rather than two. Clearing your browser storage removes all of these; the site then opens in its default state and nothing else is affected.
8.How long it is kept
- Analytics data — as per Google Analytics' retention setting, currently its default.
- Notification subscription — until you withdraw it or your browser discards it.
- Server logs — a limited period set by our host, for security and reliability.
- Correspondence — as long as needed to deal with the matter and keep a record of corrections made.
- Browser preferences — on your device, until you clear them.
9.Children
The kosh is open to readers of every age and does not knowingly collect personal data from children, because it does not collect personal data from anyone. Should any future feature involve personal data, verifiable parental consent will be obtained for users below 18 as the DPDP Act requires.
10.Security and breach notification
We take reasonable technical and organisational measures to protect this site, though no transmission over the internet is ever completely secure. In the event of a personal data breach we will notify the Data Protection Board of India within 72 hours of becoming aware of it, and notify affected individuals where we are able to identify and reach them.
11.Your rights
Because we hold no account and no record of you, there is usually nothing to access or erase. You nonetheless have the right to:
- Ask what personal data, if any, we hold about you and how it is processed
- Have it corrected, completed or erased
- Withdraw consent for notifications at any time
- Nominate another person to exercise these rights on your behalf in the event of death or incapacity
- Have a grievance dealt with under our published procedure
- Complain to the Data Protection Board of India once it is functioning
To exercise any of these, write to admin@whatsupmarathi.com. Our Grievance Redressal page sets out the acknowledgement and resolution timelines.
12.Language
This notice is published on this page in both Marathi and English, and the two carry the same meaning.
13.Changes to this policy
This policy may be revised, and the date of the latest revision appears at the top of this page. Where a change materially affects how personal data is handled, we will say so prominently rather than relying on the date alone.
तक्रार, दुरुस्ती किंवा संपर्क
या संकेतस्थळाविषयी काहीही — चुकीची नोंद, हक्कांचा प्रश्न, मजकूर काढून टाकण्याची विनंती किंवा तक्रार — यासाठी एकच पत्ता.
Grievances, corrections, rights questions and takedown requests — one address for all of it.
admin@whatsupmarathi.com