मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
श्री शांतादुर्गेची आरती

भक्ती

श्री शांतादुर्गेची आरती

shri shantadurgechi arati

सारांश

गोव्यातील कवळे येथील शांतादुर्गेची आरती. ‘भूकैलासा ऐसी ही कवला नगरी’ — देवस्थानाचे नाव आरतीतच गुंफलेले आहे. शांतादुर्गा ही विष्णू आणि शिव यांच्यातील वाद मिटवणारी देवी, म्हणून ‘शांता’.

जय देवी जय देवी जय शांते जननी । दुर्गे बहुदुःखदमने रतलो तव भजनी ॥ धृ ॥
भूकैलासा ऐसी ही कवला नगरी । शांतादुर्गा तेथे भक्तभवहारी ।असुराते मर्दुनिया सुरवरकैवारी । स्मरती विधीहरीशंकर सुरगण अंतरी ।जय देवी जय देवी जय शांते जननी । दुर्गे बहुदुःखदमने रतलो तव भजनी ॥ १ ॥
प्रबोध तुझा नव्हे विश्वाभीतरी । नेति नेति शब्दे गर्जती पै चारी ।साही शास्त्रे मथिता न कळीसी निर्धारी । अष्टादश गर्जती परी नेणती तव थोरी ।जय देवी जय देवी जय शांते जननी । दुर्गे बहुदुःखदमने रतलो तव भजनी ॥ २ ॥
कोटी मदन रूपा ऐसी मुखशोभा । सर्वांगी भूषणे जांबूनदगाभा ।नासाग्री मुक्ताफळ दिनमणीची प्रभा । भक्तजनाते अभय देसी तू अंबा ।जय देवी जय देवी जय शांते जननी । दुर्गे बहुदुःखदमने रतलो तव भजनी ॥ ३ ॥
अंबे भक्तांसाठी होसी साकार । नातरी जगजीवन तू नव्हसी गोचर ।विराटरूपा धरूनी करीसी व्यापार । त्रिगुणी विरहीत सहीत तुज कैचा पार ।जय देवी जय देवी जय शांते जननी । दुर्गे बहुदुःखदमने रतलो तव भजनी ॥ ४ ॥
त्रितापतापे श्रमलो निजवी निजसदनी । अंबे सकळारंभे राका शशीवदनी ।अगमे निगमे दुर्गे भक्तांचे जननी । पद्माजी बाबाजी रमला तव भजनी ।जय देवी जय देवी जय शांते जननी । दुर्गे बहुदुःखदमने रतलो तव भजनी ॥ ५ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

नातरी
— नाहीतर, अन्यथा
तुज
— तुला

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Durga Mahishasura-mardini, the slayer of the buffalo demon, Germany.jpg — Raja Ravi Varma, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

दुर्गे दुर्घट भारी

देवी

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी

Durge Durghat Bhari

श्री विंध्यवासिनी माता आरती

देवी

जय जय जगदंबे, श्री अंबे, विंध्यवासिनी माता जय जय जगदंबे धृ

Vindhyavasini Mata

सत्याम्बा व्रतकथा

देवी

श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतै नमः श्रीगुरवे नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् सर्वे श्रोताराः सावधाना भवन्तु

Satyamba Vratkatha, adhyaya 1

सत्याम्बा व्रतकथा

देवी

सूत म्हणतात, 'हे ब्राह्मणांनो पूर्वी हे सत्यांबाव्रत कोणी कसे केले हे सर्व मी सांगतो, तुम्ही भक्तियुक्त अंतःकरणाने ते ऐका १

Satyamba Vratkatha, adhyaya 2

सत्याम्बा व्रतकथा

देवी

सूत म्हणतात, 'हे श्रोत्यांमध्ये श्रेष्ठ, भक्तितत्पर, महाभाग्यवान् शौनका, अशाप्रकारे या मृत्युलोकी मुक्ति देणारे हे सत्यांबादेवीचे व्रत प्रगट झाले १

Satyamba Vratkatha, adhyaya 3

सत्याम्बा व्रतकथा

देवी

सूत म्हणतात :- ऋषी हो, आणखी मी एक कथा सांगतो; ती तुम्ही श्रवण करा. जिच्या योगाने शेवटी मोक्ष मिळतो. १

Satyamba Vratkatha, adhyaya 4