मुख्य मजकुराकडे जा

भक्ती

दुर्गे दुर्घट भारी

Durge Durghat Bhari

रचना — समर्थ रामदास · १६०८–१६८१

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥वारी वारीं जन्ममरणांतें वारी ।हारी पडलो आतां संकट निवारी ॥१॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी ।सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥धृ॥
त्रिभुवनभुवनी पाहतां तुजऐसी नाहीं ।चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं ॥साही विवाद करितां पडिले प्रवाहीं ।तें तूं भक्तांलागी पावसि लवलाहीं ॥२॥
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।क्लेशांपासुनि सोडी तोडी भवपाशा ॥अंबे तुजवांचून कोण पुरवील आशा ।नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥३॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

स्रोत पारंपरिक मौखिक पाठ

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित स्रोताशी पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.