
भक्ती
सत्राणे उड्डाणे
Satrane Uddane
रचना — समर्थ रामदास · १६०८–१६८१
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी ।करि डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी ।कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी ।सुरवर चर निशाचर त्या झाल्या पळनी ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री हनुमंता ।तुमचेनि प्रसादे नाभे कृतांता ॥ जय देव
दुमदुमली पाताळे उठिला प्रतिशब्द ।थरथरला धरणीधर मानीला खेद ।कडाडिले पर्वत उड्डगण उच्छेद ।रामी रामदासा शक्तिचा शोध ॥ २ ॥ जय देव
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.
चित्र: Hanuman fetches the herb-bearing mountain, in a print from the Ravi Varma Press, 1910's.jpg — Unknown, Public domain, via Wikimedia Commons.
WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट
हेही वाचा

भीमरूपी महारुद्रा
हनुमानभीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
Bhimrupi Maharudra

मारुतीची भूपाळी
हनुमानउठा प्रातःकाळ झाला मारुतीला पाहू चला
marutichi bhupali

समर्थ रामदास
व्यक्ती‘दासबोध’ आणि ‘मनाचे श्लोक’ यांचे कर्ते. रामभक्त आणि हनुमानोपासक.
Samarth Ramdas

दुर्गे दुर्घट भारी
देवीदुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
Durge Durghat Bhari

सुखकर्ता दुःखहर्ता
गणपतीसुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
Sukhakarta Dukhaharta

लवथवती विक्राळा
शंकरलवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
Lavthavati Vikrala