मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
मारुतीची भूपाळी

भक्ती

मारुतीची भूपाळी

marutichi bhupali

रचना — समर्थ रामदास · १६०८–१६८१

सारांश

‘आमुचा निर्वाणींचा गडी’ — संकटात धावून येणारा सोबती, असे हनुमानाचे वर्णन. ‘रामी रामदासाची’ ही शेवटची नाममुद्रा रचना समर्थ रामदासांची असल्याचे सांगते.

उठा प्रातःकाळ झाला । मारुतीला पाहू चला ।ज्याचा प्रताप आगळा । विरंचीही नेणतो ॥ ध्रु. ॥
आमुचा हनुमंत साह्यकरी । तेथे विघ्न काय करी ।दृढ धरा हो अंतरी । तो त्वरीत पावेल ॥ १ ॥
आमुचा निर्वाणींचा गडी । तोचि पावेल सांकडी ।त्याचे भजनाचे आवडी । दृढ बुध्दि धरावी ॥ २ ॥
थोर महीमा जयाची । कीर्ति वर्णवी तयाची ।रामी रामदासाची । निकत भक्ति करवी ॥ ३ ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Hanuman fetches the herb-bearing mountain, in a print from the Ravi Varma Press, 1910's.jpg — Unknown, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा