मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
भीमरूपी महारुद्रा

भक्ती

भीमरूपी महारुद्रा

Bhimrupi Maharudra

रचना — समर्थ रामदास · १६०८–१६८१

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥
महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका ॥२॥
दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा ।पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥
ब्रह्मांडें माइलीं नेणों आवळे दंतपंगती ।नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥५॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Hanuman fetches the herb-bearing mountain, in a print from the Ravi Varma Press, 1910's.jpg — Unknown, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — पारंपरिक मौखिक पाठ

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित स्रोताशी पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.