
भक्ती
श्री आत्मारामाची आरती
Shri Atmaramachi Aarti
रचना — समर्थ रामदास · १६०८–१६८१
नानादेहीं देव एक विराजे ।नाना नाटकलीला सुंदर रूप साजे ।नाना तीर्थीं क्षेत्रीं अभिनव गति माजे ।अगाध महिमा पिंड ब्रह्मांडीं गाजे ॥ १ ॥
जय देव जय देव जय आत्मारामा ।निगमागम शोधितां न कळे गुणसीमा ॥ धृ ॥
बहुरूपी बहुगुणी बहुतां काळाचा ।हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा ।युगानुयुगीं आत्माराम आमुचा ।दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ॥ जय ॥ २ ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.
चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.
WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट
हेही वाचा

समर्थ रामदास
व्यक्ती‘दासबोध’ आणि ‘मनाचे श्लोक’ यांचे कर्ते. रामभक्त आणि हनुमानोपासक.
Samarth Ramdas

दुर्गे दुर्घट भारी
देवीदुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
Durge Durghat Bhari

सुखकर्ता दुःखहर्ता
गणपतीसुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
Sukhakarta Dukhaharta

लवथवती विक्राळा
शंकरलवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
Lavthavati Vikrala

सत्राणे उड्डाणे
हनुमानसत्राणे उड्डाणे हुंकार वदनी
Satrane Uddane

घालीन लोटांगण
सर्वसामान्यघालीन लोटांगण वंदीन चरण
Ghalin Lotangan