मुख्य मजकुराकडे जा

भक्ती

घालीन लोटांगण

Ghalin Lotangan

रचना — संत नामदेव · १२७०–१३५०

घालीन लोटांगण वंदीन चरण ।डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ॥प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन ।भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव ।त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ॥करोमि यद्यत्सकलं परस्मै ।नारायणायेति समर्पयामि ॥३॥
अच्युतं केशवं रामनारायणं ।कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं ॥श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं ।जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

स्रोत पारंपरिक मौखिक पाठ

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित स्रोताशी पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.