भक्ती
येई हो विठ्ठले
Yei Ho Vitthale
रचना — संत नामदेव · १२७०–१३५०
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ॥धृ॥
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥१॥
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ॥२॥
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।विष्णुदास नामा जीवें भावें ओवाळी ॥३॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.