मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ओवाळूं ग माये विठ्ठल

भक्ती

ओवाळूं ग माये विठ्ठल

Ovalu Ga Maye Vitthal

ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा ।राईरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ॥ धृ ॥
कनकाचे पर्यंकीं उजळोनी आरती ।रत्नदीपशोभा कैशा प्रकाशल्या ज्योती ॥ ओवाळूं ॥ १ ॥
मंडित चतुर्भुज कानीं शोभत कुंडले ।श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ॥ ओवाळूं ॥ २ ॥
वैजयंती माळ गळा शोभे स्यमंत ।शङ्खचक्रगदापद्य आयुधें शोभत ॥ ओवाळूं ॥ ३ ॥
सांवळा सुंदर जैसा कर्दळीचा गाभा ।चरणींईचीं नूपुरें वांक्या गाजती नभा ॥ ओवाळूं ॥ ४ ॥
ओवाळींतां मन माझें ठाकलें ठायीं ।समाधिस्थसमान तुकया लागला पायीं ॥ ओवाळूं ॥ ५ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ठायीं
— ठिकाणी

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — मराठी आरती संग्रह (मुद्रित)