मुख्य मजकुराकडे जा

भक्ती

आरती ज्ञानराजा

Aarti Dnyanaraja

रचना — संत एकनाथ · १५३३–१५९९

आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा ।सेविती साधुसंत मनु वेधला माझा ॥धृ॥
लोपलें ज्ञान जगीं हित नेणती कोणी ।अवतार पांडुरंग नाम ठेविलें ज्ञानी ॥१॥
कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी ।नारद तुंबर हो सांग करिती कीर्तन ॥२॥
प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचि केलें ।रामजनार्दनी पायीं मस्तक ठेविलें ॥३॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

स्रोत पारंपरिक मौखिक पाठ

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित स्रोताशी पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.