मुख्य मजकुराकडे जा

भक्ती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती

Trigunatmak Traimurti

रचना — संत एकनाथ · १५३३–१५९९

त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ॥नेति नेति शब्द न ये अनुमाना ।सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥१॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥धृ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।अभाग्यासी कैची कळेल हे मात ॥पराही परतली तेथे कैचा हेत ।जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥२॥
दत्त येऊनिया उभा ठाकला ।भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।हरपले मन झाले उन्मन ॥मी तू पणाची झाली बोळवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥४॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

स्रोत पारंपरिक मौखिक पाठ

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित स्रोताशी पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.