दत्तदिगंबरा, ऊठ करुणाकरा । पहाट झाली पुरे झोप आता ।भक्तजन हे उभे वाट पाहती सभे । दर्शने देई त्या शीघ्र शांता ॥ ध्रु. ॥
अरुण तम दूर करी कुंकुमे नभ भरी । बापडी ही उषा पदर पसरी ।गंग खळखळ करी त्वद्यशे जगभरी । मंद वाहे कशी अनिललहरी ॥ १ ॥
वनगंधर्व हे सुस्वरे गाइती । मोर केकारवे नृत्य करिती ।मुनिकुले गर्जती वेदमंथगिरा । ऊठ बा श्रीधरा राधु पठती ॥ २ ॥
षट्पदे पद्मदली गुंजती प्रियकरा । भेटती ही मुद्रा चक्रपिल्ली ।रंग कष्टी उभा पाहू दे मुखप्रभा । लोळू दे सतत बा चरणकमळी ॥ ३ ॥
पहाटेसी उठोनि भक्त हर्षुनिया चित्ती ।दत्तगुरुप्रति भेटूं येती सह्याद्रीवरती ॥ ध्रु. ॥
कृतवीर्यात्मज सहस्त्रबाहू अर्जुन तो पुढती ।कयाधुसुत जो भागवतोत्तम प्रहलाद सुमती ॥ १ ॥
ययातिसुत यदु ज्याच्या वंशा देवही वंदीती ।मदालसेचा नंदन चौथा अलक जया म्हणती ॥ २ ॥
सुरतपानामक भूसुर मुनिवर विष्णुदास सुमती ।अन्यहि येती सुरमौनितती करिती ते प्रणती ॥ ३ ॥
अनसूयेच्या बाळा दत्ता करितो तुज विनती ।उठी उठी विमला, अरुण उदेला सरली हे राती ॥ ४ ॥
मंगलधामा मेघश्या,मा, उठी उठी तु निगुती ।अरुण उदेला, प्रकाश पडला पक्षी गलबलती ॥ ५ ॥
कुंकुंम माखुनि प्राचीकामिनी हर्षुनि आत्मपती ।येतो म्हणुनि ये लगबगुनी लाटीनम पुढती ॥ ६ ॥
द्विजाती उठती वेदा पुढती वासुदेव प्रार्थी ।उठी उठी दत्ता श्रीगुरुनाथा दावी सुखदीप्ती ॥ ७ ॥
उठि उठि बा दत्तात्रेया । भानु करु पाहे उदया ।करणे दीनांवरती दया । चरण दावे वेगेसी ॥ ध्रु. ॥
मंद वायूही सूटला । पक्षी करिताती किल्बिला ।दीपवर्ण शुभ्र जाला । पूर्व दिशा उजळली ॥ १ ॥
करुनि कृष्णेचे सुस्नान । घेऊनि पूजेचे सामान ।सकळा लागले तव ध्यान । कपाट केव्हा उघडेल ॥ २ ॥
आले देवादिक दर्शना । त्यांच्या पुरवाव्या कामना ।संतोषोनि आपल्या मना । तीर्थप्रसाद अर्पावा ॥ ३ ॥
गुरु त्रैमूर्ति साचार । करिसी पतितांचा उद्धार ।म्हणुनि धरिसी हा अवतार । संकटीं भक्तां रक्षिसी ॥ ४ ॥
रामदास लागे पायी । मागे इच्छा हेचि देई ।तूचि माझी बाप मायी । प्रतिपाळावे भक्तां । सी ॥ ५ ॥
उठी उठी बा मुनिनंदना । भक्त पातले दर्शना ।त्यांची पुरवी तू कामना । पाही नयन उघडूनी ॥ ध्रु. ॥
उघडुनिया करुणादृष्टी । दासा धरी आपुले पोटी ।नको येऊ देऊ हिंपुटी । घाली कंठी मिठी हर्षें ॥ १ ॥
हर्षे तुझे पदी रंगले । दारागारा विसरले ।निजदेहा न भुलले । विनटले निजभावे ॥ २ ॥
निजभावे येता शरण । लपविसी का बा चरण ?जेणे तरती दुष्टाचरण । मग मरणभय कैचे ? ॥ ३ ॥
नको करु निष्ठुर मन । शीघ्र देई आश्वासन ।तू अससी करुणाघन । तापशमन करि शीघ्र ॥ ४ ॥
उठी उठी बा सद्गुरुराया । उठी उठी करुणालया ।उठी उठी वा चिन्मया । निजमाया आवरी ॥ ५ ॥
उठी उठी श्रीदत्तात्रेया । श्रीपादश्रीवल्लभा सदया ।श्रीनृसिंहसरस्वती गुरुवर्या । दर्शन देई भक्तांदसी ॥ ध्रु. ॥
पंच पंच उषःकाल जाहला । अरुणोदय सप्तपंच धाटिला ।अष्टपंच प्रातःकाला । उदया पावे रवि पूर्ण ॥ १ ॥
आले अमरेंद्रादि अमर । संत साधु मुनिवर ।समग्र आले नारीनर । कांकड आरती पहावया ॥ २ ॥
नमिता पूर्ण मनोरथ होती । त्रिविध ताप समूळ हरती ।पूर्वज समस्त उद्धरती । कांकड आरती देखिलिया ॥ ३ ॥
वेगे उठती सद्गुरुमूर्ती । सकळिक पदांबुज वंदिती ।स्तवनी ध्यानी ओवाळिती । विश्वव्यापक परमात्मा ॥ ४ ॥
गुरुत्रैमूर्ति आश्रम घेऊन । तरुवरीं ब्रीदरक्षणार्थ राहुन ।स्मरता तारिसी जन संपूर्ण । रक्षिसी गुरुभक्त सर्वदा ॥ ५ ॥
उठी उठी बा आत्मया । चिन्मया दत्तात्रेया ।सोडुनिया गुणमय शय्या । जागृत हो अपसैय्या ॥ ध्रु. ॥
झाली बा प्रबोध पहांट विवेक हा अरुण ।आला उजळित आशा आता उगवे चित्किरण ॥ १ ॥
फिक्कट पडला व्यवहारेंदु वैरि निशाचर ।कामादि हे लपले पाहुनि प्रकाश हा थोर ॥ २ ॥
दुस्तर्कादिक दिवाभीत दडले ते ह्या वेळी ।दुर्वृत्ती ह्या तारा गगनी मावळल्या सकाळी ॥ ३ ॥
शमादि विप्र पुढे सादर राहति सांडुनिया दर ।उठी उठी बा तू निजरुपा दावी ह्या सादर ॥ ४ ॥
रागद्वेष मलोत्सर्गा करुनि आला पुढती ।वासुदेवा भेट दे हा करिताहे प्रणती ॥ ५ ॥
उठी सत्त्वर प्रभुवरा यतिवरा । स्नानासी उशीर जाहला ।देवा स्नानासी उशीर जाहला । पाहे स्वामि दयाळा ।त्रिभुवन पाळा । अरुणोदय जाहला ॥ ध्रु. ॥
कर जोडुनी सुरनर मुनिवर उभे महाद्वारीं । देवा उभे महाद्वारी ।द्यावे दर्शन श्रीहरि नरहरी । सद्गुरु अवधारी ॥ १ ॥
सद्गुरु मूर्ती अनंत कीर्ति श्रुति वर्णिती पाही ।देवा श्रुति वर्णिती पाही ।स्मरणी तारक निज सुखदायक । भक्तांत लवलाही ॥ २ ॥
ऐकुनी वाणी चिन्मय खाणी । उठता विश्वात्मक तारु ।सद्गुरु विश्वातमक तारु ।सर्वही ध्यानी वंदन करिती । गुरुवर कल्पतरु ॥ ३ ॥
काषायांवर भस्मभूषणे धारण रुद्राक्षाभरणे ।विलसती रुद्राक्षाभरणे ।दंडकमंडलु, गदा, पद्म, । शंख, चक्र, शोभती पूर्णें ॥ ४ ॥
किरीटकुंडलमंडित षड्भुजमूर्ती कीर्ति सांवळी ।प्रभूची मूर्ती कांति सांवळी ।नमिता श्रीगुरु भक्त दत्त सतत पदी । नांदवि तात्काळी ॥ ५ ॥
पाहे पाहे सद्गुरुमूर्ती । त्रिगुणात्मका त्रैमूर्ती ।परमात्मया त्रैमूर्ती ।विश्वजीवना अनादिमूर्ती । कृपादृष्टीने पहावे ॥ ध्रु. ॥
श्रीगणपति शिव विश्वेतश्वर । चिदंबरेश्वर परमेश्वर ।चिदंबरेश्वर परमेश्वर ।श्रीअविमुक्तेरश्वर कोटेश्वर । संगमेश्वर योगिनी निष्ठती ॥ पाहे ॥ १ ॥
श्रीअमरेश्वर शक्तीवश्वर । प्रयागेश्वर वरदेश्वर । प्रया० ।श्रीसिद्धेश्वर कामेश्वर । शिवपंचायतन विराजे ॥ पाहे ॥ २ ॥
श्रीपापविमोचनेश्वर । शुक्लेिश्वर नंदिकेश्वर । शुक्ले० ।द्विशक्तीम पन्नग मारुती । चक्र आदिमाया श्रीजाह्नवी ॥ पाहे ॥ ३ ॥
महाकाळेश्वर सर्वेश्वर । अन्नपूर्णा सुरतरुवर । अन्नपू० ।श्रीरामचंद्र योगेश्वर । रामेश्वर श्रीकमला ॥ पाहे ॥ ४ ॥
श्रीनारायणस्वामी यतीश्वर । गोपाळस्वामी अखिलेश्वर । गोपा० ।कृष्णानंद यतिपति खगेश्वर । लक्ष्मीनारायण सहित ॥ पाहे ॥ ५ ॥
श्रीविठ्ठराई रुक्मिणी । हरिहरब्रह्मेश्वर सगुणी । हरिहर० ।वसे मृत्युंजय सुरादि शशीतरणी । भूत्रिभूवनीं अनुपम्य ॥ पाहे ॥ ६ ॥
श्रीब्रह्मदेव माधवेश्वर । विश्वंूभरेश्वर सर्वभूतेश्वर । विश्वंं० ।श्रीउमामहेश्वर स्वामीकार्तिकेश्वर । काळभैरव क्षेत्रपाळ ॥ पाहे ॥ ७ ॥
श्रीकृष्णानदी संगमी । कामधेनु सिद्धवरदभूमि । काम० ।वसतीस्वामी कल्पद्रुमी । प्रबलाश्रय तो अखिलांचा ॥ पाहे ॥ ८ ॥
सुरेंद्रादि निर्जर प्रीती । ऋषि योगी मुनिजन तप तपती । ऋषि० ।श्रीप्रभु देती चतुर्विध मुक्तीि । आरती करितां गुरुभक्त ॥ पाहे ॥ ९ ॥
उठी उठी बा श्रीगुरुवरा । श्रीशेषशायी श्रीधरा ।श्री विधि हरिहरा सुरवरा । श्रीदत्तात्रेयमूर्ती यतिवरा ॥ ध्रु. ॥
आले संत सनकादिक । सनकनंदन श्रीशुक ।सनत्कुमार पुंडरिक । सनत्सुजात सनातन आले शौनक ॥ उठी० ॥ १ ॥
अलर्क यदुवर प्रह्लाद । श्रीव्यास सप्तनऋषि नारद ।रैवतकाची मैत्री रुक्मांगद । आले जयविजय कुमुदनंद सुनंद हो ॥ उठी० ॥ २ ॥
आले अंबऋषी प्रह्लादन । श्रीभीष्मदा लभ्य सुबिभीपण ।पराशर योगी मुनी सिद्ध पूर्ण । आले चतुर्दिशेचे भक्त संपूर्ण हो ॥ उठी० ॥ ३ ॥
गंधर्व अप्सरा किन्नर करितां नृत्य सुस्वरें तुंबर ।उठवुनि प्रार्थी गुरुभक्त प्रभुवर । प्रेमालिंगन देई सर्वां अभयवर हो ॥ उठी० ॥ ४ ॥
उठि उठि दत्तात्रेया । करुणासिंधु कृपालया ।उठवि माता अनसूया । प्रेमें टाळ्या पिटूनियां ॥ ध्रु. ॥
सप्त पंचम अरुणोदय । जाला स्नानाचा समय ।भानुप्रकाश होऊ पाहे । रविरश्मिा दाटल्या ॥ १ ॥
उठले साधकांचे वृन्द । करिति तव नामाचा छंद ।हृदयी ध्याती ब्रह्मानंद । प्रेमभावे करुनी ॥ २ ॥
व्यास वाल्मिकि नारदमुनि । आदि करोनि सर्व मुनी ।उभे राहिले आंगणी । दर्शनासी पातले ॥ ३ ॥
गंगा यमुना सरस्वती । तुंगभद्रा भागीरथी ।मणिकर्णिका भीमरथी । स्नान घालूं पातल्या ॥ ४ ॥
इंद्रचंद्रादि सुरगण । आले दर्शनालागून ।करिती स्तोत्र अनुवादन । कीर्ति तुझिया नामाची ॥ ५ ॥
ऐकुनि मातेची करुणा । उठला साधकांचा राणा ।निरंजनाचिये मना । प्रेमानंद दाटला ॥ ६ ॥
ऐका भोळे भाविकजन । नित्य करा गुरुचिंतन ।महादोष होती दहन । स्मरणमात्रें करुनिया ॥ ध्रु. ॥
गुरुसेवा घडेल ज्यासी । काळ दंडीना तयासी ।अंती जाय मोक्षपदासी । गुरुस्मरण केलिया ॥ १ ॥
गुरु भक्तीमचा दाता । गुरु देहासी चालविता ।हरे पातकाची व्यथा । गुरुस्मरण केलिया ॥ २ ॥
गुरु ज्ञानाचा सागरु । गुरु धैर्याचा आगरु ।गुरु नेईल पैल पारु । नामस्मरण केलिया ॥ ३ ॥
गुरु मायेचे निरसन । गुरु मायेचे अंजन ।गुरुचे अगाध महिमान । मुखे कित्येक वदावे ॥ ४ ॥
गुरु संतांचे निजगुज । गुरु मंत्रांचे निजबीज ।गुरुचे घ्यावे चरणांबुज । अनेक तीर्थें त्या ठायी ॥ ५ ॥
जयजय गुरु मायबापा । चुकवी चौर्यांशीच्या खेपा ।भक्तराज ध्यातो गुरुबापा । ब्रह्मी लय लावुनिया ॥ ६ ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.