मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
आत्मारामाची भूपाळी

भक्ती

आत्मारामाची भूपाळी

atmaramachi bhupali

सारांश

बाहेरचा राम आणि आतला आत्माराम एकच — ही भूपाळी दोन्ही एकत्र जागे करते. भरत-शत्रुघ्न जीव-शिव होतात, वसिष्ठ विवेक होतो; अयोध्येचा दरबार हे अंतःकरणाचे रूपक बनते.

उठा प्रातःकाळ झाला । आत्माराम पाहूं चला ।हा समयो जरिं टळला । तरि अंतरला श्रीराम ॥ ध्रु ॥
जीव-शिव दोघेजण । भरत आणि शत्रुघन ।आला बंधु लक्षुमण । मन उन्मन होऊनी ॥ १ ॥
विवेक वसिष्ठ सदगुरु । संतसज्जन मुनीश्वरु ।करिती नामाचा गजरु । हर्षनिर्भर होउनियां ॥ २ ॥
सात्त्विक सुमंत प्रधान । नगरवासी अवघे जन ।आला वायूला नंदन । श्रीचरण पाहावया ॥ ३ ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Bharata welcoming Rama, Sita, Lakshmana and Hanuman to Ayodhya by Raja Ravi Varma.jpg — Raja Ravi Varma (1848-1906), Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा