मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
श्रीकृष्णाची भूपाळी

भक्ती

श्रीकृष्णाची भूपाळी

shrikrishnachi bhupali

सारांश

गोपाळाला गाईंकडे जाण्यासाठी उठवणारी भूपाळी. निशा लोपली, शशी मंद झाला, कमळे उमलली — आणि सोबती वाट पाहत आहेत. शेवटी देवनाथ ही नाममुद्रा.

ऊठि गोपाळजी! जाइ धेनुकडे ।पाहती सौंगडे वाट तूझी ॥ ध्रु. ॥
लोपली हे निशी मंद झाला शशी ।मुनीजन मानसी ध्याति तुजला ॥ १ ॥
भानु-उदयाचळी तेज पुंजाळले ।विकसती कमळे उदकावरी ॥ २ ॥
धेनुवत्से तुला बाहती माधवा ।ऊठि गा यादवा उशिर झाला ॥ ३ ॥
ऊठि पुरुशोत्तमा वाट पाहे रमा ।दावि मुखचंद्रमा सकळिकांसी ॥ ४ ॥
कनकपात्रांतरी दीपरत्ने बरी ।ओंवाळिती सुंदर तूजलागी ॥ ५ ॥
जन्मजन्मांतरी दास होऊ हरी ।बोलती वैखरी भक्त तुझे ॥ ६ ॥
कृष्णकेशव करी चरणांबुज धरी ।ऊठि गा श्रीहरी मायबापा ॥ ७ ॥
जाग रे जाग बापा । विश्वपालका कृष्णा ।दीन आम्ही उभे द्वारी । आमुची बोळवी तृष्णा ॥ ध्रु. ॥
त्रासलो प्रपंची या । बहु कष्टलो भारी ।म्हणवूनि शरण आलो । विभो तुझिया द्वारी ॥ १ ॥
सांग बा न्यून काय । हरि तुझिया भांडारी ।याचक भीक मागे । प्रेम दीई झडकरी ॥ २ ॥
गुरुकृपे उदयो झाला । हरि उदया आला ।सुख ते काय सांगू । जिवलग भेटला ॥ ३ ॥
श्रीगुरुनाथराया । कृपासिंधु गोविंदा ।देवनाथ प्रार्थिताहे । प्रभुपदारविंदा ॥ ४ ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Krishna as Envoy, by Raja Ravi Varma.jpg — Raja Ravi Varma, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा