मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
गणपतीची भूपाळी

भक्ती

गणपतीची भूपाळी

ganapatichi bhupali

सारांश

गजमुखाला पहाटे जागे करणारी भूपाळी. शेंदुराची उटी, कानातली कुंडले, हातातली मोदकांची वाटी — रूप आधी उभे करून मग हाक मारली जाते. शेवटच्या चरणात रामानंद ही नाममुद्रा.

उठा उठा हो सकळीक । वाचे स्मरावा गजमुख ।ऋध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ॥ ध्रु. ॥
अगी शेंदुराची उटी । माथा शोभतसे किरीटी ।केशर कस्तुरी लल्लाटीं । हार कंठी साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलाची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।माजी नागबंद शोभा । स्मरतां उभा जवळी तो ॥ २ ॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकांची वाटी ।रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

किरीटी
— इंद्राने दिलेला किरीट धारण करणारा — अर्जुन

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Ganesha Basohli miniature circa 1730 Dubost p73.jpg — anonymous, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा