मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
जय देव जय देव जय वक्रतुंडा

भक्ती

जय देव जय देव जय वक्रतुंडा

Jay Dev Jay Dev Jay Vakratunda

जय देव जय देव जय वक्रतुंडा ।सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ॥ जय ॥ धृ ॥
प्रसन्नभाळा विमला करिं घेउनि कमळा ।उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीला ।रुणझुण करिती घागरिया घोळा ।सतार सुस्वर गायन शोभित अवलीला ॥ जय ॥ १ ॥
सारीगमपधनीनिसप्तस्वरभेदा ।धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ।तातक् तातक् थेय्या करिसि आनंदा ।ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ॥ जय ॥ २ ॥
अभयवरदा सुखदा राजिवदलनयना ।पर्शांकुशलउज्धर शोभित शुभवदना ।ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना ।मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करी भ्रमणा ॥ जय ॥ ३ ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Ganesha Basohli miniature circa 1730 Dubost p73.jpg — anonymous, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — मराठी आरती संग्रह (मुद्रित)