मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
नाना परिमळ दूर्वा शेंदुर

भक्ती

नाना परिमळ दूर्वा शेंदुर

Nana Parimal Durva Shendur

नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रें ।लाडू मोदक अन्नें परिपूरित पात्रें ॥ऐसें पूजन केल्या बेऱ्याजकार मंत्रें ।अष्टहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रें ॥ १ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥तूझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ धृ ॥
तुझें ध्यान निरंतर जे कोणी करिती ।त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरति ॥वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती ॥ जय देव ॥ २ ॥
शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं ।कीर्ति तयांची राहे जोंवरि शशि-तरणी ॥त्रैलोक्यीं ते विजयी अद्भुत हे करणी ।गोसावीनंदन रत नामस्मरणीं ॥ जय देव ॥ ३ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Ganesha Basohli miniature circa 1730 Dubost p73.jpg — anonymous, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — मराठी आरती संग्रह (मुद्रित)