मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
आरती करू तुज गजानना

भक्ती

आरती करू तुज गजानना

arati karu tuja gajanana

सारांश

गणपतीची आरती. मुकुट, कुंडले, हार, छत्र-चामरे असे रूपवर्णन करून ‘अग्रपूजेचा तू अधिकारी’ या गणपतीच्या खास अधिकारावर ती येते.

आरती करू तुज गजानना,देवा माझा नमस्कार घ्यावा रे ॥ ध्रु ॥
शंभू नंदना जयसुद सदना,रिद्धी सिद्धी पती रमणा रे,ब्रम्हा विष्णू ध्यानी निरंतर,आवड करुनी तव चरणा रे ॥ १ ॥
मुकुट-कुंडले हार विराजीतछत्र चामरे झळकळती रे,सुंदर वरूनी सोंडची बरवीदुर्वांकुर बहू प्रीती रे ॥ २ ॥
अग्रपूजेचा तू अधिकारीगौरीहराच्या तनया रे,पार्वतीचे स्तनपान करायाउदरी विष्णू आला रे ॥ ३ ॥
भाव लोचना भव भय हरणा,सुहास्य मूषक वाहन रे,वरदहस्त तू कृपा जयाचा,राज गजानन घ्यावा रे ॥ ४ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तुज
— तुला

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Ganesha Basohli miniature circa 1730 Dubost p73.jpg — anonymous, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा