
भक्ती
शंकराची भूपाळी
shankarachi bhupali
सारांश
संपूर्ण भूपाळी एकाच शब्दावर तोललेली आहे — धवळा. जटा, चंद्र, स्फटिकमाळ, विभूती, नंदी, कैलास; सगळे शुभ्र. शेवटच्या चरणात ‘दास’ ही नाममुद्रा, जी परंपरेने रामदासांची मानली जाते.
धवळे भोळे चक्रवर्ती । धवळे अलंकार शोभती ।धवलें धाम उमापती । सदा चित्तीं चिंतावा ॥ ध्रु. ॥
धवळ्या जटा गंगाजाळ । धवळा मयंक निर्मळ ।धवले कुंडलांचा लोळ । शंखमाळ लोंबती ॥ १ ॥
धवळी स्फटिकांची माळ । धवळे गळां उलथे व्याळ ।धवळे हाती नर-कपाळ । धवळा त्रिशूळ शोभतसे ॥ २ ॥
धवळा सर्वांगे आपण । धवळे विभूतीचे लेपन ।धवळे गात्र धवळे वसन । धवळे वाहन नंदीचे ॥ ३ ॥
धवळे कैलास भुवन । धवळे मध्ये सिंहासन ।धवळे शंकराचे ध्यान । दास चिंतन करीतसे ॥ ४ ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.
चित्र: A version from the Ravi Varma press- "Shankar," c.1910's.jpg — ravi varma press, Public domain, via Wikimedia Commons.
WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट
हेही वाचा

भस्मप्रिया भूतपते सदय
शंकरभस्म प्रिया भूतपते सदय शंकरा
Bhasmapriya Bhutapate

जयजयजी मदनांतक गौरीशंकरा
शंकरजयजयजी मदनांतक गौरीशंकरा
Jayjayji Madanantak

कर्पूरगौरं
शंकरकर्पूरगौरं करुणावतारं
Karpuragauram

लवथवती विक्राळा
शंकरलवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
Lavthavati Vikrala

जय देव जय देव श्रीमंगेशा
शंकरजय देव जय देव श्रीमंगेशा
Jay Dev Shrimangesha

जय जय त्र्यंबकराज
शंकरजय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो
Jay Jay Tryambakraj