भक्ती
जयजयजी मदनांतक गौरीशंकरा
Jayjayji Madanantak
जयजयजी मदनांतक गौरीशंकरा ।पंचारती करितो तुज हे महेश्वरा ।। धृ ।।
व्याघ्राम्बर अंगी तू नित्य सेविसी ।रुंडमाळ कंठीं असे मस्तकी शशी ।।गिरीजा तव वामांकी शोभते तशी ।भस्मप्रिया भूतपते इंदुशेखरा ।। १ ।।
बहु दुर्जन त्रिपुर दैत्य प्रबल जाहला ।हरीविधिसह विबुध पिडुनी त्रास दिधला ।।तेव्हा ते अति भावे स्तविती मग तुला ।त्रिपुरासूर वधुनी सुखी करिसी सुरवरा ।। २ ।।
एकवीस स्वर्गाहुनी उंची तव अति ।सर्वेशा दाता तू सदगतीप्रति ।।तव लीला वर्णनासी अल्प मम मती ।विठ्ठलसुत विनवितसे रक्षि किंकरा ।। ३ ।।
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.