
भक्ती
जय देव जय देव श्रीमंगेशा
Jay Dev Shrimangesha
जय देव जय देव श्रीमंगेशा ।पंचारति ओवाळूं सदया सर्वेशा ॥ धृ ॥
सदया सगुणा शंभो अजिनांबरधारी ।गौरीरमणा आद्या मदनांतकारी ॥त्रिपुरारी अधहारी शिवमस्तकधारी ।विश्वंभर विरुदें हें नम संकट धारी ॥ जय ॥ १ ॥
भयकृत भयनाशन ही नामें तुज देवा ।विबुधादिक कमळासन वांछिती तव सेवा ॥तुझे गुण वर्णाया वाटतसे हेवा ।अभिनव कृपाकटाक्षें मतिउत्सव द्यावा ॥ जय ॥ २ ॥
शिव शिव जपतां शिव तूं करिसी निजदासा ।संकट वारी मम तूं करी शत्रुविनाशा ॥कुळवृद्धीते पाववी हीच असे आशा ।अनंतसुत वांछितसे चरणांबुजलेशा ॥ जय ॥ ३ ॥
शब्दार्थ
या भागात येणारे जुने मराठी शब्द.
- तुज
- — तुला
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.
चित्र: A version from the Ravi Varma press- "Shankar," c.1910's.jpg — ravi varma press, Public domain, via Wikimedia Commons.
WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट
हेही वाचा

भस्मप्रिया भूतपते सदय
शंकरभस्म प्रिया भूतपते सदय शंकरा
Bhasmapriya Bhutapate

जयजयजी मदनांतक गौरीशंकरा
शंकरजयजयजी मदनांतक गौरीशंकरा
Jayjayji Madanantak

कर्पूरगौरं
शंकरकर्पूरगौरं करुणावतारं
Karpuragauram

लवथवती विक्राळा
शंकरलवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
Lavthavati Vikrala

जय जय त्र्यंबकराज
शंकरजय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो
Jay Jay Tryambakraj

शंकराची भूपाळी
शंकरधवळे भोळे चक्रवर्ती धवळे अलंकार शोभती
shankarachi bhupali