
भक्ती
जय जय त्र्यंबकराज
Jay Jay Tryambakraj
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ।त्रिशूळ पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ॥वृषभारुढ फणिभूषण दशभुज पंचानन शंकरा हो ।विभुतिमाळाजटा सुंदर गजचर्माम्बरधरा हो ॥ धृ ॥
पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरीं हो ।त्याने तप मांडिले ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ॥प्रसन्न होऊनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ।औदुंबरमुळीं प्रगटे पावन त्रैलोक्यांत करी हो ॥ जय ॥ १ ॥
धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णूं किती हो ।आणिकही बहुतीतें गंगाद्वारादिक पर्वती हो ॥वंदन मार्जन करिती त्याचे महादोष नासती हो ।तुझिया दर्शनमात्रे प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ जय ॥ २ ॥
ब्रह्मगिरीची भावें ज्वाला प्रदक्षिणा जरी घडे हो ।तैं ते काया कष्टें जंव जंव चरणीं रुपती खडे हो ॥तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्याचें झडे हो ।केवळ तो शिवरुपी काळ त्याच्या पाया पडे हो ॥ जय ॥ ३ ॥
लावुनिया निजभजनी सकलही पुरविसी मनकामना हो ।संतति संपत्ति देसी अंतीं चुकविसी यमयातना हो ॥शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो ।गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ जय ॥ ४ ॥
शब्दार्थ
या भागात येणारे जुने मराठी शब्द.
- जंव
- — जोपर्यंत
- तंव
- — तोपर्यंत; तेवढ्यात
- तुज
- — तुला
- घडे
- — घडते, शक्य होते
- तैं
- — तेव्हा
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.
चित्र: A version from the Ravi Varma press- "Shankar," c.1910's.jpg — ravi varma press, Public domain, via Wikimedia Commons.
WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट
हेही वाचा

भस्मप्रिया भूतपते सदय
शंकरभस्म प्रिया भूतपते सदय शंकरा
Bhasmapriya Bhutapate

जयजयजी मदनांतक गौरीशंकरा
शंकरजयजयजी मदनांतक गौरीशंकरा
Jayjayji Madanantak

कर्पूरगौरं
शंकरकर्पूरगौरं करुणावतारं
Karpuragauram

लवथवती विक्राळा
शंकरलवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
Lavthavati Vikrala

जय देव जय देव श्रीमंगेशा
शंकरजय देव जय देव श्रीमंगेशा
Jay Dev Shrimangesha

शंकराची भूपाळी
शंकरधवळे भोळे चक्रवर्ती धवळे अलंकार शोभती
shankarachi bhupali