मुख्य मजकुराकडे जा

व्यक्ती

संत एकनाथ

Sant Eknath

१५३३–१५९९ · पैठण

ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्यामधील दुव्यासारखे संत. जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु.

‘एकनाथी भागवत’ ही भागवताच्या अकराव्या स्कंधावरील टीका आणि ‘भावार्थ रामायण’ ही त्यांची मोठी कामे. विस्कळीत झालेल्या ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत त्यांनी सिद्ध केली.

‘भारुड’ या रूपकात्मक लोकनाट्यप्रकारातून त्यांनी अध्यात्म सामान्यांपर्यंत पोहोचवले.

स्रोत प्रचलित चरित्रपरंपरा

पडताळणी बाकी — जन्म-मृत्यूची वर्षे परंपरेनुसार; अभ्यासकांत मतभेद आहेत. चूक कळवा.