व्यक्ती
संत तुकाराम
Sant Tukaram
१६०८–१६५० · देहू
वारकरी संप्रदायातील सर्वात प्रभावी अभंगकार. व्यापारी कुटुंबात जन्म; दुष्काळात कुटुंब आणि व्यवसाय गमावल्यानंतर ते पूर्णपणे विठ्ठलभक्तीकडे वळले.
त्यांचे अभंग थेट, रोखठोक आणि सामान्य माणसाच्या भाषेतले आहेत. कर्मकांड, दांभिकता आणि जातिभेद यांवरची त्यांची टीका आजही तितकीच धारदार वाटते.
‘तुकाराम गाथा’ या नावाने त्यांचे हजारो अभंग संकलित आहेत.