मुख्य मजकुराकडे जा

संतसाहित्य

आनंदाचे डोहीं

Anandache Dohi

आनंदाचे डोहीं आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचें ॥१॥
काय सांगों झालें कांहींचियाबाहीं । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

स्रोत पारंपरिक मौखिक पाठ

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित गाथेशी पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.