मुख्य मजकुराकडे जा

संतसाहित्य

सुंदर ते ध्यान

Sundar Te Dhyan

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीहार गळां कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥२॥
मकरकुंडले तळपती श्रवणीं ।कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥३॥
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।पाहीन श्रीमुख आवडीनें ॥४॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

स्रोत पारंपरिक मौखिक पाठ

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित गाथेशी पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.