संतसाहित्य
वृक्षवल्ली आम्हां सोयरीं
Vrukshavalli Amha Soyari
वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुणदोष अंगा येत ॥२॥
आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥३॥
कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥४॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुचि ॥५॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणासीं ॥६॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.