संतसाहित्य
जे का रंजले गांजले
Je Ka Ranjale Ganjale
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥३॥
ज्यासी अपंगिता नाहीं । त्यासी धरी जो हृदयीं ॥४॥
दया करणें जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥५॥
तुका म्हणे सांगूं किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥६॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.