मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
श्री विष्णूची आरती

भक्ती

श्री विष्णूची आरती

Shri Vishnuchi Aarti

रचना — संत एकनाथ · १५३३–१५९९

संतसनकादिक भक्त मिळाले अनेक ।स्वानंदें गर्जती पाहूं आले कौतुक ॥ १ ॥
नवल होताहे आरती देवाधिदेवा ।स्वर्गींहुनी सुरवर पाहूं येती केशवा ॥ धृ ॥
नर नारी तटस्थ टक पडिलें नयना ।ओवाळींतां श्रीमुख धणी न पुरे मना ॥ नवल ॥ २ ॥
एका जनार्दनीं मंगल आरत्या गाती ।मंगल कौतुकें गाती ।मिळाले वैष्णव जयजयकारें गर्जती ॥ नवल ॥ ३ ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — मराठी आरती संग्रह (मुद्रित)