मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
आरती अनंतभुजा

भक्ती

आरती अनंतभुजा

Aarti Anantabhuja

आरती अनंतभुजा । विठो पंढरिराजा ॥न चलती उपचार । मनें सारिली पूजा ॥ धृ ॥
परेस पार नाहीं । न पडे निगमा ठायीं ॥भुलला भक्तिभावें । लाहो घेतला देहीं ॥ आरती ॥ १ ॥
अनिर्वाच्या शुद्ध बुद्ध । उभा राहिला नीट ॥रामाजानार्दनीं । पायीं जोडिली वीट ॥ आरती ॥ २ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ठायीं
— ठिकाणी

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — मराठी आरती संग्रह (मुद्रित)