मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
श्री विंध्यवासिनी माता आरती

भक्ती

श्री विंध्यवासिनी माता आरती

Vindhyavasini Mata

जय जय जगदंबे, श्री अंबे, विंध्यवासिनी माता जय जय जगदंबे ।।धृ।।
अनुपम स्वरुपाची, तुझी घाटी, अन्य नसे या सृष्टी, तुजसम रुप दुसरेपरमेष्टी, करिता झाला कष्टी, शशीरस रसरसला, वदनपुटी,दिव्यसुलोचन दृष्टी सुवर्णरत्नांच्या, शिरी मुकुटी, लोपती रवि शशीकोटी,गजमुख तुज स्तविले, हे रंभे मंगल सकलरंभे,जय जय जगदंबे, श्री अंबे, विंध्यवासिनी माता जय जगदंबे ।।१।।
कुंकुम गिरी शोभे, मळवटी, कस्तुरी तिलक ललाटी,नासिक अति सरळ, हनुवटी, रुचिरामृत रस ओढी,कमान जणू लावल्या धनुकोटी, आकर्ण लोचन भृकुटीशिरी नीट भांगवली, उफराशी, कर्नाटकची घाटी,भुजंग निलरंगा परिशोभे वेणी पाठीवरती लोंबे।जय जय जगदंबे, श्री अंबे, विंध्यवासिनी माता जय जगदंबे ।।२।।
कंकण कनकाचि मनगटी, दिव्यमुथा दशकोटी, बाजुबंद नवेबाहुटी, चर्चुनी केशर उटी, सुगंध पुष्पांचे, हारकंठी,बहुमोत्याची दाटी, अंगी नवी चोळी जरीकाठी,पीत पितांबर, तगटी, पैंजण पदकमळी, अती शोभे भ्रमर धावती लोभे।जय जय जगदंबे, श्री अंबे, विंध्यवासिनी माता जय जगदंबे ।।३।।
साक्षण तू क्षितीच्या तळवटी, तुची स्वये जगजेठी,ओवाळीन आरती दिपताटी, घेउनी करसंपुष्टी,करुणामृत हृदये, संकष्टी, धावसी भक्तासाठी,विष्णुदास सदा बहुकष्टी, देशिल जरी निजभेटीतरी मग काम उणे, या लाभे, धावपाव अविलंबे।जय जय जगदंबे, श्री अंबे, विंध्यवासिनी माता जय जय जगदंबे ।।४।।

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तुज
— तुला

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Durga Mahishasura-mardini, the slayer of the buffalo demon, Germany.jpg — Raja Ravi Varma, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

दुर्गे दुर्घट भारी

देवी

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी

Durge Durghat Bhari

श्री शांतादुर्गेची आरती

देवी

जय देवी जय देवी जय शांते जननी दुर्गे बहुदुःखदमने रतलो तव भजनी धृ

shri shantadurgechi arati

सत्याम्बा व्रतकथा

देवी

श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतै नमः श्रीगुरवे नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् सर्वे श्रोताराः सावधाना भवन्तु

Satyamba Vratkatha, adhyaya 1

सत्याम्बा व्रतकथा

देवी

सूत म्हणतात, 'हे ब्राह्मणांनो पूर्वी हे सत्यांबाव्रत कोणी कसे केले हे सर्व मी सांगतो, तुम्ही भक्तियुक्त अंतःकरणाने ते ऐका १

Satyamba Vratkatha, adhyaya 2

सत्याम्बा व्रतकथा

देवी

सूत म्हणतात, 'हे श्रोत्यांमध्ये श्रेष्ठ, भक्तितत्पर, महाभाग्यवान् शौनका, अशाप्रकारे या मृत्युलोकी मुक्ति देणारे हे सत्यांबादेवीचे व्रत प्रगट झाले १

Satyamba Vratkatha, adhyaya 3

सत्याम्बा व्रतकथा

देवी

सूत म्हणतात :- ऋषी हो, आणखी मी एक कथा सांगतो; ती तुम्ही श्रवण करा. जिच्या योगाने शेवटी मोक्ष मिळतो. १

Satyamba Vratkatha, adhyaya 4