मुख्य मजकुराकडे जा

सण व परंपरा

दिवाळी

Diwali

आश्विन कृष्ण त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया

दिव्यांचा सण आणि वर्षातला सर्वात मोठा उत्सव. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे सलग दिवस.

पहाटे उठून सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान, दारात रांगोळी, आकाशकंदील आणि पणत्यांची रांग ही महाराष्ट्रातली ओळख.

फराळाशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही — चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे, करंजी आणि अनारसे.

स्रोत प्रचलित परंपरा

पडताळणी बाकी — रूढी प्रदेशानुसार बदलतात. चूक कळवा.