सण व परंपरा
मकर संक्रांत
Makar Sankrant
पौष — साधारण १४ जानेवारी
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस. भारतीय सणांपैकी हा एकमेव सण सौर गणनेवर आधारित असल्याने दरवर्षी जवळपास एकाच तारखेला येतो.
‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ — तीळ आणि गूळ वाटून जुने वाद विसरण्याची प्रथा. थंडीत तीळ आणि गूळ शरीराला उष्णता देतात, हा त्यामागचा व्यावहारिक विचार.
नवविवाहितेचे हळदीकुंकू, काळी साडी आणि हलव्याचे दागिने ही या सणाची खास महाराष्ट्रीय रूपे. पतंग उडवण्याची प्रथाही अनेक भागांत आहे.