मुख्य मजकुराकडे जा

सण व परंपरा

नवरात्र

Navratri

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी

देवीच्या नऊ रूपांची नऊ रात्री उपासना. घरात घटस्थापना करून रोज माळ चढवली जाते आणि अखंड दीप तेवत ठेवला जातो.

महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे — कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी — या काळात गजबजून जातात.

याच दिवसांत मुली भोंडला किंवा हादगा खेळतात. दहाव्या दिवशी दसरा — सीमोल्लंघन आणि आपट्याची पाने वाटण्याचा दिवस.

या दिवशी म्हटले जाणारे

स्रोत प्रचलित परंपरा

पडताळणी बाकी — रूढी प्रदेशानुसार बदलतात. चूक कळवा.