सण व परंपरा
आषाढी एकादशी
Ashadhi Ekadashi
आषाढ शुद्ध एकादशी
वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा दिवस. आळंदीहून ज्ञानेश्वरांची आणि देहूहून तुकारामांची पालखी निघते आणि लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला पोहोचतात.
वाटेत दिंड्या, अभंग, फुगड्या आणि रिंगण — वारी हा केवळ प्रवास नसून चालणारा उत्सव आहे. जात, वय आणि गाव विसरून सगळे एकमेकांना ‘माउली’ म्हणतात.
या दिवशी उपवास केला जातो आणि चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते.