करुनि नमन सीता वल्लभाच्या पदातेंकथिन पदरजाच्या कीर्तिच्या - संपदातेंजड शिळ तनु झाली जे अहिल्या मतीचीनिज चरणरजें ते उद्धरुं राम तीची ॥१॥
सुरेंद्रें अहिल्या - सतीसीं रमायातिला दाविली गौतमाकार मायाप्रिया आत्मयाची तसा भाव दावीअहंकार बुद्धीस ते पैं वदावी ॥२॥
अहंकार इंद्र प्रियात्मत्व दावीरमे बुद्धिसी ते अहिल्या वदावीशिळा देह जो मी गमे ज्या मतीतेंजगीं उद्धरुं तो पदें राम तीतें ॥३॥
चिच्छक्ति चित्स्फुरण निर्मळ ज्या मतीतेंआत्मा सदा प्रिय गमे सुख धाम तीतेंते आत्मता तसिच मानुनि मी पणानेंसंपादिते तनु शिळापण आपणातें ॥४॥
अहिल्या तसी स्वप्रियाकार मायान जाणोनि गेली पराशीं रमायाघडे या निमित्यें शिळाशाप तीतेंपती मानितां त्या शचीच्या पतीतें ॥५॥
गौतमें करुनि कोपतीव्रताशापिली निजसती पतिव्रतापावऊनि अधमाधमा गतीमानिली निरपराध मागुती ॥६॥
शापूनि होय अनुतप्त मुनी सतीतेंकीं ठाउकें न सुरकृत्रिम जीस तीतेंम्यां शापिली तरि जडात्मकता मतीचीनाशी रघूत्तम तशी हरु राम तीची ॥७॥
सागरी दगड राघव तारीये शिळेसि विभु तो अवतारीउद्धरी जिस जड भ्रम तीतेंराम उद्धरि जसा कुमतीतें ॥८॥
कानीं असें वचन आयकतां पतीचेंझालें अचेतन शिळामय रुप तीचेंनासा स्तन श्रवण केशहि वेगळालेदेखूनि बाष्प मुनिच्या नयनीं गळाले ॥९॥
अवयव अवघेही हे यथा पूर्व सारेकुरळ पसरलेते मूर्धजांचे पसारेकरितिल वनिं चूर्ण श्वापदांचेच पेटेह्नणुनि मुनी मनी हा शोक वन्हीच पेटे ॥१०॥
देखतां मुनि तिला तनुकंपापावला उपजली अनुकंयाशोक होउनि अपार सतीचावेचवी तय कृपारस तीचा ॥११॥
विनावृक्ष येथें नसो जीव जातीगजव्याघ्र निर्जीव होऊनि जातीहिला पाय लागो मृगांकाननाचाघडो जंगमा त्याग तों काननाचा ॥१२॥
वचन हें निघतां ऋषि आननींवसति जंगम जीव न काननींविपिन शासन येरिति नेमुनीनिज तनू बदरी प्रति ने मुनी ॥१३॥
साठी सहस्त्रां - वरुषीं अजालावंशीं रवीच्या मग जन्म झालातो राम सीता वरण प्रसंगेंये त्या वना कौशिक विप्र संगे ॥१४॥
तो स्थावरांविण न देखत जंगमातेंसर्वज्ञ रामहि वदे अजि सांग मातेंहांसे ह्नणे मुनि सुरांविधिपूर्वकांहींतूं निर्मिता विदितसे तुज सर्व कांहीं ॥१५॥
सर्वज्ञ राम अजि लौकिक भाव दावीम्यां कां तयाप्रति न पूर्व कथा वदावीसांगे ह्नणोनि ऋषिवर्य मुनींद्र रामा -वार्त्ता दिवाकर कुळांबुधिचंद्र रामा ॥१६॥
कथि कथा कुशिकान्वय नंदनश्रवण तें करितो रघुनंदनसकळ पाहति गौतम आश्रमानयनिं देखति विप्रवधूश्रमा ॥१७॥
शिळा सारी नारी हसित अधरीं मंद मिरवेमुखीं चंद्र ज्योत्स्ना अवयव यथा पूर्व बरवेऋषी विश्वामित्रा प्रति सकळ देखूनि पुसतीमुखें कोण्या हांसे ह्नणति वद जी गौतम सती ॥१८॥
दिल्हें तया उत्तर कौशिकानेंकीं शाप हा आइकतां स्वकानेंझाली सती ते अति दीन वाणीआक्रंदली सुस्वर दीन वाणी ॥१९॥
करुनी गळा मोकळा सारसाक्षीरडे कीं अगा सर्व संसार साक्षीपतिप्रीति कामी नसें पाप कामींअसी ते पहा पावले शाप कामीं ॥२०॥
पतिव्रता मी पतिहार कंठींघालूनि धर्मे निज काळ कंठींवेशें तया इंद्र भुजंगमा तेंघे तो डसे दुष्ट भुजंग माते ॥२१॥
ज्याला तपें सकळ भूत भविष्य ठावेंऐश्या पतीसहि असें तम कां उठावेंगेली स्वकांत ह्नणऊनिच जे रतीतेंशापें तिला रचियला अपकारतीतें ॥२२॥
इत्यादि शोक परिसोनि मुनी सतीचामानी मनीं निरपराध विलास तीचाआली कृपा तंव बहू ऋषि गौतमातेंबोले त्यजूनि अति दीर्घतमा - तमातें ॥२३॥
ह्नणे स्पर्शला काम देवाधमातेंअहिल्ये तसा झोंबला क्रोध मातेंभली तूंचि मी इंद्र दोघे समानत्रिलोकीं न होतील आह्मांस मान ॥२४॥
चित्तीं मला उपजला अनुताप साचादुर्वार शाप अति दारुण तायसाचाहे नाशिलें सुकृत म्यां तंव घात - पातेंआतां कृपें करुनि वेचिन वो तयातें ॥२५॥
हा शाप आणि पुरुषांतर तूज लागेस्पर्शे अकल्पित तंई अघ तूज लागेदोहींस या परि हरुनि समागमातेंमाझ्या पुन्हा मिळशि तूं वर माग मातें ॥२६॥
हें आयकोनि अबला ऋषिवर्यवाणीआतां नको करुं ह्नणे करुणेसि वाणीदे एक थोर वर येरिति कीं कदापीमीन च्यवेंन मज कोणहि लोक दापी ॥२७॥
ऋषि ह्नणे असि हे वर मागतीकशि घडे इशि हे परमा गतीबहुत दीर्घ विचारुनियां मुनीहसित वत्क्र वदे तिस नेमुनी ॥२८॥
ह्नणे सूर्य वंशांत पूर्णावतारीशिळा सागरा - माजि जो देव तारीघन श्याम तो राम लाऊं पदांतेंतुतें आणि दे चिंतिल्या संपदांतें ॥२९॥
पडे शब्द कानीं जसा हा सतीच्यासुखें येत रोमांच देहास तीच्याजगीं पूर्ण जीच्या निजानंद झालामनी आठवी रामचंद्रा अजाला ॥३०॥
झाली शिळा परि मनीं सुख तें सतीच्याअद्यापिही दिसतसे मुखिं हास्य तीच्यारामाचिया स्मरतसे त्दृदयीं पदातेंहो हास्य सूचवि मनोगत संपदातें ॥३१॥
हें आयकोनि मग या रिति हो प्रसंगेंइंद्राचिही पुसियली गति विप्रसंगेंबोले ऋषी सतिस जो मुनि देवरायातो ये कृपा कुतनु देखुनि दे वरा या ॥३२॥
अहिल्या सती शापिली कोपतापेंसुरेंद्रासि तेव्हां तपाच्या प्रतापेंह्नणे प्रीति ऐसी जयाला भगाचीतनू हो सहस्त्राभगीं दुर्भगाची ॥३३॥
तेव्हां मुनीतें अनुताप झालादेखोनि अक्रोध महा द्विजालासमागमें इंद्रहि काननातेंचाले स्वयें झांकुनि आननातें ॥३४॥
देखोनि दीन मुनि सत्तम देवरायाशापापहार करि ये रितिं दे वरायाकींहीं भगें दश शतें नयना कृतीतेंपाऊनि सूच उत भाव जना कृतीतें ॥३५॥
केलीं भगें नयन यांत असी कृपा हेकीं लोचनीं दशशतीं अति दुर पाहेचित्तीं धरुनि अनुताप असीं कदापीकर्मे नको करुं असा सविवेक दापी ॥३६॥
निरोप देऊनि सुराधिपातेंशिळा सती आळवि त्र्प्र श्रुपातेंगेला तपस्वी परमा - तपातेंशोषीतसे वर्ष हिमातऽपातें ॥३७॥
तदारभ्य हा ईस कांतार वासस्मरे हे शिळा होउनी राघवाससुखे त्या मुखीं हास्य सद्भाव दावीमुनी हो इची काय शोभा वदावी ॥३८॥
असें विश्वामित्रा हसित पुसतां विप्रनिकरींतयातें हे वार्ता कुशिक - सुत तो वर्णन करीकर श्रीरामाचा धरुनि ऋषि वृंदातुनि मुनीपुढें ने श्रीरामा पद इस ह्नणे लावि नमुनी ॥३९॥
श्रीराम तेव्हां तिस पादपद्मालावी वसे ज्यांत अखंड पद्मातों रामराम ध्वनिं आननांतत्वरें उठे गर्जत काननांत ॥४०॥
ते जो उठे गर्जत रामरामप्रतिध्वनी होति मनोभिरामतो कौशिकादि द्विज राम वाणींउच्चारितां काय सुखासि वाणी ॥४१॥
स्पर्श कांचन करी परि साचाकाळिमा हरुनि त्या परि साचादेह हेम - परि सुंदर जालालागतांचि हरिपाद - रजाला ॥४२॥
जयिं मतिस चिदात्मा चित्पदीं भाव दावीजड - तनु तिचि ब्रह्म तेव्हां वदावीकपट पुरुष वेषें हे दशा जे सतीतेंरघुपति पद - पद्मीं स्पर्शतां नास तीतें ॥४३॥
पद - रजें उठतां कुशलक्षणींप्रथम पाय यवाकुशलक्षणीदिसति शोभति अद्भुत नूपुरेंस्मरति ज्यासि विरंचि तनू पुरें ॥४४॥
उठे तो पुढें राम कोदंड पाणीगळां हार मुक्ता फळांचे सुपाणीघनःश्याम दृष्टी दिसे कामिनीच्याप्रभा अंबरीं दिव्य सौदामिनीच्या ॥४५॥
सजळ जळद वर्णा दुःख संसार भंगाकनक रुचिर वर्णा सूर्य कोटि प्रभंगासशर करिं धनू त्या राघवा सानुजातेंस्तवित कमळ - नेत्रा कुंडलास्यां बुजातें ॥४६॥
पद रजा जसि लाधलि दुर्लभापरम विस्मित गौतम - वल्लभाकरुनि मागुति मागुति वंदनास्तवितसे स्वमुखें रघुनंदना ॥४७॥
ब्रह्मादिही हुडकिती पद - नीर ज्याचातो रेणु लाभ मज आजि तया रजाचाकेले मला परम धन्य जगान्निवासानासूनि शाप तनु दुःख अरण्य - वासा ॥४८॥
स्व - पद - रज जयाचे उद्धराया उपायत्रिगुण विरहिता या देह ना हात पायप्रथम नवल हें कीं जन्म त्याही अजालातदुपरि चरणाच्या रेणुचा स्पर्श झाला ॥४९॥
चाले वदेही वरदान देहीतथापि हा राघव दान देहीन देह हा भाग्य अहो जनाचेंविचित्र कर्त्तव्य निरंजनाचें ॥५०॥
मनुष्य या शुद्ध निरंजनालाजो मानितो त्या अबुधा जनालामोहावया राम तसेंचि दावीविचित्र याची करणी वदावी ॥५१॥
सुर - नदी भुवन त्रय पावनीपद - रजें प्रभु तो मज या वनींजड शिळत्व निवारुनि दीसतोधरिन मी मनिं योमिनि दीस तो ॥५२॥
सेव्य जो सकळ देव दानवींत्या शिवासही शिरीं सदा नवीते नदी जसिच पाद - नीर जीधन्य मी तसिच पादनीं रजी ॥५३॥
विधि भवासहि पावन नीर जीजनन त्यास तुझ्या पदे - नीरजीमज शिळेशिहि हे तनु संपदातच पदींच नमो अजि या पदा ॥५४॥
पदरजेंचि पवित्र नदी सतीमजहि ते पद पावन दीसतीदिसतसे प्रभुचा मज वेष हीविभव हें किति वर्णिल शेषही ॥मनुज आकृति बाण धनुर्धराजळज - लोचन कौस्तुभ कंधरानयनि देखतसे तरि या विनाइतर दैवत मानुनि सेविना ॥ज्याचें पदाब्ज - रज धुंडिति वेद वाचानाभीसी संभव सरोरुह - संभवाचाघेणार नाम - रस - सार पुरारि - वाणीतो रामचंद्र भजतां मज काय वाणी ॥या दीन - पालन कथा खळशासनाच्यागाती निरुपिति सभे कमळा - सनाच्यात्या राघवा विण दुज्या कवणा भजावेंसर्वात्मता शरण एक तयास जावें ॥धरुनि स्तनीं लग्न संगीत वीणातुतें राघवा गाय वाणी प्रवीणाकुचाऽग्रावरी वर्षते नेत्र - पाणीत्दृदऽब्जीं जिच्या राम कोदंड - पाणी ॥तुतें ब्रह्म - लोकीं सदा गाय वाणीनसे जीस गातां निजानंद - वाणीस्तनाऽग्रावरी ते धवां अंबु जाचेअहो भाग्य त्या दिव्य नेत्रांऽबुजाचें ॥रघुपती तुज गाउनि भारतीसकळ मानितसे निज भार तीतनुवरी गुढियाच उभारतीउपजवी सनकादि सभा - रती ॥विधाता - पिता आणि तत्पुत्र - दारातुतें गातिगा रामचंद्रा उदाराअसा तूं जग - द्धाम विश्वा - भीरामातुझे पाद पद्मींच मी सुक्त रामा ॥६२॥
जे संपदा कमळजा सकळां सुरांचीजे माउली विधि हरादिक वांसुरांचीतेही स्तनीं पद तुझें निज संपदातेंमानी तया नमन मी करितें पदातें ॥६३॥
आक्रमी स्व - चरणें त्रि - जगातेंराम हा ह्नणुनि शास्त्रहि गातेंत्या पदा नमुनि गौतम जावाघे निरोप पति - सन्निध जावा ॥६४॥
श्रीत्रिविक्रम विराम वामनींनित्यही प्रियपणे नवा मनींचित्स्वरुप करि कामना शिलावामनें इतर काम नाशिला ॥६५॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.