हरिचरणसरोर्जी चित्सुधासारपानेंक्रमर परमयोगी गुंजती नामगानेंहरति सकळ दुःखा हीं सरवाचीं निधानेंवद वद वद जिव्हे वासदेवाभिधानें ॥१॥
हरिपण हरिनामें धातुमूर्तीसि आलेंहरिमय हरिनामें विश्व संतांसि झालेंभवभय हरिनामें साधकांचें पळालेंवद वद वद जिव्हे रामनामें रसाळें ॥२॥
हरितनु हरिनामें लेखिली सर्वभक्तींसहज - सुखनिधानीं देखिली ही विरक्तींशुक सनक मुखीं जीं गाइलीं जीत - मुक्तीवद वद वद जिव्हे टाकुनी लोकिकोक्ती ॥३॥
निगमहि हरिनामें गर्जती वर्णवर्णींपतित तरति नामें आश्रमी आणि वर्णीहरिपदिं हरिनामीं जेविं मुद्रा सुवर्णीजगिं कवण असा जो नाममाहात्म्य वर्णी ॥४॥
आकाश - अंत न कळोनिहि अंतरिक्षींआकाश आक्रमिति शक्त्यनुसार पक्षीनामप्रतापहि यथामनि याच रीतीसीमा न पावति तथापि मुनींद्र गाती ॥५॥
उडति मानसहंस जया नभींशलभ त्याचि नभीं उडतां न भीअजित - नाम - महत्त्व ऋषि श्रुतीवदति तेंचि वदेन यथामती ॥६॥
श्रुति - निगम - पुराणें - आगम - क्षीरसिंधुमथुनि अमृतरुप ग्रंथ हा दीनबंधुप्रकट करिल आतां वामनात्मा मुरारीश्रवण - पठनमात्रें जो सभ स्तांसि तारी ॥७॥
हा ग्रंथ याचिकरितां अमृताभिधानीनामें प्रसिद्ध हरिनामसुधा म्हणोनीजें नाम गोड महिमा अति गोड त्याचाजो वर्णितां अमृतरुप परादि वाचा ॥८॥
मोक्ष श्रुती वदति ज्यास गुणप्रसादेंतो पावतो सगुण नामसुधानुवादेंकोण्त्द्या मिसें करुनियो हरिनाम वाचेनेत्र प्रकाशति तयावरि माधवाचे ॥९॥
नारायणा म्हणुनि एक सतासि वाहेनारायणारव्य नर अन्य तयासि पाहेनारायणा म्हणति लोंकिकही प्रवाहींनारायणाऽक्षि विषय क्षण होति तेही ॥१०॥
आधींच साक्षि सकळांसिहि पाहताहेजो नाम घे करुण होउनि त्यास पाहेतो धन्य कीं क्षणहि ज्यावरि विष्णुदृष्टीथेंबीं तळें भरतसे करुणांबुवृष्टी ॥११॥
कर्मानुरुप फळदायक साक्षि दृष्टीसर्वावरी तसिच तत्करुणांबुवृष्टीआहे परंतु जनपातक आड जेथेंक्षेत्रें सुधेकरुनि त्या भिजवी न तेथें ॥१२॥
छाये सही सूर्य जसा प्रकाशीजाणे तसा साक्षिहि पापराशीवृष्टीसही तोचि करी तथापीक्षेत्रासि आछादिति लोक पापी ॥१३॥
नकळताहि पडे हा विष्णुनामाग्नि जेथेंदुरिततृणगृहाचें भस्म होणार तेथेंमग समकरुणेची आयती कृष्णदृष्टीभिजविल करितेजे सर्वसृष्टयर्थ वृष्टी ॥१४॥
जसें हेममुर्तीमधें हातपायींदिसे एक सोनेंचि तें सर्वठायींअसा विश्वरुपें स्वयें शेषशायीस्वनामें जना होतसे सौरव्यदायी ॥१५॥
घटादीक नारायणाचींच नामेंतर्हीं तींअविद्यामयें दुःखधामेंम्हणोनी पुराणप्रसिद्धें विचित्रेंजगत्यावनें विष्णुनामें पवित्रें ॥१६॥
महाभारतीं ये रिती धर्मराजा -प्रति श्रीपती देखतां भीष्म आजावदे कीं ऋषी वर्णिती जे पुराणींधरावी तया विष्णुनामीं शिराणी ॥१७॥
श्लोकार्थ तो कीं तुज भूमिपाळासांगेन ते मी हरिनाममाळाजेथें प्रसिद्धें गुणकर्मरुपेंनामें पवित्रें महिमाप्रतापें ॥१८॥
श्रुतिस्मृतीलागिं महापुराणींव्यासादिकांच्या वदताति वाणीनामें हरीचीं तुजतींच रायासांगेन सर्वासहि उद्धराया ॥१९॥
महात्मयाचीं तुज नामधेयेंसांगेन विख्यात मुनीद्रेगेयेंम्हणोनि भीष्मोदित पद्य जेथेंमाहात्म्य शब्दें गहनार्थ तेथें ॥२०॥
महात्मा हरी जो अशेयात्मभावेंघटादीक तेव्हां तयाचींच नावेंतर्हीं तारकें तीं जगाला न होतीजगत्पावनें जीं ऋषी वेद गाती ॥२१॥
म्हणोनि विख्यात मुकुंदनावेंजीं वणिर्ती वेद मुनीद्र भावेंसांगेन तींमी तुज भूमिपाळाप्रसिद्ध जे माधव - नाम - माळा ॥२२॥
थाकारणें जीं हरिनामधेयेंवेदीं पुराणीं मुनिवर्यगेयेंज्या त्या मिसें उद्धरिती जनालाजाळूनियां पाप - महा - वनाला ॥२३॥
भाषांतरी कल्पित नाम जेथेंश्रद्धानुरुपेंचि फळेल तेथेंप्रताप नैसर्गिक त्यास नाहींप्रसिद्ध नामीं फळ नेणतांही ॥२४॥
हें सर्व आपण चराचर देववर्यश्रीकांत कारण सुवर्ण समस्त कार्यनामीं स्वयें प्रगटतो भलत्याचि ठायींया भूषणीं कनक केवळ शेषशायी ॥२५॥
जगत् कार्य तो कारण श्रीमुरारीस्वयें तोचि सर्वी वसे निविकारीस्वरुपें स्फुरद्रूप सर्वत्र आहेमुखीं नाम ज्याचें तयालागिं पाहे ॥२६॥
अलंकार तो मागतां हेम आलानव्हे हेम हें बोलवेना तयालाअसीं रामकृष्णादि पुत्रादि नामेंतर्हीं सर्वही माधवाचींच धामें ॥२७॥
मागे अलंकार सुवर्ण त्यालादे केविं सोनार सराफ बोलाउच्चारिने लौकिक शब्द वाणीज्याची तया दुर्लभ चक्रपाणी ॥२८॥
न सोनें अलंकाररुपास साहेमृषा त्या सुवर्णात जो भासताहेअसे हेग मिथ्या अलंकाररुपीसुवर्णी अलंकार नाहीं तथापी ॥२९॥
अलंकारनामें नये हेम हाताअलंकार येतो स्वयें हेम येतांसमस्तांसही साधनी विष्णुनामेंन विष्णूस ही बाधती दुःख धामें ॥३०॥
या कारणें हरि म्हणाल जयासि जेवेंसर्वात्मते करुनि सिद्ध मुकुंद तेथेंबोलावितां निज - शिसूसिच त्याचि नावेंविख्यात अन्य नर ओ म्हणतो स्वभावें ॥३१॥
पृथ्वीछंद - सुवर्ण म्हणतां जसें कनककुंडलीं तें दिसेमुकुंद म्हणतां तसा जनसुतादिकी तो असेसतादि - सकळात्मने - करुनि वर्ततो जो हरीअशेष जनपानकें करुनि तो स्वभावें हरी ॥३२॥
अजितनाम वदो भलत्या मिसेंकरि कृतार्थ अमोध - सुधारसेंकरुनि शाकहि भक्षिल औषधीन करिते गुण हें न घडे कधीं ॥३३॥
न कळतां पद अग्निवरी पडेन करि दाह असें न कधीं घडेअजितनाम वदो भलत्या मिसेंसकळ पातक भस्म करीतसे ॥३४॥
श्रीविष्णुधर्मी मुनि वेचिरीरीऔरव्यापिती कीं जरि दुष्टचित्तींतो आठवीनां हरिपाप नाशीनेणोनिही अग्नि तृणादि - राशी ॥३५॥
हरी आठवीला जरी दुष्टचित्तींहरी पापमूळा कुमार्गप्रवृत्तीकळोनी जरी आठवीजे मुरारीहरी पातकें तो असीं याप्रकारीं ॥३६॥
न ठावा हरी आणि ठावीं न नावेंअशाच्या मुरवा नाम आलें स्वभावेंअनिच्छेकरुनी मुरवा नाम आलेंहरी मानितो कीं मला आठवीलें ॥३७॥
नसे द्वैत सर्वासही स्वात्मभावेंहरी आठवे आठवाच्या स्वभावेतयाचेचि वाचेसही नाम जेव्हांनरें त्या हरी आठवीलाच तेव्हा ॥३८॥
जर्हीं स्वात्मभाव स्फुरे सर्वभूतींस्फुरे तो अहंकार रुपीच चित्तींअहंशब्द जेथे स्फुरे नाम तेथेंस्मृति श्रीहरीची असे सिद्ध जेथें ॥३९॥
असाही हरी आठवीतील पापीहरी तो हरी सर्व पापें तथापिअसा आठवीनो अनिच्छेकरुनीतर्हीं नोकरी शुद्ध पापें हरु नी ॥४०॥
म्हणोनेच कीं अग्नि दृष्टांत येथेंन जाणोनिही घालितां भस्म तेथेंन जाणोनिही नाम याचेसी आलेंस्वभावें तर्हीं पाप त्याचें जळालें ॥४१॥
न जाणे शिशू अग्निची शक्ति कांहींजळो तूळ इच्छा असी त्यासि नाहींतर्ही घालितां अग्नि कार्यासराशींजळे ये रिती नामही पाप नाशी ॥४२॥
शिशुकरें अनळें कडवाजळेसहज अंगणिं दीसनसे वल्हेपरि घरांतिल बीजहि आडळेनजळती कणगींतिल जोंधळे ॥४३॥
विषयभोग - सुखात्मक - कामनासहज वेष्टुनियां असते मनामन कुकर्म तिच्याच बळें करीसकळपानकमूळ अशा परी ॥४४॥
हुडकुनी असी कुत्सित कामनानिजवरी हरिनामहुताशनाजरि अमंगळ चित्तहि घालिनीसकळ पातक बीजहि जाळिती ॥४५॥
न करुं पातक निश्वय हा घडेमन तथापिहि पापपथीं पडेजरि धरी हरिनाम कवित्व हेंअशुभही शुभ होइल चित्त हें ॥४६॥
जन न इत्सुनि श्रुद्धि असी जरीन कळतां हरि आठवितां तरीजळति पापकुळें अनळे जसींन कळतांहि तृणें जळती तसीं ॥४७॥
येथें म्हणालु जळती जरि सर्व पापेंमूळें न कां जळति नाममहाप्रतापेंनेणोनि नाम म्हणतां दुरिनासि जैसेंजाळी न कां सकळ पानकमूळ तैसें ॥४८॥
धातूवरी अनळ नेणत बाळ घालीतो अग्नि धातुमळ तो अनिशीघ्र जाळीताम्रादि भस्महि तया अनळेंचि जेव्हांकर्ना अभिज्ञ बहु जाळिल धातु तेव्हां ॥४९॥
पृथ्वी०- न जाणनहि ये मुरवा हरि तथापि पापें हरीस्मरोनि महिमा स्मरे वदनिं तींचि नामें जरीप्रवृनिविषयीं जरी असनि त्यां जनाचीं मनेंविरक्त करितो हरी स्वगुण - नाम - संकीर्त्तनें ॥५०॥
श्रीभद्भागवनीं अजामिळकथा व्यासें नृपातें शुकेंनामाचा अमित प्रताप वदतां हें वर्णिलें कौंतुकेतेथें निर्णय विष्णुदूत वदनी तो वामनाच्या मुरवेंतेथें नामसुधेंत वर्णिल हरी श्रोत्यांस जेथें सुरवें ॥५१॥
अध्याय तीन इतिहास महापुराणीटीका तदर्थ - वचना क्षितिलोक वाणीअध्याय एथ तितुकेच करी मुरारीतीहींसही चरण सुंदर चार चारी ॥५२॥
अध्याय तो प्रथम नामसुधेंत तेथेंत्याही मधें चरण हा पहिलाचि एथेंसंपूर्ण अर्पुनि मुकुंदपदारविंदींसर्वात्सने करुनि वामन त्यास बंदी ॥५३॥
षष्ठस्कंधमुखीं अजामिळ कथा संक्षेप टीका निचीश्रीगोविंद करील वामनमुरवें छायाऽत्मविश्रांतिचीश्रोत्यांच्या श्रवणोदरांत अळस त्रासें समासें करीव्याख्या नामसुधा हरी करिनसे जे पाप तापा हरी ॥१॥
परिसुनि शुकवाक्यें सर्व भूगोळ भूपेंनरककथनकाळीं तेथ ऐकोनि पापेंजननरकनिपातें फार संतप्त झालाजगदघहर रायें श्रीशुका प्रश्न केला ॥२॥
शुकाच्या मुरवें पंचमस्कंध कानींपरीक्षिन्नृपें आदरें आयकोनीचुके यातना केविं हा प्रश्न केलापुढें षष्ठ हा तेथुनि ग्रंथ झाला ॥३॥
जें पंचमीं हरिकथामृत दिव्य प्यालाउद्गाररुप अवघा अनुवाद केलायानंतरें पुसतसे परिहार पापाजो चूकवी नरक नामक - अग्निताथा ॥४॥
नृप म्हणे कथिल्या तुम्हि दुर्गनीपरि वदा चुकती कवणे रितीपुरुष आचरल्या कवणे स्थितीगमन तो न करी नरकाप्रती ॥५॥
प्रायश्चित्त अधानुरुप करितां हीं नासती पातकेंऐशा दुर्गनिनिर्गती कथियल्पा रायासि आधीशुकेंप्रायश्विन समस्त कर्ममय हें रायासि वाटे वृथाबोले कीं गजशौच हें सकळही याची नृथा कां कथा ॥६॥
हस्तीतें धुतलें जळीं बसविलें मालिन्यही नाशिलेंतेणें तें पहिलें स्वकर्म वहिलें तीरींच आरंभिलेंशुंडाग्रें धरिलें धुळीस भरिलें सर्वागही आपुलेंप्रायश्र्वित दिल्हें तथापि न भलें ज्याचें मन क्षोभलें ॥७॥
प्रायश्र्वित जना कृपामृतघना तें सांग कीं या मनापापाच्या दहनावरील पवना वारी हेरी कामनाजो पापी घटना प्रवृत्ति - रचना दुर्वार ते यातनाप्रायश्र्वित्त पुन्हा स्मरोनि वचना बोलें जगत्पावना ॥८॥
करी असा प्रश्न नरेंद्र जेव्हांरहस्य सांगे मुनिवर्य तेव्हांम्हणे खरें होतिल शुद्ध पायीन पापबीजें जळती तथापि ॥९॥
अज्ञा जनाला अधिकार जेथेंन पापबीजें जळतील तेथेंया कर्मशुद्धी गजशौचरुपाहें ही खरें तूं वदलासि भूपा ॥१०॥
मोठें प्रायश्र्वित तें आत्मविद्यानाशी जे कां पापमूला अविद्याविद्या नाशी पानकें आणि पुण्येंनानाजन्मीं संचितें जीं अगण्यें ॥११॥
हें तों खरें परि न जोंवरि चित्तशुद्धीतों प्राणियांसि न घडे निजबोधसिद्धीते शुद्धि तों भगवदर्पणकर्मयोगेंपापे स्वयें जळति सर्वहि त्या प्रसंगें ॥१२॥
कर्मे दासपणें करुनि निपुणें नारायणीं अर्पणेंयापातें क्षपणें रमापतिगुणें प्रेमामृता सेवणेंसत्संगीं वसणें स्मृतींत असणें एकांतिंचें बैंसणेंसर्वा हें करणें भवाब्धि तरणें दुर्वासना मारणें ॥१३॥
ऐसी केवळ भक्तिमात्र करितां कैवल्यही पावतीभक्तीवांचुनि अन्यथा न चुकती तेव्हां तरी दुर्गतीमद्याच्या कलशासि शुद्ध करितां व्यर्थेचि तीर्थे जसींश्रीगोविंद पदारविंद - विमुखा कर्मे समस्तें तसीं ॥१४॥
कृष्णार्पणें करिति जे निज सर्व कर्मेसिद्धी अनेक घडती हरिदास्य कर्मेपापें समस्त जळती उठती विरक्तीवाढे जसी जसि मुकुंद - पदाब्ज - भक्ती ॥१५॥
हरिभजनि असे तो शीघ्र कैवल्य लाधेनरक चुकति हें तों थोडियामाजि साधेम्हणउनि शुक बोले श्लोक ते व्यासवाणीसुजन धरुन चित्तीं हेचि गीर्वाण वाणी ॥१६॥
आयासाविण ही कथा परिसतां गोडी हरीच्या गुणींज्या चित्ता उपजे निघे सहज तें त्याच्या पदीं तत्क्षणींऐसें ये रिति अर्पिनी सहजही जे एकदां त्या मनाते स्वप्नीं नयनी न देखति यमा कैंच्या तयां यातना ॥१७॥
इतुकि ही हरिभक्ति कसी जनाम्हणसि साध्य जडा मलिना मनतरि नृपा हरि - नाम - सुधा - गुणेंसकळ साधनमात्र गमे उणें ॥१८॥
नकळतां हरि - नाम - सुधा मुखींजरि महत्व कळोनिहि वैखरीहरि म्हणे मग काय तया उरी ॥१९॥
सुतमिसें हरिनाम अजामिळेंवदनिं आणुनि उद्धरिलीं कुळेंशुक म्हणे इतिह सहि तो नृपातुज वदेन करुनि महाकृपा ॥२०॥
शुक्र म्हणे मुनि आइक राजयाद्विज अजामिळ - नाम कनोजयाद्विज कनोजपुरीं वृषली - पतीपरम पातकि पातक - संगती ॥१॥
दासीचा पति नष्ट दुष्ट अवघें ब्राम्हण्यही टाकिलेंअट्ठ्याशीं वरुषें वया सकळही त्यानें निसीं घातलेंतीच्या पोषण पालनार्थ सकळें तो आचरे पातकेंतीच्या गर्भदरींत जो उपजतां मानी मनीं कौतुकें ॥२॥
श्रुति वदति जयाचा गर्भ पोटांत जीच्यापुरुषचि सुतरुपें गर्भवासांत तीच्याकळत कळत जों जों पुत्र दासीस होतीद्विज सुख बहु तों तों मूढ मानी स्वचित्तीं ॥३॥
जरठ तो वृषळी - उदरीं दहासुनमिसें उपजोनि सुखी महासुनतिचे अति सादर खेळवीविविध लाड़रसें करि आळवी ॥४॥
नारायणारव्य सुत त्यांत कनिष्ठ झालातो आवडे अवघियांहुनिही तयालावृद्धासि वाउपरि होइल बाळ कैंचेंभावें अशा करित लालन फार त्याचें ॥५॥
जरठ खेळउनी निज बाळ तोसफळ मानि अजामिळ काळ तोपरिसतां वचनें मृदु बोबडींसुख - मृगाबुमधें मन दे बुडी ॥६॥
असा खेळवी पातकाच्या फळातेंकरी धन्य तन्नामधेयें कुळातेंतयाच्या मिसें नाम नारायणाचेंहरी सर्वही पाप त्या ब्राम्हणाचें ॥७॥
ये ये नारायणा रे वद वद चनें गोड नारायणा रेजेवीं नारायणा रे त्यजुनि मज नको जाउं नारायणा रेमातें नारायणा रे तुजविण न गमे वेळ नारायणा रे ॥८॥
उष्णांत नारायण खेळताहेगृहींच नारायण हा न राहेनारायणा शीतळ पाज पाणीनारायणीं रंगलि विप्रवाणी ॥९॥
नारायणा जें प्रिय रवाद्य व्हावेंनारायणा तें अनि शीघ्र द्यावेंनारायणा मी करुं काय वाणीनारायणीं रंगलि विप्रवाणी ॥१०॥
नारायणा वांचुनि मी न जेवीं नारायणा वीण न नीर सेवींनारायणा घुंडुनि शीघ्र आणी नारायणीं रंगलि विप्रवानी ॥११॥
नारायणास झणि होइल दुष्ट दृष्टीनारायणास झणि कीटक दंशदृष्टीनारायणास झणि रागिजतील कोणीनारायणस्मरणि रंगलि विप्रवाणी ॥१२॥
नारायणासम शिशु त्रिजगांत नाहींनारायणीं न अणुमात्रहि दोष कांहींनारायण प्रियतमे गुणरत्नरवाणीनारायण स्मरणिं रंगलि विप्रवाणी ॥१३॥
असा सर्वदा छंद नारायणाचा प्रियेसीं सदा वाद त्याच्या गुणांचा मनी स्वमिही लागला छंद ऐसा जसा जागरी वर्त्तवी स्वप्नि तैसा ॥१४॥
पापद्रुमीं नवल पुण्य फळसि आलेंनारायणा म्हणुनि तें सुतनाम झालेंनारायणा म्हणुनि यद्यपि पुत्र पाहेनामप्रताप उगला न तथापि राहे ॥१५॥
लक्ष्मीकांत कृपा - सुधाघन जगीं सर्वावरी वर्षतीजे कां पातक - झोंपडींत दडती त्यातेंचि न स्पर्शतीविप्राची अघझोंपडी न कळतां नामाग्निनें जाळिलीतेव्हां कृष्णकृपंबुवृष्टि सहसा माथां पडों लागली ॥१६॥
नामाग्निनें अघकुळें जळतां अशेषेंसंतोषला हरिनयावरि नामघोषेंद्याचा तयासि निज केवळ भक्तिधंदाऐसी अहो उपजली करुणा मुकुंदा ॥१७॥
टाकूनि तो वृषलिसंगति भक्तियोगींलागोनि अक्षय - निजात्मसुखासि भोगीऐसी कृपा उपजली करुणालयालानिर्माण ये विषयिं एक उपाय केला ॥१८॥
यमासही मोहन वासदेवें केलें असें कीं यमधर्मदेवेंअसोनि आयुष्यहि त्या द्विजाला निष्पाप तोही द्विज आणवीला ॥१९॥
आयुष्य शेष म्हणऊनिच त्या द्विजासीनेलें न विष्णुसदनाप्रति विष्णुदासींआयुष्य शेष असतां यमधर्मरायातो मृत्युकाळ गमला तरि विष्णुमाया ॥२०॥
अंतीं कथा शुकहि वर्णिल याच रीतीकीं वांचला तटुपरांतिक तो द्विजातीआयुष्यही सरलिया जरि विप्र वांचेप्रारब्धनेम लटिके मग या जिवांचे ॥२१॥
आतां म्हणाल सुतनाममिषेंच पापेंगेलीं जळोनि हरिनाम महाप्रतापेंत्याला न भक्ति घडली म्हणऊनि देवेंभक्तीनिमित्त दिधलें वय वासदेवें ॥२२॥
जे जे जीवनमुक्त ते भक्त मोठे प्रारब्धाचे भोगिती भोग खोटे ते प्रारब्धें सर्वथा जो न मोडी येथें कैसा आपुला नेम सोडी ॥२३॥
दिल्हें त्यासि आयुष्य हें कां म्हणावें यमा मोहिलें हेंचि अंगीकरावें पुढें शेष आयुष्य तें भक्तिभावें सरावें तदंतीं स्वलोकासि न्यावें ॥२४॥
असा माधवें सत्य संकल्प केला मनीं घातला मोह तेव्हां यमाला द्विजाचें कितीएक आयुष्य आहे कसा आणऊं मोहला हें न पाहे ॥२५॥
सुतमिसे हरिनाम मुखीं सदा जळति त्याकरितां अघआपदा परि अगोचर हा महिमा यमा म्हणुनि आणवि विप्रकुळाधमा ॥२६॥
द्विजाचे दुरन्याय ते आठवीले तिघे दूत आणावया पाठवीले उबे मस्तकीं तांबडे केश भारी मुखें वांकुडीं अंग नानाविकारी ॥२७॥
काळीं मुखें मारिति चंड हाका बांधा धरा हा नरकांत टाका धरुनि फांसे विकराळ हातीं दंष्ट्रा कराळा वदनीं न माती ॥२८॥
बहु त्रासला विप्र देखोनि त्यांला म्हणे त्रास होईल नारायणाला मुलांमाजि तो गुंतला दूरि खेळीं द्विजें त्यासि पाचारिलें अमतकाळीं ॥२९॥
अकस्मान नारायणा ये म्हणोनी म्हणे विप्र उच्चस्वरें आळऊनी यमाचा पडे लिंगदेहास फांसा उठे विप्रवाणीमध्यें घोष ऐसा ॥३०॥
निघे स्थूळ देहांतुनी लिंग जेव्हां सुताच्या मिसें नामवाचेसि तेव्हां उडी त्यामध्यें घातली विष्णुदूतीं गदा शंख पकेरुहें चक्र हातीं ॥३१॥
ने तोडिले पाश तिहीं यमाचे जे किंकर श्रीपुरुषोत्तमाचे दटाविले ते यमदूत दापें त्या ब्राम्हणा सोडविलें प्रतापें ॥३२॥
टकमका यमदूत तयांकडे चकित होउनि पाहनि बापुडे धरुनि धैर्य तथापिहि त्यांप्रती समयिं त्या यमकिंकर बोलती ॥३३॥
तीघे तयांसि म्हणती यमशासनालाउल्लंघणार तुम्हि कोठिल कोण बोलासांगा तुम्ही अमर कीं उपदेव किंवागंधर्व सिद्ध करणार सुरेंद्रसेवा ॥१॥
कोठें हो असतां अपूर्वदिसतां हेमांबरें नेसतांअम्लाना कमळांचिया अळिकुळीं माळा गळां घालितांचौघांही भुज चारि पीन सरळे श्रीचंदनें चर्चिलेचौघे रत्न - हिरण्य - भूषण - वरीं सर्वत्रही अर्चिले ॥२॥
शस्त्रास्त्रें धरितां समान तरुणे चौघे तुम्ही सांबळेडोळे भाळ विशाळ पुष्ट बरवे रुपें बळें आगळेनेजें आपुलिया दिगंत - तमही दुरुनि संहारितांदूतांला यमधर्मराजविभुच्या आम्हांसि कां वारितां ॥३॥
शुक्र म्हणे यमकिंकर येरिनी वदति विष्णुनिदेशकरांप्रति परिसनां हरिपार्श्वग हांसिले घनरवें मग गर्जत बोलिले ॥४॥
धर्मदूत तरि हे म्हणवीती पापहीन नरकाप्रति नेती भाव हा धरुनि आंत विनोदें पूसती हरिसभासद मौदें ॥५॥
धर्मराजविभुचे तुम्हि जेव्हां धर्म जाणत असा तुम्हि तेव्हांपूसनों म्हणुनि एक तुम्हांला धर्मतत्त्व तुम्हि सत्वर बोला ॥६॥
कर्त्ते सर्वहि दंड योग्य अथवा जीवांमध्यें नेमिलेकीं तें पाप असो नसो परि तुम्ही दंडार्हते लेखिलेऐसे तत्परिहास दास हरिचे हांसोनियां बोलिलेकीं निष्पातक जो तयासि नरका हे न्यावया पातले ॥७॥
विनोंदे असें दूत सर्वोत्तमाचे पुसों लागले दूत त्यांतें यमाचेप्रवृत्तिप्रवाहें यथाशास्त्र रीती बरीं उत्तरें मृत्युचे भृत्य देती ॥८॥
तीं वर्णिलीं मुनिवरें निवडोनि जेथेंसंक्षेप त्यामधुनही बदिजेल येथेंवैकुंठनाममहिमा श्रवणानिमित्तेंउत्त्कंलिते तदमृतार्थ तुषार्त्त - चित्तें ॥९॥
म्हणति विहित वेदीं धर्म त्याला म्हणावेंस्मृति - निगम - निषिद्धें ते अधर्म स्वभावेंशुभ अशुभहि कर्मे जीं करी जीव जेथेंतनु त्दृदयिं पहाती देव सूर्यादि तेथें ॥१०॥
देवांत साक्षि यमधर्महि त्यांत आहेपाप्यास तों तदनुरुपचि दंड पाहेजीवांसि पानकफळें सकळांसि देतोधाडूनि दूत निरयाप्रति त्यांस नेतो ॥११॥
प्रस्तूत हा द्विज अजामिल शुद्ध पूर्वीसंपन्न सर्व सुगुणीं अति - मान्य सर्वीआणावयास समिधा कुश पुष्प पानेंरानासि विप्रवर पाठविला पित्यानें ॥१२॥
परततां समिधा कुश घेउनी तरुण सुंदर देखिली कामिनीपुरुष एक तिसीं रत देखिला पिउनि मद्य मदें बहु मातला ॥१३॥
उपवनिं नरनारीद्वंद्व उन्मत्तभारीकुसुमशरविहारी युग्म दिग्वस्त्रधारीस्मर त्दृदय विदारी देखतां या प्रकारींद्विज जरि बहु वारी नावरे चित्तहारी ॥१४॥
मनासिज द्विजमानस या मिसें खवळुनी करि तीकरितां पिसें बहुहि आवरितां मन नावरे त्दृदयिं तो मकरध्वज वाबरे ॥१५॥
मग तिच्या सदनाप्रति जाउनी धन तिला तदपेक्षित देउनी रतिरसें वरि लंपट होउनी विचरला अधरासव सेवुनी ॥१६॥
पित्यानें बहू अर्जिलें वित्त होतें दिल्हें द्रव्य तें या द्विजें सर्व तीतें महा मोहला नीच - कांतांऽग - संगें स्वधर्मासही टाकिलें त्याप्रसंगे ॥१७॥
तिच्या स्नेहपाशें जसा बद्ध झाला न ते आवडे धर्मपत्नी द्विजाला तिला टाकिलें टाकिली मायबापें तिसीं आचरुं लागला सर्वपापें ॥१८॥
तिच्या पोषणा तोषणाच्या निमित्तें बहू मेळवूं लागला पाप - बित्तें तिला ध्यानसे सर्वदा दुष्ट चित्तें असा कंटिला काळ येणें प्रमत्तें ॥१९॥
या कारणें द्विजकुळाधम शीघ्र तेथेंनेऊं असे धरुनि दंड कृतांत जेथेंभोगील दुष्कृतफळा नरकासि जेव्हांहे पापभोग अवघे सरतील तेव्हां ॥२०॥
शुक म्हणे यमकिंकर ये रिती वदति धर्म अनेक तयांप्रतीश्रवणिं ऐकुनि या वचनास ते हरि हरी म्हणती हरिदास ते ॥२१॥
तो तों अजामिळ तिहीं द्विज सोडवीलात्याच्या हिनार्थ उपदेश तयासि केलानामप्रताप कथिला मग त्याप्रसंगेंनामें अमोघ हरिचीं जनपापभंगें ॥२२॥
नें उत्तर - प्रकरणीं जगदात्मबंधूबोलेल वामनमुखें करुणेकसिंधूस्कंधांत या प्रथम हाचि महापुराणींअध्याय दिव्य वदली मुनिवर्य - वाणी ॥२३॥
अध्याय जैसा पहिलाच तेथें तैसाच हा नामसुधतें येथें भावार्थ गूढार्थ यथार्थ - रुपें निरुपिला श्रीहरिच्या प्रतापें ॥२४॥
द्वितीयापासूनी धरुनि सकळा व्यासवचनाहरी टीकाकर्त्ता तदुपरि महाराष्ट्र रचनातथापि श्लोकाचें प्रति पद न भाषेंत मिरवेजसे देहीं डोळे दिसतिल तसे श्लोक बरवे ॥२५॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.