मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
नाम सुधा

साहित्य

नाम सुधा

अध्याय ३, भाग १ · श्लोक ३५३–५०२

nama sudha

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

हरिनामाचे माहात्म्य सांगणारा तीन अध्यायांचा ग्रंथ, प्रत्येक अध्यायात चार चरण. पहिल्या अध्यायातील श्लोक ‘वद वद वद जिव्हे’ या धृपदावर संपतात — जिभेला उद्देशून केलेली आज्ञा, तीन वेळा. नामाला येथे साधन म्हटलेले नाही; तेच साध्य मानले आहे.

अध्यायीं तिसर्या मुरारिचरणप्रेमें महा - निश्वयेंदूतांतें यमधर्मराज वदतो नामप्रताप स्वयेंऐसें गुह्य कसें अहो प्रकटलें श्रोत्यांस हें विस्मयेंहोती यास्तव वर्णितो मुनि नृपप्रश्नास पद्म - द्वयें ॥१॥
राजा पूसतसे स्वसेवकजनीं हें वर्णिल्याऊपरीत्यांसी तो यमधर्म त्या अवसरीं बोले कसी वैखरीआज्ञा मोडुनि पाश तोडुनि बळें वैकुंठिंच्या किंकरींपापी सोडविला असें परिसतां बोले कसें त्यावरी ॥२॥
स्वामी हा यम - दंड - भंग कवणापासूनि आम्ही असानाहीं आइकिला तुम्ही कथियला नामप्रतापें जसाहे इत्यादिक लोक - संशय जगीं छेदी असा दूसरानाहीं यास्तव धर्म काय बदला तो वाद सांगा बरा ॥३॥
मुनि बरासि असें धरणीश्वरें चरित हें पुसतां अति आदरेंअजित - नाम - महत्त्व - सुधा - रसें निववितो शुक मागुति या गिसें ॥४॥
शुक म्हणे नृपती हरि - किंकरीं फिरविले यमकिंकर यापरीसकळ सांगति सूर्य - सुताप्रती स्वपति जो यम संयमनीपती ॥५॥
कृतांतासही ऐकतांक्षोभ व्हावा धरुनी अशा बोलती दुष्ट भावाअसें बोलतां सप्तपद्यें विचित्र स्वयें सांगतो राजया व्यासपुत्र ॥६॥
शुक म्हणे यमदूत यमापुढें वदति कोपकरें वचनें दृढेंम्हणति शासनकार अहो किती त्रिभुवनीं वद संयमनीपती ॥७॥
करिति दंड उदंडहि जेधवां नियमभंगचि कीं मग तेधवांसरलिया वय आणविशी जया इतर येउनि सोडविती तया ॥८॥
करिति दंड अनेक असे जई प्रभुपणें अवघेचि नृथा तईसकळ मंडळनाथनृपासनें जसिं परस्पर मोडिति शासनें ॥९॥
तुजचि आजिवरी प्रभु लेखिलें न कधिं शासन आणिक देखिलेंनवल आजिच हें जनिं वर्त्तलें परमदुर्धर शासन पर्तलें ॥१०॥
पतित केवळ जो नृपलीपती द्विज तुझ्या वचनें नरकाप्रतीधरुनि चालवितां वरि सांवळे पुरुष चारि चतुर्भुज पावले ॥११॥
तिहिं असें तव शासन मोडिलें पतितबंधन तें दृढ तोडिलेंकवण ते प्रभु सांग बरें परी श्रवण योग्य असे असिले तरी ॥१२॥
आकर्षिला पतित घालुनि पाश जेव्हांनारायणा म्हणुनि मारिलि हाक तेव्हांचौघांचिही उडि तया समयांत आलीआलों झणी भिसि असी ध्वनि दीर्घ बोली ॥१३॥
महाराज ते सांग हे कोण वाचे यमातें असें पूसती दूत त्याचेअसें ऐकतां त्या यमें काय केलें शुकें हें वदायास आरंभियेलें ॥१४॥
शुक म्हणे यमकिंकर ये रिती पुसति ऐकुनि संयमनीपतीहरिपदांबुज हें स्मरला मनीं मग वदे हदयीं सुख मानुनी ॥१५॥
यम म्हणे स्वमनीं यमकिंकरा मजविणें न दिसे प्रभु दूसराम्हणुनि जो अखिलेश रमापती प्रथम वर्णिल त्यास तयांप्रती ॥१६॥
प्रभु मजविण मोठा ज्याचिया चित्स्वरुपींस्थिर - चर - जग ऐसें अंबरें - तंतु - रुपींस्थिति भव लय तीन्हीं अंशमात्रें करीतोरविसुत म्हणतो कीं स्वामि माझा हरी तो ॥१७॥
स्वयें विष्णुरुपें करी जो स्थितीतें जगत्कर्तृता त्याच लक्ष्मीपतीतेंकरी सृष्टितो ब्रम्हरुपें मुरारी तसा रुद्ररुपेंचि सं हारकारी ॥१८॥
वृषभ - नासिकिं घालुनि वेसनी वश करुनि जसा फिरवी धनीसकळलोक जया वश येरिति अवधियांहुनि थोर रमापती ॥१९॥
ऐसेंच तत्व तरि टाकुन वासुदेवाशास्त्रज्ञ ही करिति कां पर अन्यसेवाऐसे कथीं म्हणति ते परधर्म आतांयाचें रह स्यहि वदेल तयां स्वदूतां ॥२०॥
लोकीं द्विपाद पशु सर्व - मनुष्य झालेदुर्वासना मय - वनांत पळों निघालेबांधोनि त्यांस सकळांसहि उद्धरावेंकेलें तदर्थ निजवेखरिरुप दावें ॥२१॥
तद्वैखरी निगम रुपचि थोर दावेंजेथें अनेक गळबंधन देवनावेंतेथें असो पालतिया गळबंधनी तोकैसा तरी निगम - दाम - निबद्ध होतो ॥२२॥
दाव्यांत वद्व - पशु जे तितुक्यांस चाराघाली धणी म्हणुनि धांउनि येतिदारायेऊनियां धरितसेपशु आपलालाथारा तथा पिहिन जाणति त्या धण्याला ॥२३॥
या कारणें निगम सर्वहि थोर दावेंइंद्रादिरुपगळबंधन त्यांत नावेंकोण्या मिसेंकरुनि वैदिककर्म केल्यास्वर्गादिसद्गतिन दुर्गति त्यास मेल्या ॥२४॥
यज्ञादि सर्वहि फळें हरि तोचि देतोइंद्रादि सुख्य म्हणऊनि यजी जरी तोहे अस्पदादिक असीं निगमांत नावेंमूढा जनासि गळबंधन हेंच दावें ॥२५॥
आम्हासि आहुति समर्पिति आणि पूजाआम्हीं शिरीं धरुनि पाववुं देवराजादाळ्यांत बद्धपशुवन् गळबंधनेहींआम्ही उपास्य परि बाद्य जसे विदे ही ॥२६॥
आम्हास सर्व अधिकारहि वासुदेवेंहे दीधले विविध नेमुनि देवदेयेंहीं शासनें शिरिं धरुनि भितों तथालाआम्हा स्वतंत्रपण केविं घडेल बोला ॥२७॥
यमास सर्वोत्तमनात याचे जे बोलिले दूत सकोपवाचेयमें दिलें उत्तर हें तयांतें स्मरोनि सर्वेश्वर विष्णु चित्तें ॥२८॥
समस्तांहुनी थोर गोविंद ऐसें कळे जेरिती बोलिला धर्म ऐसेंतथाचेच ते चौघही दूत आतां असें धर्म बोलों पहातो स्वदूतां ॥१॥
तिहीं मोडिलें तूझिया संयमाला असें बोलिले दूत जे कां यमालावदाया तया गोष्टिच्या उत्तरातें पुन्हा वर्णितो धर्म सर्वेश्वरातें ॥२॥
सगुणनिर्गुण एक रमापती म्हणुनि वर्णितसे यम त्या प्रतीसगुण इच्छितसें नकळे कसें कथिल पद्ययुगें पहिलें तसें ॥३॥
मी धर्मराज सुरराज दिशाधिराजेब्रम्हादिदेव ऋषि आणिकथोर जेजेनेणों तदिच्छेत नजाणति तत्त्ववेत्तेऐशास जाणति कसे जन आणि ते ते ॥४॥
सगुणचेष्टित हें न कधीं कळे अगुण तो कवणासहि नाकळेम्हणुनियां वर संयमनीपती अकळ निर्गुण वर्णिल त्यांप्रती ॥५॥
प्राणोंद्रियादि सकळांसहि जो कळेनावाचेस आणिकमनासिहि आकळेनाशुद्धें मनें अनुभवाप्रति ये तथापीतेव्हां पतंग मन होय चिदात्मदीपीं ॥६॥
ऐसा अतर्क्य हरि त्या प्रभु माधवाचेते दूत होतिल म्हणे यमधर्म वाचेश्लोकद्वयें करुनि हेंचि वदेल आतांटीकामुखें करुनि होइल सौख्य संतां ॥७॥
तुम्हि मनोहर जे नर देखिले निजसुखात्मरसें करिं रेखिलेमज गमें बहुतेक रमापती जवळि ते असणार महामनी ॥८॥
हरिगुण हरिरुपें दूत ते माधवाचेहरिमयजग दृष्टीं पाहती नामवाचेसुरवर शिरिं त्यांच्या वंदिती पायधूळीत्रिभुवनिहरिभक्तां रक्षिती सर्वकाळीं ॥९॥
जगिं अदृश्यपणें जन लक्षिती भगवदीक्षणमात्र अपेक्षितीहरि - जनासि कधीं न उपेक्षिती मजहिपासुनिये रिति रक्षिती ॥१०॥
नारायणा म्हणुनियां म्हणतांचि वाचेते छेदिले तिहिंच तैं दृढ पाश त्याचेकानीं मुखांत नरकांतक नाव जेथेंकैंचें उरे नरकदुर्गति - दुःख तेथें ॥११॥
वाटे तयांधर्म समस्त जाणों नामप्रतापास किमर्थ नेणोंयेथें पहा येविषयीं स्वदूतां श्लोकत्रयें वर्णिल काय आतां ॥१२॥
श्रीभद्भागवतांत भक्त हरिचे सप्रेम वारवाणिनीजे साक्षाद्भगवन्मुखें प्रगटलें कोण्ही तयां नेणतीते श्रीभागवताख्यधर्म कळती कैसे तुम्हाला अरेजो बाराजणमात्र जाणत असों ऐका तयातें बरें ॥१३॥
ब्रम्हा शंभु कुमार नारद शुक प्रर्हाद किंवा बळीकी वैदेहि मनु स्वयंभुस्कत जो कीं कौरवाचे कुळींजो गंगासुत भीष्म आणि कपिल प्रख्यात की मी स्वयेंजाणों वैष्णवधर्म जो कळलिया प्राणीत्तरे निश्वयें ॥१४॥
हा श्रीभागवतारव्यधर्म इतुक्यां बाराजणा ठाउकाकां तो गुप्त असा म्हणाल तरि तें सांगेन मी आइकाजो कां गुह्य निजात्म बोध गुरुच्या भक्तीविणें नाकळेतो हा वैष्णवधर्म विष्णुकरुणें वाचूनि कैसा कळे ॥१५॥
विज्ञान जें अतिरहस्य विशुद्धवेदींतेथेंचि भागवतधर्म न भक्ति भेदींज्याकारणें प्रिय कलत्र सुतादि वित्तेंतेव्हांचि भक्ति जरि तो उमजेल चिनें ॥१६॥
म्हणविती बहु वैष्णव आपणा परि न जाणति भक्तिचिया खुणाहरि असें दुसरें जरि नावडे तरिच ते हरिभक्ति तयां घडे ॥१७॥
प्रिय हरी सकळांहुनि जाणती परि जयास्तव ते प्रिय नेणनीभजति कीं सुख दे हरि आपणा प्रियतयीं निजजीव हरी उणा ॥१८॥
निजसुरवार्थ धनादि जसीं प्रियें प्रिय हरी स्वसवार्थचि निश्वयेंधन सुताहुनि आवडि आपुली नसिहईहुनी भक्ति नव्हे भली ॥१९॥
भजनि मुक्तिनिमिन हरी - जरी निजनिमित्त नदर्थ नव्हे तरीभजति मानधनार्थ नृपा जसे हरिस मुक्तिनिमित्तक हे तसे ॥२०॥
जरि न मुक्ति - निमित्तही सेविनी तरि किमर्थ उपास्य रमापतीजगिं वृथाचि न मंदहि वर्तनी बदति शास्त्र -विशारद येरिती ॥२१॥
प्रयोजना - वांचुनि मूर्ख ते ही प्रवर्तती न त्रिजगांत देहीशात्रज्ञ होऊन्मि वृथा हरीला कां सेवितां हे समजोनि बोला ॥२२॥
म्हणाल आतां गुण गोड भारी याकारणें आडवतो मुरारीसुधा बहू गोड सुरेंद्र - लोकीं ऐकोनि तीतें न भजाचि कां कीं ॥२३॥
स्वभक्ता न जाणे सुधा आणि कांहीं कृपाळू हरी - सारिखी होत नाहींअसें बोलती ते तयाला पुसावें कृपा घेउनी काय सांगा करावें ॥२४॥
कोण्या प्रकारें निजदुःख नाशी नासूनि दुःखा करि सौख्यराशीया कारणें तो प्रिय देव जेव्हां स्वप्रीतिदेवाहुनि थोर तेव्हां ॥२५॥
निजसुखार्थ हरी प्रिय जेधवां अधिक आपुलि आवडि तेधवांहरिहुनी प्रिय आणिकही असी निगम - संमत - भक्ति घडे कसी ॥२६॥
मैत्रेयीप्रति याज्ञयल्क्य निगमीं विस्तारहा बोलिलाकीं ज्यालागिं समस्त ही प्रिय असा आत्माच हा आपलाजो कां आवडतो निमित्त नसतां तो जाणसी जेधवांकांहीं ही तुज जाणणेंचि न उरे सर्वज्ञ तूं तेधवां ॥२७॥
जें जें लौकिक - सौख्य वैदिकहि जें ज्या आपणा कारणेंवाटे आवडतें तसा प्रियतम स्वात्गाचि जो आपणेज्याची आवडि निर्मिमित्त हरिही ज्याकारणें आवडेतोचि श्रीहरिसा कळे तरिच हे सद्भक्ति ठाई पडे ॥२८॥
आत्मा सर्व - जड - प्रकाशक असें लोकीं बहू जाणतीजाणोनि श्रुत - कीर्तनादि सगुण - प्रेमा मनीं नेणतीकोण्ही ते सगुणींच निष्ठ परि हा आत्मा प्रिय श्रीहरीऐसें भक्ति रहस्य नेणति न हे सद्भक्ति दोहीं परी ॥२९॥
म्हणतसे श्रुति की पशु तुल्य तो इतर मानुनियां हरि सेवितोम्हणुनि आत्मपणें हरि सेवणें परम - वैष्णव तो तरि बोलणें ॥३०॥
श्रुत्यर्थ तो स्पष्टचि दीसताहे न भेद हा वैष्णव - धर्म साहेऐवयेंचिजें कां भजणें हरीचें तेथेंचि हें भागवतत्व साचें ॥३१॥
गुरुमुखें कळली स्वचिदात्मता तदुपरांतिक जो गुरु देवताउभयभक्ति निजात्मपणें करी सकळ होय कृपा गुरुची तरी ॥३२॥
ऐसेंचि बोले श्रुति यस्य देवे म्हणुनियां अर्थ इचे पहावेधरुनि येथें स्फुट या श्रुतीतें यथामति व्याकरिजेल तीतें ॥३३॥
श्रुत्यर्थ कीं तत्वमसीति वाक्यें देवीं जसि भक्तिनिजात्म ऐक्येंजैसीच देवीं गुरुभक्ति जेव्हां तैसी करी सिद्धि तयासि तेव्हां ॥३४॥
आत्मा - नात्म - विवेक मात्र गुरुच्या तेव्हां कृपेनें कळेजीवेशैक्य उपाधिते निरसितां शिष्यास तें आकळेदेवीं आत्म - गत प्रियत्व उमजें तैसें गुरुचे स्थळींऐसी भक्ति करील चित्त - लहरी तेव्हां मुरे चिज्जळीं ॥३५॥
चित्ताची लहरी चिदंबुधिजळीं त्याची मुरे जेधवांचैतन्यास जडांत तंतुवसनीं देखे असें तेधवांज्ञानाचा परिपाक होय परिहें सर्वात्मभावीं जयींभक्ति श्रीगुरुदेवपादकमळीं याची ठसावे तयीं ॥३६॥
सहज आवडिजे निजिचा निजीं जितुकि भक्ति मुकुंदपदांऽबुजींश्रवणकीर्तन आवडिनें असा न करि वैष्णव तों वरितो कसा ॥३७॥
गुरुमुखें कळल्यावरि आत्मता सगुणभक्ति निरर्थक तत्त्वताम्हणति वैष्णव तेहिनसर्वथा वदति अद्वय शास्त्र वृथा कथा ॥३८॥
श्रवणकीर्तनभक्ति न जोंवरी मनन तों सगुणीं स्थिरता घरीनिज चिदात्मकता कळली जरी न हरि - भक्ति - विणें स्थिरता तरी ॥३९॥
म्हणुनियां म्हणते श्रुति कीं जयीं गुरु - रमापति - भक्ति घडे तयींगुरुवरें कथिले निगमार्थ ते अनुभवीं करिताति कृतार्थने ॥४०॥
सहज आत्मपणें हरि आवडे सगुणभक्ति तया वरि हे घडेअनुभव स्थिर होय तया नरा तरिच केवळ वैष्णव तो खरा ॥४१॥
म्हणुनि वैष्णव दुर्लभ या जगीं इतर वैष्णवना मिरवे उगींम्हणुनि वैष्णवधर्महि धर्म हा अकळतत्व तयासि वदे पहा ॥४२॥
वाराजणासि हरि - भक्ति - रहस्य ठावेंब्रम्हादि ते कथियले यमधर्मदेवेंते थोर सिद्ध इतरां अधिकार तेथेंनाहीं म्हणाल तरि धर्म वदेल येथें ॥४३॥
मनुष्यलोकांत मनुष्यलोकी मनुष्यमात्रासहि धर्म हा कींश्रीवासदेवीं निजभक्तियोगें आत्मत्वभावें भजणें असंगें ॥४४॥
हा भक्ति योग घडणार कसा मनुष्यांबोलेल तो यम उपाय तयां स्वशिष्यांश्लोकांत या चरणि शेवटिल्याच पाहाभक्तीस साधन उपाय वदेल जो हा ॥४५॥
हरिगुण - श्रवणें हरि आवडे भजन त्यावरि आवडिनें घडेपरि न प्रातकि या श्रवणीं रिती परमसाधन नाम असे रिती ॥४६॥
कोण्या - मिसें ये हरिनाम वाचे जळोनि जाती अति दोष त्याचेघे चित्त जेव्हां श्रवणादि गोडी गोडी हरीची मग त्या न सोडी ॥४७॥
श्रोते हो यमधर्म वाक्य वदला हें सूक्ष्म दृष्टीं पहाकीं नामग्रहणादिकीं करुनियां सद्भक्तिचा योग हातेंही कीर्तन हें नव्हें ग्रहण हें जें कां मुखीं उच्चरेश्रीमन्नाम तसें करी ग्रहण तें पापाऽब्धि जेणें तरे ॥४८॥
कोण्यासिसेंही हरिनाम वाचे येईल भाग्येंचि करुनि याचेश्रद्धा तया ऊपरि कीर्तनाची ते तों कृपा श्रीमधुसुदनाची ॥४९॥
जेथें निदर्शन अजामिळ पुत्रनावेंनारायणा म्हणुनिही म्हणतां स्वभावेंझालाचि मुक्त म्हणऊनि यम स्वदूतांश्लोक - द्वयेंकरुनि हेंच वदेल आतां ॥५०॥
उच्चारमात्रेंचि अजामिळाला प्रसन्न नामें जगदीश झालाहा एक पद्यें महिमा स्वदूतां बोलेल आधीं यमधर्म आतां ॥५१॥
मुखीं नाम तन्नाम - काच्याच भावें असें कीर्तन श्रीपतीचें म्हणावेंम्हणे नाम जाणोनि तन्नामकाला नजाणोनि तो नाम उच्चार झाला.नामोच्चारण विप्र मात्र करितां कैसा पहा सूटलाजो दुर्भेद्य कृतांत - पाश तुमचा तोही कसा तूटलानामोच्चार - महत्व - धर्म वदतां प्रेमा मनी दाटलादूतांला यम पुत्र हो म्हणतसे स्नेहाब्धि तो लोटला ॥५३॥
पृ० छंद - पहा नवल पुत्र हो यम म्हणे स्वदूतां कसेंनजाणतहि ये मुखा सहज नाम तेंही असेंअजामिळहि सूटला इतुकियाच मात्रें त्वरेंम्हणूनि हरि - भक्तिचीं प्रथम साधनें हीं अरे ॥५४॥
सहज नामहि नाशक पातकां स्मरणकीर्तनरुप तयासि कांपरम भक्ति रमापतिकीर्तनें प्रथम यास्तव नामचि साधनें ॥५५॥
बोलेल ऐसें यमधर्म आतां नामप्रतापासि तथां स्वदूतांतीं आयका हो वचनें विचित्रें पीयूषरुपें निजकर्णपात्रें ॥५६॥
पृ० छं- म्हणे यम तयांप्रती अद्य हरावयाकारणेंसमर्थ हरि कीर्तनें म्हणुनि काय हें बोलणेंउगेंचि म्हणतां मुखें निजसुतासि नारायणापहा परम मुक्तिही कसि अजामिळा ब्राम्हणा ॥५७॥
जळति अग्निकणेंचि तृणें जरी तरि तयां प्रबळाऽनळ कांपरीभल तसें हरिनाम अघें हरी श्रवणकीर्तन कां तरि त्यावरी ॥५८॥
चित्तीं नाम म्हणे स्मरे स्वःहदयीं तें नाम ज्याचें तथाऐसा तो जप आणि उच्च म्हणणें तें नाम जाणोनियांतें संकीर्तन आणि नाम म्हणणें नेणोनि तन्नामकातो उच्चार अजामिळासि फळला कैंसा पहा कौतुका ॥५९॥
नारायणा म्हणुनि केवळ आत्मजालाआकोशतां द्विज अजामिळ मुक्त झालायालागिं काय म्हणणें अघमात्र नाशीसंकीर्तनें जिहिंकरुनि सुखांऽबुराशी ॥६०॥
अजर अमर होती ज्या सुधेच्याच पानेंप्रथम सहज नाशे क्षुत्तृषा - दैत्य त्यानेंक्षुधित तृषित मानी लाभ तो तोचि भारीअघहर फळ नामीं वर्णिती या प्रकारीं ॥६१॥
नामद्रुमीं फळ चतुर्विध मुक्ति जेथेंतें पापतापहरणें तरि पुण्य तेथेंजें वीर - सैन्य भुवनत्रयराज्य साधीमार्गी तृणेंरगडिती चरणेंचि आधीं ॥६२॥
आत्मा हरि प्रिय असें समजोनि वाचेगानी गुण श्रवणिं आइकती तयाचेते भक्त दुर्लभ तरी अधिकार तेथेंसर्वा म्हणूनि वदला यमधर्म येथें ॥१॥
सर्वास भक्ति अधिकार जया प्रकारेंतोही उपाय वदला यम या विचारेंकीं साधन प्रथम माधवनाम घेणेंनाशूनि पाप भजनीं रुचि होय तेणें ॥२॥
त्याही मधें नकळतांचि जरी स्वभावेंयेती मुखा हरिति पातक विष्णुनावेंया कारणें स्मरणकीर्तन - रुप नामेंतीं मुक्तिहूनि अधिकें सुखपूर्णकामें ॥३॥
म्हणुनिनिर्णय वर्णियला यमें वदति जो मुनिहो निगमागमेंपरि न जाणति कर्मठ धर्म हा म्हणतसे यमधर्मचि तें पहा ॥४॥
म्हणाल नामीं जरि मुक्ति होते कां कर्ममात्रीं रत शास्त्रवेत्तेते मोहिले वैदिककाम्य - कर्मे बोलेले ऐसीं यमधर्म वर्मे ॥५॥
यम म्हणे निगमागम जाणती जन तयांसि महाजन बोलतीपरि तयांसि रहस्य न ठाउकें करितिकर्ममखादिक कौतुकें ॥६॥
विरळ त्यांत रहस्य विचारुनी तरति हे हरिच्या गुणकीर्तनींपरि अहो बहुतेक न जाणती मृगजळांत बुडोनिहि राहनी ॥७॥
यज्ञादिकींकरुनि होइल चित्तशुद्धीज्ञाने करुनि तदनंतर मोक्षसिद्धीया कारणें निगम बोलति यज्ञ - दीक्षाहे स्वर्ग - मात्र - गमनीं धरिती अपेक्षा ॥८॥
स्वर्गादिकाम करिती विविधां मखांसीते तों न पावति निजात्म महासुखासीकोशिंबिरी करुनि भक्षिति पुष्पमात्रेंत्याला फळें मग न त्यां तरुचीं विचित्रें ॥९॥
यज्ञादि - वृक्ष फळ मोक्ष तयांसि येतीस्वर्गादिरुप - सुमनें जन तींच घेतीसर्वज्ञ जे करिति त्या सुमनीं उपेक्षाहोऊनि तींच सुमनें फळ देति मोक्षा ॥१०॥
फुलोएं भक्षितो तो फळें केविं लाधे मनीं स्वर्ग कैंसा तया मोक्ष साधेमनीं कामना तेन तों चित्तशुद्धी अशुद्धां तयां केवि कैवल्यसिद्धी ॥११॥
स्वहित केवळ ते न अपेक्षिती तरिच ते हरिभक्ति उपेक्षितीत्यजुनियां अमरां अमरावती प्रतिहि जाउनि दुःखचि भोगिती ॥१२॥
जसा भाडियाचा तदू स्वर्ग तैसा तयाचा अहो मानिती लाभ कैसासरे पुण्य लोटूनियां देति जेव्हां रडे फुंढफुंदों पडे मूळ तेव्हां ॥१३॥
धरुनी भुजीं कंठ देवांगनाचे विमानी वनी नंदनी तेथ नाचेभुजें त्याच त्यांचे गळे ते धरुनी रडे त्यांस टांकूनि जातां म्हणूनी ॥१४॥
पुण्यास पाप म्हणती अतएव योगीआधंत पाप - पळ यद्यपि पुण्य भोगीलोखंड - रुप जसि पातक - कर्म - बेडीबेडी सुवर्णमय हे तरि काय गोडी ॥१५॥
स्वर्गादिपुण्यफळ इच्छुनि दीर्घ - कामीझाले महाजन पराङ्युख विष्णुध्रामीलोकांस गोड उपदेशहि हाचि वाटेअंधासवें फिरति अंध जसे कुवाटे ॥१६॥
स्वर्गादिमात्र वदती फळ वेद जेव्हांआद्यंतवंत फळदायक मात्र तेव्हांराज्यादिलाभकर लौकिक यत्न जैसेस्वर्गादिलाभपर वैदिक यज्ञ तैसे ॥१७॥
वेदीं चातुर्मास्थयाजी तयाचें आहे कींजें पुण्य अक्षय्य साचेंनेणोनीयां अर्थ ते त्या श्रुतीचा वाखाणीती भाव जैसा मतीचा ॥१८॥
म्हणति अमर देवां नश्वरांलागिंजैसेंकतुफळ वदती हे वेद अक्षय्य तैसेंअमरहि मरणातें पावती दीर्घकाळेंक्षय बहु दिवसांतें अक्षयें कर्ममूळें ॥१९॥
वदति शाश्वतमुक्तिफळें श्रुति तरि तदर्थ किमर्थन ये रितीम्हणुनि येथ असें जरि बोलती तरि वदों प्रतिउत्तर त्यांप्रति ॥२०॥
नव्हति शाश्वत मुक्तिफळें तरी श्रुति पुराण असें असतें जरीनव्हति शाश्वत कर्ममयें फळें म्हणुनि बोलतसें श्रुति या बळें ॥२१॥
नाना कर्म करुनियं क्षितितळीं राज्यादि संपादितीतैसा स्वर्गहि यज्ञ - पुण्य - विविधा कर्मीच कीं पावतीजैशा या इहलोक राज्यपदव्या कर्मार्जिता नासतीतैसीं तीं परलोक दैविक पदें बोले असे हें श्रुती ॥२२॥
आतां चातुर्मास्ययज्ञादि पुण्यें अक्षय्येंतीं केविं बोला अगण्येंतेव्हां ऐसा अर्थ अक्षय्य - शब्दें कींते पुण्ये राहती फार अब्दें ॥२३॥
म्हणूनि देवां अमरत्व जैसें नित्यत्व या कर्मफळासि तैसेंकोण्ही श्रुति ज्ञानफळासि तैसा न बोलती नाश तयांत ऐसा ॥२४॥
या कारणें मुक्तिसि नाश नाहीं न नित्यता कर्मफळासि कांहींसोडूनियां मोक्ष अशा फळाला बोलेल कां वेदजनास बोला ॥२५॥
स्वर्गकाम - सुतकाम - जनाला यज्ञ कां वदतसे श्रुति बोलापूर्वपक्षकरिताति असा ही वेदतत्व तरि ठाउक नाहीं ॥२६॥
नयनि दाउनि लडुक शर्करा जननि दे कडु औषध लेंकरान फळ साखर औषधिचें जसें श्रुति वदे फळ काम्य जगीं असें ॥२७॥
करुनि वैदिक कर्म जसें तसें म्हणुनि वेद फळें वदती असेंतदपिही न विरक्त जनाप्रती फळ अपेक्षित त्यासचि मागती ॥२८॥
स्वर्गाचीही कामना ज्या नराला जौतिष्टोमा तो यजू कां सुरालाऐसा अर्थ स्पष्ट पाहा श्रुतींत ज्योतिष्टोमा स्वर्गकामो यजेत ॥२९॥
श्रवण कीर्तनही वदती श्रुती परि न तुच्छ फल श्रुति बोलतीम्हणति वैष्णवधर्म धरा अरे त्रिभुवनेश्वरकर्म पहा बरें ॥३०॥
ऋग्वेदिंचि त्रीणिपदा म्हणुनी हे गर्जताहे श्रुति विश्वकानींकीं विष्णुचे धर्म धरुनि राहा ऐकोनि तत्कर्म मनांत पाहा ॥३१॥
गोशब्दें जड बुद्धि इंद्रिय तथां जे पाळिती गोप तेहे गोपाळ म्हणूनि हे श्रुति तथा संबोधुनी बोलतेकीं हें आक्रमिलें पदेंकरुनियां त्रैलोक्य याकारणेंत्याचे धर्म धरुनि कर्महि पहा कर्मासि जें पारणें ॥३२॥
कर्माणि पश्यति म्हणे श्रुति विष्णुकर्मेपाहा मनीं श्रवण - कीर्तनरुप - धर्मेसंध्या जसी श्रुति वदे विधि येथही हाकर्माणि पश्यति म्हणे हरिकर्म पाहा ॥३३॥
स्वर्गादिकाम नर ते कमळापतीचीसेवा करुनि असि उक्ति कधीं श्रुतीचीयेथें उग्याच म्हणती हरिकर्म पाहात्या विष्णुचे परम धर्म धरुनि राहा ॥३४॥
ऐसा विवेक न कळोनि मुकुंदनामींश्रद्धा न ते धरिति वैदिक लोककामींस्वर्गासि जातिल कदाचित ते तथापीजाती अधोगतिस होउनि तेचि पापीं ॥३५॥
नहुष इंद्रपदाप्रति जाउनी त्रिभुवनेश्वर इंद्रहि होउनीभुजग होउनि तो पडला जसा रकडांसहि शेवट तो असा ॥३६॥
स्वर्गासि जाउनि हि मागुति जन्म पावेदुर्वासनें करुनि पापपथींच धांवेतेव्हां तयावरि कृतांत करी चपेटाहा काम्य वेदपथ याकरितांच खोटा ॥३७॥
यालागिं केवळ फळात्मक वेदवाचाजैसी लता फुलति हाचि विचार तीचापुष्पें उपेक्षिति तयां फळलाभ देतीदूतांसि येथ वदला यम येचि रीती ॥३८॥
पढतमूढ धरुनि अशा श्रुती फुलचितें फळ मानुनि मोहनीम्हणुनि नेणनि वैष्णवधर्म ते करिति तुच्छफळात्मक कर्मते ॥३९॥
या अध्यायीं श्लोक जो बाविसावा व्यासें केला साधकांचा विसावातेथें दूतां धर्म जें बोलियेला या तीं श्लोकीं अर्थ तो सिद्ध केला ॥४०॥
तन्नामस्मरणें तदद्वयपणें त्याची कळे आवडीतन्नामें सुटला अजामिळ तुम्हां हे साक्षि तों रोकडीऐसे धर्म न कर्मठांस कळती एवं स्वदूताप्रतीधर्मे सांगितलीं पुढें वदतसे सद्वैष्णवांची रिती ॥४१॥
ऐसें बरें दृढ विचारुनि दीर्घबुद्धीटांकूनियां सकळ वैदिक - काम्यसिद्धीसर्वात्मभाव धरिती मग ते अननींनामेंचि भक्ति असि साधिलि सर्व संतीं ॥४२॥
माझें नसे यम म्हणे भय एक त्यालाकीं विष्णु - भक्ति - निधि सापडला जयालास्वर्गास जाउनि हि कर्मठ जन्म घेतीपापें असे नरक मागुति त्यांस होती ॥४३॥
ऐसा मनीं धरुनि भाव कृतांत आतांश्लोकोत्तरार्ध वदतो यम त्या खदूतांकीं दंड योग्य नव्हती हरिदास माझेत्यांचे शिरीं कधिं पडेलन दंड - ओझें ॥४४॥
पाण्यास दंड करणें मदधीन येथेंनामाऽनळें सकळपातक भस्म तेथेंत्याला प्रवृत्तिच कधीं न घड़ेल पापींतेही तुरे जरि घडेल कधीं तथापी ॥४५॥
वैकुंठदूतां यमधर्मदूतां परस्परें ये रिति वाद होतांअजामिळाला उपदेश व्हावा दुःसंग त्यानें अवघा त्यजावा ॥४६॥
संकल्प ऐसा हरिनेंचि केला याकारणें वाद तयांसि झालाजीवंत ते यास्तव दूत गेले श्रीविष्णुशस्त्रें करिं ते न मेले ॥४७॥
जरि असें हरिच्या न सतें मनीं परतने यमदूत न तेथुनीवदति नाम तथां हरि आयुधें सतत रक्षिति होउनि सावधें ॥४८॥
म्हणूनियां श्रीहरि भक्ति जेथें झणी तुम्हीं नेणत जाल तेथेंयेणे रितीनें यमधर्म आतां हितोपदेशें वदतो स्वदूतां ॥४९॥
जे साधु विष्णुमय पाहति सर्व सृष्टीज्यांच्यासदा वदति देव पवित्र गोष्टीते वासुदेव शरणागत भक्त जेथेंत्यांच्या झणी जवळि जाळ कदापि तेथें ॥५०॥
यम म्हणे यमकिंकर हो सदा हरिजनासि रमा पतिची गदाकरि सुरक्षण काय तयां भयें न करवे मन दंड तयां स्वयें ॥५१॥
हरिजनास पहाल तुम्ही जरी करिल मृत्यु गदा हरिची तरीविहित दंड धरा इतरा नरीं म्हणुनियां यम वर्णिल यावरी ॥५२॥
दूतांला वदला कृतांत हरिचीं नामें जयांच्या मुखींत्यांला दंडन मी न थोर अथवा कोण्हीं करी आणखीआतां धर्म तयांसि सांगत असे कीं जे तयां वेगळेते आणा नरकाप्रतीतुम्हि अरे बांधोनि त्यांचे गळे ॥१॥
आजन्म जो विमुख विष्णुपदारविंदींसेवीन कीर्तिमकरंद कधीं न वंदीऐसे जगीं बहुत ते नरकार्ह जाणादूतां म्हणे यम तथां नरकास आणा ॥२॥
जे कांविरक्त हरिभक्त तदंघ्रिधूळीज्याच्या घरीं न पडल्या असती त्रिकाळींऐशा गृहीं नरकमार्गमयीच तृष्णादूतां म्हणे यम तयांनरकासि आणा ॥३॥
श्रवण कीर्तन माधववंदनें जळति पूर्विल पापहिकाननेंविधिकरांप्रति यास्तव ये रिती वदतसे यम संयमनीपती ॥४॥
श्रोते येथें वदति जळती सर्वही पूर्व - पापेंजाणो नेणो परि अघ - हरें विष्णुनामेंप्रतापेंपूर्वी शुद्धी द्विविध कथिल्या त्यांत अत्यंतशुद्धीनाहीं जोंतों न घडति कशा मागुनी पापवृष्टी ॥५॥
बंदी सेवी हरिहरि म्हणे जी तो एकदाहीत्याला कैसा यम म्हणतसे यातना दुःख नाहींपापीं धांवे जरि मन पुन्हा यातने योग्य झालाऐसे जे कां वदति वदतो ग्रंथकर्ता तयाला ॥६॥
धाडील दूतां यमधर्म जेव्हां आणावया जातिल दूत तेव्हांया मृत्युकाळी जरि नाम वाचे ये यातना - लोक तयांस कैंचे ॥७॥
आणू नका म्हणतसे यम याचि भावेंजें आणणें मरणकाळचि तो स्वभावेंजेव्हा घडे स्मरण वंदनमात्र काहींतो यातनाई सहसा जन होत नाहीं ॥८॥
ज्या चेधरीं न हरिभक्त - पदाञ्जधूळीतृष्णा जयास सदनांत असे त्रिकाळींआणा तयास म्हणतो यम कीजयालासंतप्रसाद हरिभक्ति घडे न त्याला ॥९॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
ऐसें
— असे
तया
— त्याला, त्या
घडे
— घडते, शक्य होते
सकळ
— सर्व
तैसें
— तसे
पुरुष
— चैतन्यतत्त्व, जाणणारा
तैं
— तेव्हा
तुज
— तुला
देखे
— पाहतो
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
तेथ
— तिथे
जैसें
— जसे
एवं
— अशा प्रकारे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.