येथें न यास्तबवहि आणिक शास्त्रनीतीमिध्याफल या सकळनिष्कपटार्थ जेथेंमिथा - फळ कृति कशा बदतील एथं ॥१०॥
ऐसें अजामिळमुखीं हरिनाम अंतींयेतां त्वरें करुनि सोडविलाच संतींप्राणप्रयाणसमयीं हरिदास्य कांहींहोतांचि शुद्धि मग दंड तयासि नाहीं ॥११॥
याहीवरी यम म्हणे निजकिंकरांलाकीं नेणतां झणि पहाल अशां नरांलाते तों बळेंच सुटतील परंतु तेथेंभी सापराध तुमचा अपराध जेथें ॥१२॥
धरुनी असा भाव पाटीं अनतां स्मरोनी मनीं प्रार्थितो धर्म आतांमुखीं नाम जो घेतयाला स्वदूतीं कसें बांधलें हात्चि संताप चित्तीदृदयिं आठउनी पुरुषोत्तमा यम म्हणे अपराध करीं क्षमाद्विजमुखी तव नाम तथायवी उचलिले कर यां यमकिंकरी ॥१४॥
महदेतिक्रम हा रचिला हरी न कळतां तव किंकरकिंकरींविनवितो कर जोडुनि ईश्वरा करिं दया करुणाऽमृतः सागरा ॥१५॥
अत्यंत शुद्धि हरिकीर्तनभक्तिभावेंहें तों खरें परि न जाणतही स्वभावेंनारायण - स्मरण - कीर्तनमात्र काहींज्याला घडेल मग पातक त्यास नाही ॥१६॥
प्राण - प्रयाग - समयीं यमदूत जेव्हांयेती घडे किमपिही हरिदास्य तेव्हांआजन्म पातक जळे मग त्या पवित्राहोतील दुर्गति कशा विविधा विचित्रा ॥१७॥
याकारणें प्रकरणार्थ समस्त आतांश्रीव्यासपुत्र वदतो सुखकार संतोज्या वर्णिल्या विविध शुद्धिहि विष्णुदूतींनामप्रताप शुक वर्णिले तोचि अंतीं ॥१८॥
बोले श्रीशुक कीं नृपा धरि मनीं या पूर्विल्या कौतुकातस्मान् कारण विष्णुकीर्तन असें निर्दाळितें पातकापापें जींबहु थोर थोर नरक प्राप्तीच ज्यांची फळेंप्रायश्वित्त तयांसही परम हें नामें जगन्मंगळें ॥१९॥
पापास तों भलतशा हरिनाम जाळीत्याचेंच कीर्तन घडे जरिसर्वकाळींपापी प्रवृत्तिच नव्हे अतिशुद्ध - चित्ताश्लोकद्वयेंकरुनि वर्णिलहेंचि आतां ॥२०॥
नामोच्चारणमात्र ज्यांस घडलें ते पावले सद्गतीसामर्थ्ये हरिचीं अशीं घडिघडी जे वर्णिती ऐकतीत्याला जे उपजेल भक्ति हरिची अत्यंत ते शुद्धतातैसीं तीर्थ तपोव्रतें न करिती हें जाण तूं सुव्रता ॥२१॥
अजित - भक्ति मनी उपजे जया मग अपेक्षित काय नृपा तयाअजितकीर्तनशुद्धि असी बरी म्हणुनियां शुक वर्णिल यावरी ॥२२॥
कृष्णाची पदपद्मचित्सुखसुधा सप्रेम जे चारवर्तीते मिथ्या मृग - नीर - मायिक - गुणीं कां हो पुन्हां माखनीप्रायश्वित्त तदन्यही अद्य हरी शुद्धी तरी त्या तशाकीं हस्ती धुतला तथापिहि धुळी तीरीं शिरीं घे तशा ॥२३॥
शुक मुखें इतिहास नृपें असाहदयिं आइकतां बसला ठसापरम विज्वर या मुनिउत्तरेंनृपति होउनि मानियलें खरें ॥२४॥
नरकनाशक नाम नरेश्वरेंशुक मुखें हरिचें अति आदरेंपरिसतां अति विस्मित मानसींमन बुडे हरिनाभसुधारसीं ॥२५॥
बहु सुखी बहु विस्मित भूपतीनयनि देखुनियां शुकल्याप्रतीवदतसे तुज विस्मय यापरीनवल मानियलें यमकिंकरीं ॥२६॥
बोले श्रीशुक कीं नृपा स्वपतिची ऐकोनि हे वैखरीदूतीं विस्मित होउनी धरियली आज्ञाशिरीं हे खरीआतां ते तइ पासुनी हरिजना दृष्टी पहातां भितीजेथें श्रीहरिकीर्तनें चुकउनी तो ठाव ते भोंवती ॥२७॥
अगास्तिने हेचि कथा शुकालासांगितली जे शुक बोलियेलातथापि हें व्यासमुखें पुराणींभविष्य बोले मुनिवर्यवाणी ॥२८॥
स्वपुत्र सांगेल पुढें स्वशिष्यानृपा असें वर्णियलें भविष्यातें बोलतां श्रीशुकही नृपालाकीं हे अगस्ती मज बोलियेला ॥२९॥
शुक म्हणे फिरतं क्षिति - मंडळींसदितिहास असा मलयाचळींमज वदे असतां हरिपूजनींअति दयाळु अगस्ति महामुनी ॥३०॥
तृतीय अध्याय विचित्र येथेंसंपूर्ण झाला इतिहास जेथेंसमर्पिला श्रीहरि - पादपद्मींपद्मोलयेच्या अति दिव्य सद्मीं ॥३१॥
ऐसा नाम सुधा म्हणोनि रचिला श्रीवल्लभें ग्रंथ हासर्वात्मा हरि वामनाऽननमिसेंजें बोलिया तें पहाजे हा वर्णिति आयकोनी धरिती भावार्थ त्या सज्जनाहोती भागवती गतीकलियुगी नामें जसी वामना ॥३२॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.