मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
नाम सुधा

साहित्य

नाम सुधा

अध्याय २, भाग १ · श्लोक १३२–२८१

nama sudha

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

हरिनामाचे माहात्म्य सांगणारा तीन अध्यायांचा ग्रंथ, प्रत्येक अध्यायात चार चरण. पहिल्या अध्यायातील श्लोक ‘वद वद वद जिव्हे’ या धृपदावर संपतात — जिभेला उद्देशून केलेली आज्ञा, तीन वेळा. नामाला येथे साधन म्हटलेले नाही; तेच साध्य मानले आहे.

अध्यायीं दुसर्या प्रताप - महिमा नामामृताचा स्वयेंश्रीवैकुंठपदाब्जभृंग कथिती नानापरी निश्र्वयेंगेला ज्या श्रवणें अजामिळहि तो जेथें स्वयें श्रीपतीआतां काय पहा मुनींद्र वदतो येथूनि रायाप्रती ॥१॥
शुक म्हणे इतुकी हरिकिंकरीं परिसतांयम - कींकर - वेरेवरीसकळ - नीतिविशारद त्यांप्रती वदति आइक तें धरणीपती ॥२॥
अन्याय आचरण तें यमकिंकरांचेंहें बोलणें परम - धर्म - धुरंधुरांचेंऐकोनि मानुनि मनीं हरिदास भारीहे श्लोक पांच वदनी प्रभुया प्रकारीं ॥३॥
न पापी न दंडार्ह ऐशास जेथें करीती वृथा ये रिती दंड तेथेंअधर्म स्वयें स्पर्शतां धर्मवंतां अहो कष्ट ते वाटती थोर संतां ॥४॥
जे माय - बाप जन - शासन - दंड - धर्त्तेजे साधु सर्व - सम जे नय - नीति - कर्त्तेऐशासही विषमता उपजेल जेव्हांकोण्हास हे शरण जातिल लोक तेव्हां ॥५॥
अन्याय आचरति संत समर्थ जेथेंतेसेच सर्व जनही करितील तेथेंतेव्हां बुडेल जग भाव धरुनि ऐसाहा श्लोक यावरि पहा वदतील कैंसा ॥६॥
जसा वर्ततां एक कल्याणकारी जगीं वर्तती सर्वही त्याप्रकारींवदे तो सदाचार शास्त्रार्थ जैसे जगीं वर्त्तती सर्वही लोक तैसे ॥७॥
श्लोकत्रयीं करुनि शासन दंडधर्त्तेहोऊनि हे नव्हति केवळ नीतिकर्तेऐसें वदोनिही अतःपर बोलती कींविश्वासघातकहि केवळ हे त्रिलोकीं ॥८॥
माझा मित्र सखा म्हणोनि दृदयीं विश्वासला जो असाअंकीं ठेउनि मस्तकासहि निजे त्याला वधी तो असानिष्पाया यमधर्मराज नरकीं घालूँ म्हणे जेधवांविश्वासूनि अशास शुद्ध जन हे होती कसे तेधवां ॥९॥
निष्पाप केवळ अजामिळ नामघोषेंगेलीं जळोनि कृत - पाप - फळें अशेषेंयाला कसें म्हणति पातक याचि भावेंनामप्रसंग वदतील महाप्रसंगें ॥१०॥
येथूनि नाममहिमा वदती हरीचाऐका विलास हरि - किंकर - वैखरीचाप्रत्यक्ष - शब्द - उपभा - अनुमान - रीतीश्रोत्यांसि जेरिति घडे महिमा - प्रतीती ॥११॥
होतों भूत - भविष्य - पातक - कुळा जाळूनियां राहिलाकीं नारायणनाम जो विवशही होऊनियां बोलिलाकल्याणालय नामधेय हरिचें आलें मुखा जेधवांयाचे जे भवपाश ते हरियले श्रीमाधवें तेधवां ॥१२॥
म्हणाल पापघ्न म्हणूनि त्याचे आलें न नारायणनाम वाचेझाला कसा नाश समस्तपापा म्हणाल ऐका तारित्या प्रतापा ॥१३॥
जेव्हां नारायणा ये म्हणउनि वदला अक्षरें चारि वाचेप्रायश्र्वितें अशेषें सहजचि घडलीं नाशले दोष त्याचेनावन्मात्रेंचि याचीं सकळहि दुरितें पातकेंही जळालींजेव्हां नारायणाची स्ववदन - सदनीं अक्षरें चारि आलीं ॥१४॥
नाशावया पापकुळासि कांहीं नामा असा अन्य उपाय नाहींम्हणोनि पद्य - द्वय धर्म - दूतां वारवाणिती तें हरिदास आतां ॥१५॥
मित्रद्रोही मद्यषी वित्तहारी स्त्री गो विप्र क्ष्मापती यांसि मारीऐसे नाना आणखी पापकारी याला शुद्धी देउनी नाम तारी ॥१६॥
या दोश्लोकीं पापिया शुद्ध घामें प्रायश्वित्तें बोलिलीं विष्णुनामेंयेथें अंतीं दूसर्याच्या चतुर्थी पादीं पाहा बोलिलीं जीं समर्थी ॥१७॥
श्लोकांचिया त्रिचरणीं सकळांसि शुद्धीअत्यंत जेथुनि पुन्हा अणु पापबुद्धीतें हेंच कीं अजित - नाम म्हणाल कैसेंत्याचें निमित्तहि चतुर्थ - पदांत ऐसें ॥१८॥
विषय बुद्धिस होय रमायती म्हणति यास्तव तद्विषया मतीविषय बुद्धिस ज्याकरितां हरी परम उत्तम नाम अशापरी ॥१९॥
सकळहि अघबीजें नाशती अंतरींचीअनि - अघहर नामें यास्तव श्रीहरीचींहरि विषय मतीचा कीर्तनें होय जेव्हांकरतळगत त्याला चारिही मोक्ष तेव्हां ॥२०॥
वदनि तद्गुण - कीर्तन जेधवां मन तदर्थक तन्मय तेधवांम्हणुनि कीर्तनिं तद्विषया मती विषय विष्णु मतीस असेरिनी ॥२१॥
विषयहि हरि होते बुद्धि तन्नाम जेथेंम्हणउनि दुसराही होतसे अर्थ येथेंपरि उचित दुजा या प्रस्तुतीं अर्थ झालानकळत हरिनामें पाप - मेळा जळाला ॥२२॥
नारायण - स्मरण बुद्धिस पुत्र - भावेंझालें तथापि हरि दृष्टि पडे स्वभावेंएकास एक जन घेउनि नाम बाहेतन्नासधारक दुजाहि तयास पाहे ॥२३॥
न पाचारितां आपणा जो स्वभावें स्वयें ओ म्हणे आणि पाहे स्वभावेंन सर्वज्ञ तो विष्णु सर्वज्ञ कैसा पहाता न जाणोनि संदेह ऐसा ॥२४॥
सर्वत्र हें कथियलें हरि सर्वसाक्षीजेथें स्वनाम करुणेस्तव त्यास लक्षीनामप्रताप हरि नाम कळोनि ऐसापाहे कृपेकरुनि त्यास हरी न कैंसा ॥२५॥
पाचारितो निजसुतासि मदीय - नावेंम्यां कां कृपेकरुनि त्यास अहो पहावेंसर्वज्ञही परि जना न असा उपेक्षीनेणोनि नाम म्हणतांहि कृपाळु लक्षी ॥२६॥
जो कां दयाळु सुरव सर्वजना अपेक्षीनाम - प्रताप समजोनि कसा उपेक्षीनामें अघें जळति हें तरि सर्वसाक्षीजाणें अशारिति अजामिळ - बुद्धि लक्षी ॥२७॥
जीवोद्धारनिमित्त जो अवतरे मत्स्यादि रुपें धरीतीर्थे वेद पुराण शास्त्र अवघें ज्या कारणें जो करीसाक्षी आणि समर्थ आणि करुणासिंधु स्वयें जो हरीतन्नामें भलत्या मिसें वदनि जे त्यांला कस नुद्धरी ॥२८॥
हा पूर्वपक्ष हरिला हरिनेंच येथेंआतां पुढें वदति - पार्षद काय तेथेंआणीकही म्हणति पाप - हरें विचित्रेंहोती तरी न जसिं केवळ नाममात्रें ॥२९॥
प्रायश्र्वित्तें बहुत वदती वेदवक्ते तथापीत्या त्या कर्मे करुनिहि जरी शुद्ध होतील पापीरामा कृष्णा मुरहर हरे या पदीं शुद्धि जैसीप्रायश्र्वित्तें इतर न कधीं शुद्धि देतील तैसी ॥३०॥
श्लोकीं असें कथुनि तींचरणेंकरुनीतें बोलती जरि किमर्थ असें म्हणूनीश्रीविष्णुदूत हरिनाम - गुणानुवादेंयेथें निमित्त वदतील चतुर्थ - पादें ॥३१॥
हरति सकळ पापें उत्तम - श्लोक - नामेंनदु - परि रचितांतें रुचती विष्णुधामेंहरिगुण हरिनामीं पाहनां अर्थ त्याचामग विषयविषाचा अंतरी ताप कैंचा ॥३२॥
कडुवट बहु वाटे शर्करा पित्तरोग्यापरि परम सिताते पित्तनाशासि योग्यासहज मधुरनेंही पित्त नासूनि देहींनिज अति रुचि दाबी आवडों दे न कांहीं ॥३३॥
कडुवट हरिनामें वाटती पापियालापरि दवडुनि पापें गोड होती तयालामग विषयसुखाची नाठवे त्यास वार्ताम्हणउनि न पुन्हा तो होय अन्यायकर्ता ॥३४॥
हरुनि सकळ पापें गोड होतील नामेंमग मनिं अभिरामें सूचती विष्णुधामेंहरि सकळहि पापें तस्फळें दुःखनृंदेंहरि हरि म्हणबीलें यास्तव श्रीमुकुंदें ॥३५॥
न कळत हरि - नामें ना सती पापमात्रेंपरि करिति कृतार्थ श्रीपतिप्रीति - नेत्रेंनदनुहरिकटाक्षें नाम जाणोनि घेतीगुणिं मिठि पडतां ते पातकी केविं होती ॥३६॥
मधुर मधुर नामें दाविती अर्थ दृष्टीमधुरिपु - मय तेव्हां नामनिष्ठांस सृष्टीवसति सकळ सूतें भूषणें जेविं हेमींहरिमयजग देखे वासदेवारव्यधामे ॥३७॥
नर पुरुष असीं हीं जीवनाचें अपारेंगुणमय नरतत्वें बोलिजे त्यांस नारेंअयन सकळ नाराधार आत्माच साचामुनिवर वदती हा अर्थ नारायणाचा ॥३८॥
मृषा सर्व आधार त्याला गुणाचा असा सर्व नारांसि नारायणाचाजगत् व्यक्त अव्यक्त हें सर्व नारें प्रकाशी चिदात्मा तदाधार सारें ॥३९॥
व्यक्त प्रपंच नभआदिक पंचभूतेंअव्यक्त बुद्धि मन भीषण आणि चित्तेंनारें असीं अयन आश्रय यांच नारांनारायण प्रभु खरा लटक्या विकारा ॥४०॥
नारांसि जो आश्रय याप्रकारें नारायणा आश्रय तेंचि नारेंनारांसि जो आश्रय ईश झाला तो जीव कीं आश्रय हे जयालानारायणाश्रित अशेषहि जीव नारेंभूमीवरी असति जेविं नदींत नीरेंपाण्यांत त्या दरडिं दीसति जीव तोहीनारायणात्मक दिसे प्रतिबिंब देही ॥४२॥
साक्षी विमुक्त - जन - आश्रय आणिरवीहीनारायणार्थ बहु बोलति अंत नाहींहीं ज्ञानगम्य हरिचीं गहनार्थ नामेंया वेगळीं सुगम जीं गुण - कर्म - धामें ॥४३॥
मेघश्यामल कोमलांग म्हणतो जो सांवळा कोंबळाश्रीपीतांबर नाम दाखवि मनीं कासेस सोनेसळावाचे कौस्तुभकंठ नाम म्हणतां तें रत्न दावी गळांभूभारांऽतक तो रणांगणि दिसे दंडी खळांच्या कुळां ॥४४॥
श्रीरामा म्हणतांचि जो करि धरी कोदंड सीतापतीगोपीवल्लभ वेणु लाउनि मुखीं दावी विचित्रा गतीलक्ष्मीवल्लभ विष्णु शेषशयनीं चक्रादि चिन्हें करींब्रम्हा दाखचि पद्मनाभि म्हणतां तो नाभि - पद्मोदरीं ॥४५॥
या श्लोकीं अकराविया चरण हा चौथा कसा वाटतोजैसा वामन - वामपाद गगनीं ब्रम्हांड तो वाटतोगंगा त्यांतुनि ही जसी त्रिभुवनी टीका तयाची असीयेथें नामसुधा मधूनि निघने त्रेलोक्यकर्णी तसी ॥४६॥
नामीं असे अर्थ अनेक जेथें सिद्धांत हा जो ग्रथितार्थ एथेंकीं नाम नाशी अति पाप - राशी नामार्थ पापें सहमूळ नाशी ॥४७॥
स्फुरे अर्थ वाचेसि ये नाम जेव्हां हरी पातकें आठवे नाम तेव्हांधरी कीर्तनीं चित्त नामार्थ गोडी सुखें सर्व सोडी तई पापखोडी ॥४८॥
प्रायश्र्वित्तें सर्वही व्यर्थ जेव्हां नामीं ऐसी शुद्धि अत्यंत तेव्हांया श्लोकाचा अर्थ भावार्थ ऐसा चित्ताकाशीं चित्सुधारश्यि जैसा ॥४९॥
प्रायश्र्वित्तें बहु परि न तीं शुद्धि अत्यंत देतीजैसीं नामें सुलभहरिगुणालागिं जे सूचवीतीतेथें जेव्हां मन रुचि धरी तो पडे केविं पापीऐसें पूर्वी विशद बदले विष्णुदूत प्रतापी ॥१॥
आतां म्हणाल असि होउनि विष्णुभक्तीदुर्वासना जरि करी विषयीं प्रसक्तीहेही न केवळ विशुद्ध म्हणाल जेव्हांसांगों रहस्य म्हणती हरिदास तेव्हां ॥२॥
नामींच शुद्धि जरि आचरला तथापीधांवेल तेंचि मन मागुति त्याच पापींतेही न शुद्धि बरधी परि याच नामींजें शुद्ध सत्त्व मन तें न बुडेल कामीं ॥३॥
नकळत महिमाही जाळिती सर्व पापेंत्रिभुवनपतिनामें आपुलीया प्रतापेंपुनरपि मन पापीं धांवतें तें न धांवेजरि हरिगुणगोडी अंतरंगी ठसावे ॥४॥
ऐसी तथापिहि न इच्छिति शुद्धि कामींकामीं प्रवर्तनि जरी हरिच्याच नामींजे इच्छितील असि शुद्धिहि दीर्घबुद्धीत्यांची त्वरेंकरुनि होइल सत्त्वशुद्धी ॥५॥
विषय तामस राजस इंद्रियें गढुळ सत्त्व अखंड गुणद्वयेंविषय वाटति गोड बडू मना म्हणुनि सोडवती न कधींजना ॥६॥
करिनि कीर्तनही हरिचें मुखें परि मनीं अतितुच्छतरें सुखेंमन निघो विषयांतुनि थेरिती विषयनिष्ठ कदापि न इच्छिती ॥७॥
करिती कीर्त्तन तेसमयीं हरी वदति मात्र परंतु न अंतरींप्रकटतो मनिं माधव जे स्थळीं प्रबळ तेस्थाळिं काम न हा बळी ॥८॥
विषय शत्रु मनीं जयिं वाटती मनिं तया हरिचे गुण दाटतीविषयपाश अशेपहि तूटती मग कधीं कुपथीं न रहाटती ॥९॥
परि न शुद्धि असी जन इच्छिती नरतिजे असि शुद्धि अपेक्षितीजरि अपेक्षिति काय तया उणें परम शुद्धि रमापतिच्या गुणें ॥१०॥
रज तम गुण दोन्हीं दुष्ट अत्यंत यासीहरिगुण - अनुवादी छेदिती निश्वयासीकरुनि विमळ सत्वा त्या नरा सत्वधीरापुनरपि अणु लागों नेदिती पाप वारा ॥११॥
असिहि शुद्धि अपेक्षितिजे जनीं त्वरित ते तरती हरिकीर्तनींम्हणुनि निर्णय हा अति - निश्चयें कथियला हरिच्या भृतकीं स्वयेपरमशुद्धि न इच्छिल तो जरी करिल शुद्धहि पाप पुन्हा तरीम्हणुनि संशय हा धरितो गळां तरि पहा तुम्हि येथ अजामिळा ॥१३॥
सुतमिषें घडतां हरिकीर्त्तनें पतित उद्धरिलाचि जनार्दनेंपरि हरुनि कुसंग सुसंगती करुनि दीधली त्यासहि संगती ॥१४॥
सहजकी हरिकीर्तन जो करी सुमतित्यासहि देयिल तो हरीपरम शुद्धिहि जे जन इच्छिती सुमति दे हरि तोचि रमापती ॥१५॥
परि मनीं अतिशुद्धि अपेक्षिती त्वरित ते फळ उत्कट पावतीत्यजिति ते विषयात्मक वासना जितचि मुक्ति अहो मग त्या जनां ॥१६॥
म्हणुनियां मथितार्थ कसे परी पतितपावनया वदनीं हरीत्वरित नासनि पूर्विल पानकें मग हरी हळु दाविल कौतुके ॥१७॥
इतर शुद्धिहि तो हरि देतसे परि जसा क्रय विक्रय होतसेकरिति जे व्रत तीर्थ तपें जसीं हरि विशुद्धिहि देत असे तसी ॥१८॥
निज अपत्यजना सकळांपरी सकळ लक्षिनि लोक असा हरीवदनि नाम अखंड जयांचिया करि समस्तहि शुद्धि तयांचिया ॥१९॥
म्हणुनि ये रितिनेंचि अजामिळा, सुमति देउनि सोडवितो गळाश्रवण हें निजदासमुखें तथा करउनी करितो हरि हे दया ॥२०॥
इतर शुद्धिस हा गहिमा नसे अजित नाम न जंथ मुखीं वसेम्हणुनियां जन हो भल भलत्यापरी पतितपावन यो वदनीं हरी ॥२१॥
पतित पावन - नाम - पदें जसीं करिति शुद्धि न तीं इतरें तसींम्हणुनि नेउं नका नरकाप्रती द्विज असें हरिकिंकर बोल ती ॥२२॥
नेऊं नका तुम्हि अतःपर या द्विजालासंव्हार ज्यास्तव अघां सकळांस झालाकीं जेधवां मरणकाळ सरों निघालातेव्हां मुखीं पतिनपावन विष्णु आला ॥२३॥
मरणसमयिं याचें नाम वाचेसि आलेंम्हणउनि अवघेंहि पाप याचें जळालेंजितचि अजित - नामें हीं न जेव्हां समर्थम्हणउनि मनि शंका श्रोतयां या श्रुतार्थे ॥२४॥
अभिप्राय हा व्यक्त होईल जेव्हां मनींहूनि शंका निवारेल तेव्हांअहो वर्णिला मूळ पद्यार्थ ऐसा वरा आयका येथ भावार्थ कैसा ॥२५॥
पूर्वश्लोकीं वासना - त्याग रीती जे कां शुद्धि इच्छिती त्यांस होतीऐसे जें कां बोलिले त्या द्विजांला नाहीं झाला येथ संदेह ज्याला ॥२६॥
अशेष पापें म्हणतां जळालीं जे शुद्धि त्याला न कळोनि झालीनो मृत्यु येतां इतुक्यांत कांहीं कुकर्म झालें तरि शुद्धि नाहीं ॥२७॥
असें बोलती दूत चित्तीं यमाचे म्हणोनी मनीं दूत सर्वोत्तमाचेविचारुनियां बोलनी मृत्यु तेव्हां मुखी याचिया स्वामिचें नाम जेव्हांदेहावसान - समयीं जरि पाप झालेंदेहावसान - समयीं जरि नाम आलेंकांहींच शुद्धि नसली जरित्यासि पूर्वीहें एक नामचिहि शुद्धि करील पूर्वी ॥२९॥
हा अंतकाळ नरकाप्रति जावयाच्याकाळीं अशाहि जरि गर्जलि नाम वाचामागील सर्वहि अहो अघ तैजळालेंधाकेंचि जे नरक सर्वहि ते पळाले ॥३०॥
नेऊं नका म्हणुनि जे म्हणतों तुम्हालातें नाम शेवटिल हेम फळलें द्विजालापूर्वीमुखीं रक्तमियें हरिनाम आलेंनैं नाम यासि अतिशुद्धिसि हेतु झालें ॥३१॥
हा आजि नाममहिमा श्रवणासि आलासत्सुंग जो क्षणहि हाचि फळेल यालाटाकूनि संग भजनां हरिनाम घोषेंदुर्वासना जळति त्या अघवीजशेषें ॥३२॥
गंभीर भाव हदयांत धरुनि ऐसाते बोलिले अजित - किंकर बोल तैंसाकीं प्राणयानसमयीं हरिनाम जेथेंनेऊं नका पुरुष तो नरकास तेथें ॥३३॥
येथें सूचविलें जनांस सकळां दूतीं हरिच्या असेंकीं देहीं हरिनाम अंतसमयीं येणार वाचे क्सेंजैसें पुत्रामिसे अजामिळमुखीं जे नाम होतें सदाआलें तेंचि तदर्थ नाम हरिचें गर्जा मुखीं सर्वदा ॥३४॥
म्हणति ते हरिकिंकर यावरी तुम्हि म्हणाल न हा स्मरला हरीसतन हा स्मरला निज - आत्मजा घडलि शुद्धि म्हणाल कसी द्विजातरि सुधा कसिही पडतां मुखीं हरि जरामरणासि करी सुरवीधरुनि भाव मनांत असा बरा वदति वैष्णव त्या यमकिंकरा ॥३६॥
सांकेत जीं निजसुतादिनिमित्त नामेंसंकेतरुप रचिलीं परि श्रुद्धि धामेंगोविंद नाम हरि माधव चक्रपाणीकोण्या मिसें तरि वदो परि धन्य वाणी ॥३७॥
हरि हरि म्हणुनी हा नाचतो काय वेडाअज अजित म्हणूनी गर्जतो काय रेडामुखिं हरि परिहासें ये अशाही प्रकारेंतरि जळतिल पापें पापियांचीं अपारें ॥३८॥
घडि घडी वदनीं हरि आळवी स्वहरिदासपणें जन - चाळवीसकळ पापकुळें जळती तरी करुनि दंभ हरी म्हणतो जरी ॥३९॥
हरिकथा उदरार्थ जरी करी स्वगुण नाम करी भलत्यापरीविकितसे उदरार्थ फुलें जरी शुभ सुगंध कधीं न चुके तरी ॥४०॥
हरि हरि हरि ऐसें बोलतां काय होतेंहरि हरि म्हणती हा नावडे शब्द गातेंहरि हरि म्हणतां तो होय निष्पाप पापी ॥४१॥
कोण्या मिसें - करुनि ये हरिनाम वाचेजे पापराशि अवघे जळतील त्याचेवाचे जरी सुतनिमित्तक नाम आलेंसांकेत्य कीर्तनमिसें अघ तें जळालें ॥४२॥
आतां म्हणाल हरिनाम समस्त पापेंनासूनि उद्धरिलही सहजप्रतापेंदुर्मृत्युनें मरति दुर्गाति सिद्ध यालादुर्मृत्युचे नरक चूकति केविं बोला ॥४३॥
तरि न दुर्मरणें करि दुर्गती म्हणुनियां हरि - किंकर बोलतीजरि हरि - स्मरणें मरणें घडे भलतसे नरकी न तरी पडे ॥४४॥
पृथ्वीछंद - पडे अडरवले गळे करपदादि भंगे मरेडसे भुजग अग्निही करुनि जीविता अंतरेमरेल जरि मारितां तरिन त्या नरा यातनास्मरेल मरतांच जो वियशाही जगत्पावना ॥४५॥
विवशनें न मुखा हरि ये तरी नर वदे हरिनाम सदा जरीम्हणुनियां हरिनाम सदा मुखीं जपति गर्जति तेचि जगीं सुरवी ॥४६॥
प्रायश्र्विनें नाशती पापमात्रें वीजें त्यांची राहती तीं विचित्रेंतींही जाती आवडे नाम जेथें ऐसें मागें वर्णिलें स्पष्ट येथें ॥४७॥
पूर्वी येथें विशद कथिलें कीर्तनाच्या प्रतापा आतां सेवा हरिचरणिची जे स्तुती स्तोत्र - रुपातेथें नामें - करुनिच महा पातकी शुद्ध होतीऐसें बोलों म्हणुनि हदयीं चिंतिलें विष्णुदूतीं ॥४८॥
जी कीर्तनी तारक विष्णुनामें सेवा मिसें तींच विशुद्धिधामेंआतां असें बोलति तेचि वाचे श्लोकद्वयें किंकर माधवाचे ॥४९॥
थोरां थोरें लाहना लाहभालीं प्रायश्र्वित्तें ब्राम्हणीं बोलियेलींपापें त्यानीं भस्म होती तयाषी राहें जें का चित्त जें पापरुपी ॥५०॥
मळ अनादि मनांत कुवासना हरि तिला हरिपाद - उपासनाभजनिंही हरिनामक मंत्र ते अजितनामक सर्वहि तंत्र तें ॥५१॥
स्तुति स्तोत्र सन्मात्र सूक्तें विचित्रें समस्तां तरीं विष्णुनामें पवित्रेकरीती तिहीं पुंडरीकाक्ष - पूजा हरी श्रीहरी त्यांचिया पापबीजा ॥५२॥
असिच धर्मसुताप्रति भारती वदलि जान्हवि - नंदन - भारतीपुससि तूं जरि धर्म युधिष्ठिग वदतसें मज जो गमला बरा ॥५३॥
हा श्लोक भीष्ममुखिंचा परमार्थ जेथेंभाषें करुनि वदिजेल तदर्थ येथेंस्तोत्रें स्तुती करुनि जे हरिभक्ति पूजाहा एक धर्म दिसतो मज धर्मराजा ॥५४॥
या धर्मा सकळांत संमत मला तो धर्म हा आगळानाहीं त्यासम धर्म आणिक नृथा तो धर्म या वेगळाजो स्तोत्रें दृढ भक्तिनें प्रतिदिनीं गोविंद हा पूजणेंऐसें कृष्णसमीप भीष्ममुखिंचे श्रीभारती बोलणें ॥५५॥
नामप्रताप हरिचा सकळां पुराणींव्यासादि बोलति मुनीश्वर - वेद - वाणीयाकारणें परम नामचि जेथ तेथेंजें प्रस्तुतीं वदति हें हरिदूत येथें ॥५६॥
असें कीर्तनें आणि सेवादिरुपें महा शुद्धि देविष्णुनामप्रतापेंन जाणोनि उच्चारितांही हरी पातकें येथ वैषम्य नाहीं ॥५७॥
जसजसा अति सादर कीर्तनीं तसि तसी हरिभक्ति फुगे मनींपरि पुरातन पातक तों नुरे भलतसे हरिनाम वदो पुरे ॥५८॥
वदति येथुनि पद्ययुगें रसें अजितकीर्तन हें उपमा मिसेंगमन ते करिती मग तेथुनी शुक वदेल अतःपर येथुनी ॥५९॥
नकळत कळतां घे उत्तमश्लोकनामेंसहज निजगुणें ही नासती पापधामेंनकळत कळतांही घालिती अग्नि जेथेंकरि सहज - गुणें तो भस्म जाळूनि तेथें ॥६०॥
श्रीउत्तमश्लोक म्हणूनि त्याचें श्लोकांत या वर्णिति नाम साचेंसत्कीर्ति जे श्लोक तिला म्हणावें जेविष्णुनाभात्मक रुप भावें ॥६१॥
गोपाळ - बाळ म्हणतां व्रजबाललीळानामें सुचे हदविं केशवकीर्तिमाळागोपांगनारमण नाम विलास - लीलावी हार सूचवि असें हदयी तयाला ॥६२॥
वदनिं नाम धनंजयसारथी उभय कृष्ण मनीं दिसती रथींशनसहस्त्र असीं हरिनामकें अजित - कीर्ति - सुधा - रसधामकें ॥६३॥
ऐसी जगत्पावन विष्णुनामें वैकुंटकीर्त्यात्मक पुण्यकामेंनेणोनि जाणोनि मुखासि आलीं पापें तयाचीं अवघीं जळालीं ॥६४॥
न अग्नि टाकी रचगुणासि जेव्हां टाकी कसें नाम गुणासि तेव्हांजाळी स्वनामेंचि अघें अपारें ते उत्तमश्लोक अशा प्रकारें ॥६५॥
नामें हरीचीं हरिकीर्निरुपें न नाशनी हींजरि लोक - पापेंप्रसिद्धमात्रेंचि कसें म्हणावें तो उत्तमश्लोक म्हणोनि नावें ॥६६॥
विख्यात पापी बहुसाल होती वेदीं पुराणीं श्रवणासि येतीतसी नव्हे कीर्ति रमापतीची तारी जगा ख्याति असीच तीची ॥६७॥
हरी पाप तें नाम कोण्याप्रकारें स्मरे सादरें त्यासि सोख्यें अपारेंजसी नेणतां औषधी रोग नाशी पुढें सेवितां तेचि दे सोरेव्यराशी ॥६८॥
करि अहो गुण कांचन औषधी न करि कां हरिनाम - सुधा - निधीधरुनि भाव असे मित बोलिले मग उगे हरिकिंकर राहिले ॥६९॥
अजितनाममहत्व अशापरी कथियलें बरवें हरिकिंकरींउभयदूत अतःपर वर्त्तनी कथिल तें शुभ भृमिपतीप्रती ॥१॥
शुक्र म्हणे हरिकिंकर येरिती परम वैष्णवधर्म तयांप्रतीकरुनि निर्णय ते यमपाशही द्विजनिबंधक तोडियले तिहीं ॥२॥
दूतीं यमाच्या मग काय केलें अजामिळाचें मग काय झालेंअध्यायपर्यत मुनींद्रवाणी बोलेल हें सर्व महा - पुराणीं ॥३॥
यानंतरें कुपित ते यमदूत जेथेंगेले त्वरें करुनियां यमधर्म जेथेंवृत्तांत हा वदति संयमनीपतीलाजोकांजगीं त्वदेनुशासनभंग झाला ॥४॥
आतां द्विजें क्षणहि वैष्णव - संगतीनेंकेलें पहा स्वहित जें वृषलीपतीनेंसांगेल तें शुक मुनींद्र महीषतीलातें आइका द्विज सुमंगल केविं झाला ॥५॥
नृपा विप्र निष्पाप निष्पाश झाला भयें सोडिलें सर्वथा त्या द्विजालाकरी वंदनें दूत पादांबुजाला धरी मस्तकीं आदरें त्या रजाला ॥६॥
विप्रास आयुष्य असोनि देवें यमासही मोहुनि वासदेवेंतो दूत हस्तें द्विज आणवीला स्वकिंकराहातुनि सोडवीला ॥७॥
स्वकिंकरांच्या वदनें तयाला श्रीवल्लभें हा उपदेश केलायानंतरें वांचतसे द्विजाती ऐशामधें ते हरिदूत जाती ॥८॥
आयुष्य दोष म्हणऊनि पुन्हा शरीरींविप्र प्रवेश करि सूक्ष्म - शरीर - धारीत्या देखतांचि हरिकिंकर गुप्त झालेअस्ताचळाप्रति दिवाकर चारिगेले ॥९॥
त्यानंतरें वृत्ति अजामिळाची कथा महत्संगतिच्या फळाचीश्लोक - त्रयें प्रस्तुत त्या द्विजाला हें सांगतों कीं अनुताप झाला ॥१०॥
अनंतदूतांसि छतांतदूतीं निवेदिली वैदिक - धर्मरीतीअन्याय ते सर्व अजामिळाचे निवेदिले दंडहित्या फळाचे ॥११॥
कृतांत दूतांसि अनंतदूर्ती निरुपिले वैष्णव - धर्म संतीसद्भक्ति त्यांच्या वचनें द्विजाला ऐकोनि पापें अनुताप झाला ॥१२॥
म्हणतसे मम कर्म पहा पहा नृपलिपासुनि वार दहा दहाउपजलों उदरांत अहा अहा पतित मी पतितांत महा महा ॥१३॥
ब्राम्हण्य म्या बुडविलें वृषलीपतीनेंआयुष्य हें दवडिलें अति दुर्मतीनेंऐसें स्मरोनि निज सर्व कुकर्म पापेंदुःखी अजामिळ बहू स्वकृताः नुतापेंश्लोकत्रयेंकरुनि आणिक ही स्वकर्मेतो आठवील घडलीं जितुकीं अकर्मेजों पूर्व - कर्म - अनुताप मनास नाहींतो सत्सर्थी रुचि मना उपजे न कांहीं ॥१५॥
जें दीपतुल्य कुळ काजळ त्यांत झालींधिक्कार हा मजचि जो कुपथी रिघालोंस्त्री धाकुटी बहु भली तिस टाकिलें ग्याजे मद्यपी धरिली ते वृषली अगम्या ॥१६॥
परम वृद्धपिता जननी बरी मजविणें गति ज्यांस न दूसरीबहु तपोनिधि - आणि तपस्विनी त्यजियली अकृतज्ञपणें वनीं ॥१७॥
आतां मला नरक होतिल मोठ मोठेधर्मघ्न जेथ पचनी अतिदुष्ट खोटेऐसा अजामिळ मनीं बहुतप्त झालाएथूनि वर्णितिल जें घडलें द्विजाला ॥१८॥
नरक - हरण - चिंता प्राप्त होतां द्विजालास्मृतिगन हरि - दास - प्रोक्त वृत्तांत झालाद्विजमग हरिनामीं आत्मकल्याण मानीम्हणुनि कथिल आतां पंचपद्येंकरुनी ॥१९॥
श्लोकद्वयें आठउनी तयाला संवाद अन्योग्य जयांत झालाश्लोकत्रयें ब्राम्हण त्या करुनी कल्याण माझें म्हणऊनि मानी ॥२०॥
म्हणे हें प्रत्यक्षें नयनिं दिसलें स्वप्न अथवातिघे कोठें गेले धरुनि मज जे वोढिनि जिवाअहा गेले कोठें पुरुष चवघेही जिहिं मलाबळें त्यांपासूनी हरुनि नयनाऽनंद दिधला ॥२१॥
मी तों अगण्य पतितांतहि अग्रगण्यप्रख्यात मद्यपि नथापिहि काय पुण्यकीं देखिलें नयनि त्या विबुधोत्तमानेंतेणें प्रसन्न मन नाशितसे नमातें ॥२२॥
नाहींतरी मज अमंगळपापियाचेये केविं या मरणिं माधवनाम वाचेमी दुष्ट नष्ट अतिपातकि काम खोटेंनारायणा म्हणुनि मंगळ नाम कोठें ॥२३॥
ऐसें असोनिहि सुखीं हरिनाम आलेंनेणों मह्यसुकृत कोटुनि हें उदेलेंमी नों स्वयें पतित निर्लज विप्रहंनाहोणार काय मज हें न जयासि चिंता ॥२४॥
द्विज असें शुभसूचक मानुनी स्वहित केवळ चिंतिल एथुनीकथिल तो सुमनोरथ निश्चयें शुक मुनीश्वर पद्यचतुष्टयें ॥२५॥
द्विज अतः पर यत्न म्हणे करुं पवन इंद्रियचित्तहि आवरुंमन बुडे न नमांत पुन्हा जसें करित साधन - वृंद म्हणे तसें ॥२६॥
छेदूं बंध अनादिही प्रथम जो झाला अविद्याबळेंजीच्या आवरणें सुरवासि सरतां दुर्वासनेचीं कुळेंविक्षेंपें बहु कामना उपजतां कर्मे करी वोंगळेंत्यांची भोगिलिया विणें न चुकती जी कर्ममूळें फळें ॥२७॥
सांख्यें आत्मअनात्मता निवडतां शब्दें अविद्या हरुंयोग - ज्ञान - हुताशनांत अवघ्या वृत्तींसिही सहरुंतेव्हां संचित नाशतां उपजती कर्मे अकर्मेपणींप्रारब्धासहि भोगिनांच सरऊं ऐक्येंउरुं निर्गुणीं ॥२८॥
जों प्रारब्ध असेल नोंवरि भजों सर्वात्मभावेंहरीपाहों तो स्थिर जंगमीं बहुघटीं मातीच जैसी खरीजे मध्यस्थ अमित्र मित्र अवघे तदूप पाहों रचयेंसर्वाचा प्रिय सोयरा निजसखा आत्मा असा निश्र्वयें ॥२९॥
ऐसे निश्र्वय गुंफितां वृषलिचे फांसे गळां प्रीतिचेदेखे आठवती विशेषहिसुरक्त्रीडादिकीं जे तिचेया पापेंचि कृतांत - पाश पडले होते पहा हो मलाऐसें आठवितां विरक्ति उठतां तात्त्काळ झाला भला ॥३०॥
ऐसे हे विषयांत दोष नसतां कां टाकिती हो भलेमिष्टान्नीं विष येरिती विषय ते त्या ब्राम्हणा वाटलेबोले प्रस्तुत आर्यकार्य करणें की हे जगन्मोहिनीमाया स्त्रीसम ईस टाकुनि निघों निःसंग संगीं वनीं ॥३१॥
करुनि मर्कट नाचविलें मला कट कटा अनिलंपट मी तिलाप्रियनमा अधमा मज वाटली वय समस्त घडी जसि लोटली ॥३२॥
हा देह मी म्हणुनि मानुनि दुष्ट - कर्मेआयुष्य म्य सरविलें अवघें अधर्मेप्रत्यक्षही जड असत्य जिता शवालानाहीं प्रतीति इतुकें न कळे जिवाला ॥३३॥
आतां म्हणे द्विज अहंममता शरीरींटाकीन जे चिर तृषा रवि - रश्मि - नीरींउलुंघनें कठिण यद्यपि विष्णुमाथातन्नाम - कीर्त्तन - उपाय असे नराया ॥३४॥
करिन कीर्तन मी दिन - यामिनी स्फुरति काम - गृहें सुत - कामिनीजस जसें सुख होइल कीर्तनीं नस तसामग निर्लज नर्तनीं ॥३५॥
अशा कीर्तनी नर्तनी चित्तशुद्धी त्वरें होउनी होतसे ध्यान - शुद्धीहरीच्या पदीं स्थैर्य चित्तास जेव्हां स्फुरे विष्णु आत्मा स्वतःसिद्ध तेव्हांउपजले सुमनोरथ जे जसे द्विज समस्तहि आचरला तसेत्यजिल सर्वहि तो मन नेमुनी म्हणुनि एथुनियां बदतो मुनी ॥३७॥
क्षर्णेक - सत्संगतिच्या फळानें केलें तसें सर्व अजामिळानेंउदासता ते रुचली द्विजाला सांडूनि दासी हरिदास झाला ॥३८॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
सकळ
— सर्व
म्हणोनि
— म्हणून
पुरुष
— चैतन्यतत्त्व, जाणणारा
घडे
— घडते, शक्य होते
देखे
— पाहतो
तया
— त्याला, त्या
जेथ
— जिथे
जैसें
— जसे
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
माया
— भासमान करणारी शक्ती

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.