मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
नाम सुधा

साहित्य

नाम सुधा

अध्याय २, भाग २ · श्लोक २८२–३५२

nama sudha

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

हरिनामाचे माहात्म्य सांगणारा तीन अध्यायांचा ग्रंथ, प्रत्येक अध्यायात चार चरण. पहिल्या अध्यायातील श्लोक ‘वद वद वद जिव्हे’ या धृपदावर संपतात — जिभेला उद्देशून केलेली आज्ञा, तीन वेळा. नामाला येथे साधन म्हटलेले नाही; तेच साध्य मानले आहे.

गंगा द्वारासि गेला मनिंहुनि पहिला संग तो टाकियेलागातां वाचे हरीला मन - मळ हरिला श्रीहरी मोहरीलाध्यानी तन्निष्ठ झाला हदयिं उमजला विष्णु आत्मा द्विजालाध्यानां श्रीमाधवाला भवदेव शमला नामनादें निवाला ॥३९॥
द्विजाची शुकाचार्य वैकुंठयात्रा वदूं पाहतो पंडुच्या पुत्रपोत्राअसे मूळिंचे पांच हे श्लोक आतां करीतील टीका मुखें सौख्य गातांक्वचित् गंगातीरीं हरिगृहिं हरिद्वारनगरींनिजा चिंता योजी द्विजवर चिदाकाश - कुहरींदृढ प्रत्याहारें नियमुनि मनीं इंद्रियगणाचिदाकारें चित्तें - करुनि भजतां विप्र अगुणा ॥४१॥
चिदाकारा - चित्ता - हुनिहि निज आत्मा पलिकडेअसें योगी पाहे तरिच मनि हे उन्मनि पडेचिदाकारें आहे मन म्हणुनि राहेल तितुकानिरोधी त्या वृत्ती उपजतिल हा योग इतुका ॥४२॥
न जेथें चिच्छक्ती सहजचि असे निर्गुणपणींअखंडाऽनंदाचा अनुभव असे ऐक्यसगुणींअसे देवाजीवा सहज अगुणीं ऐक्यचि परीअसा आत्मा पाहे तरिच कळला त्यासिच हरी ॥४३॥
पृ० छंद - अशा अनुभवीं दिल्ही बुडि अजामिळाच्या मनेंसमाधि सरतां मनीं किमपि इच्छिलें चिंतनेंअशांत हरिदास ते नयनिं चौघही देखिलेद्विजें वळखिले मनीं सतत जे सुखें रेखिले ॥४४॥
करी जों नमस्कार चौघां जणाला जसे चौघ तेपांचबा विप्र झालापडे अंग पूर्वीच गंगाप्रवाहीं भुजा चारि देखे नव्या दिव्यदेहीं ॥४५॥
करिं गदांबुज अंबुद - सांवळा कटितटीं तडिदंवर मेरवळासतन षोडशवार्षिक कोंवळा हरि करी हरिनाम अजामिळा ॥४६॥
जलज शंख रथांग गदा करी कनकरत्नविमान तयावरीद्विज अजामिळ तो हरि किंकरीं मिरविला हरि - पार्षदशेखरीं ॥४७॥
असा विप्र वैकुंठलोकासि नेला फिरेनापुन्हा जो असा तेथ गेलाम्हणूनि स्वयें श्रीपती स्वामी जेथें ऋषी बोलतो पावला विप्र तेथें ॥४८॥
जेथेंचि श्रीपति अजामिळ तेथ नेलाऐसे मुनींद्र नृपतिप्रति बोलियेलाभावार्थ कीं न वचनी जन त्या विभागींतो पावला गतिअजामिळ नामयोगी ॥१॥
श्री भूदुर्गा भाग हे तीन जेथें श्रीवैकुंठी पावती धन्य तेथेंज्ञानी भक्त श्रीविभागास जाती तैशा स्थानालागि गेला द्विजाती ॥२॥
जय विजय गळाले ते न त्या श्रीविभागींगन - भव - तम - शेषे दैत्यशाषप्रसंगींगज जलचर पूर्वी दोघ अन्योन्य - शायेंगति परमहि जे कां ते न भक्तिप्रतापें ॥३॥
लव जरी असती हरिभक्तिते उभय बंधु धनार्थ न शापिसेम्हणुनि त्याच मतें सनकादिकां कुवचनें बदले हरिसेवकां ॥४॥
कृष्णापर्णे करुनियां तप यज्ञ तीर्थेपुण्यें अगण्य बहु जोडियलीं समर्थेनेलें म्हणूनि हरिनें स्वपदासि दीना श्रीभाग लभ्य न तथापिहि भक्तिहीना ॥५॥
श्रीभद्भागवतीं गजेंद्र हरिनें जो सोडवीला स्वयेंइंद्रद्युग्न नृपाळ जो गतभवीं तो वेगळा निश्र्वयेंहें तों पद्मपुराणिंचे निज सखे भाऊ धनाकारणेंदेती शाप परस्परें द्विजपणीं होनक्र तो वारणें ॥६॥
गजपति धरिला तो गंडकीमाजि नक्रेंस्तुति करि गज तेव्हां मारिला नक्र चक्रेंजय विजय असे ते दोघ वैकुंठवासीअसुरपण पुराणीं विप्रशापें तयांसी ॥७॥
द्विजवर हरिनामें शुद्ध अत्यंत झालापरिहरुनि अविद्या आत्मतत्वीं निवालाम्हणउनि हरिनें तो श्रीविभागास नेलापुनरपि परतेना जो असा तेथ गेला ॥८॥
या कारणें श्रीशुक बोलियेला कींजे स्थळीं श्रीपति तेथ नेलादुर्गापती भूपति जेथ तेथें गेला न भावार्थ असाच एथें ॥९॥
कोण्ही कैवल्य मोक्षाविण न गणितिते बोलती गोण मुक्तीजे कां अव्यक्तमात्रीं सतत रत जया नावडे विष्णुभक्तीक्लेशें कैवल्य त्यांला पुनरपि सगुणीं लाविलें अंतरंगाहोती सिंधूंत बिंदू हरिजन मिळती सागरीं जेविं गंगा ॥१०॥
घनाच्या मुखें सिंधुचा बिंदु जैसा मिळे सागरीं निर्गुणीं मोक्ष तैसासदा भेटते ऐक्य पावोनि गंगा समुद्रीं असी भक्ति हे अंतरंगा ॥११॥
फिकीमुक्ति भक्ती पुढें ज्ञानियाला स्वयें मुक्ति देती पहाती तयालामुमुक्षूसही कामना मोक्षकामीं न भक्तास जे देखती मुक्ति नामीं ॥१२॥
पडे देह तों त्याचि देहीं मुकुंदा पहाती जगीं टाकुनी लोकनिंदासरे कर्म त्याचें पडे देह जेव्हां हरी ने स्ववैकुंठ लोकासि तेव्हां ॥१३॥
मुमुक्षू जरी सेविती अंबुजाक्षा तरी मागती नित्य कैवल्यमोक्षास्वभक्तां जरी मुक्तिचारी उपेक्षा हरी मुक्ति भक्तीतरी दे स्वपक्षा ॥१४॥
स्वभक्तांसही देउनी दिव्य मुक्ती हरी देतसे मुक्तिही माजि भक्तीजसें नित्यमुक्तां न देहत्व देहीं असे देहसारुप्य मोक्षादिकांहीं ॥१५॥
अमृत केवळ सेउनि राहती परिसुधामधुरत्व न पाहतीअमृत होउनिही रसनामिसें अमृत सेविति भाग्य पहा क्सें ॥१६॥
जनन मरण मेलें दुःख अज्ञान गेलेंहरि - मय वपु केलें विष्णुलोकासि नेलेंन जळति लव लोळें शेष - वक्राग्नि - जाळेंघडतिल विधिगोळे ते न होतील काळें ॥१७॥
विकुंठासुतें निर्मिलें पूर्ण - कामें हरीनेंचि वैकुंठ वैकुंठनामेंलयी तें नुरे मोक्ष हो नित्य कैसें बरें नेणतां बोलती एक ऐसें ॥१८॥
विकुंठेच्या पोटीं हरि मनुजरुपें अवतरेतसी लोकाकारें तनु करुनि वैकुंठ पसरेयथा - काळें जैसे अजित - अवतार प्रगटतीतसीं लोकाकारें सकळ हरिरुपें उमटती ॥१९॥
करी योगनिद्रा हरी शेषशायी लयीं नीजती मुक्त त्याचेच ठायींकरी सृष्टि होऊनि जागा मुरारी तयीं ऊठती मुक्त ही याप्रकारीं ॥२०॥
जयीं निर्मिली सृष्टि होती न कांहीं विकुंठेस हो तेधवां ठाव नांहींतयीं दाविला लोक जो ब्रम्हयाला विकुंठात्मजें निर्मिलें केविं त्याला ॥२१॥
विकुंठेचिया जेविं पोटासि आला तसा लोकही तोचि वैकुंठ झालाविकुंठेचिया तोचि गर्भात पूर्वी कसा जन्मला जो सदा सर्व उर्वी ॥२२॥
निजेही लयीं सृष्टि सर्वात जागे जगीं रामकृष्णादि होऊनि वागेतरी तें अनादित्व तैसें न भागें न वैकुंठलोकासि सादित्व लागे ॥२३॥
वैकुंठावरि काळचक्र फिरतें कोणी असें बोलतीत्यांचे सर्वहि बोल फोल बरवें हें तत्व ते नेणतीनाहीं पङ्गुणईश्वरत्वहि जरी तो योगनिद्रा करीकाळाचें तरि चक्र हें फिरतसे माना तयाही वरी ॥२४॥
काळी ईशाहि सांपडे तरि - गती दे कोण बोला अरेकाळग्रस्त न काळपाश चुकवी ऐसें पहाना बरेंतो जेव्हां निजतो लयीं जन निजे वैकुंठिंचा तेधवांत्या योगांतुनि सर्व युक्त उठती तो ऊठतो जेधवां ॥२५॥
द्रष्ट्रा सर्व गिळूनि जोंवरि असे वैकुंठही नोंवरीयोगीं निद्रित तो तई निजति हें कांहीं न त्या ऊपरेद्रष्ट्यावांचुनि रज्जु सर्प न दिसे द्रष्टाचि होतां दिसेमाया - मात्रचि कंठरुप हरिचें तेथें अविद्या नसे ॥२६॥
नव्हे सर्प हा हार मायाच देहीं असी शुद्ध माया रमाकांत देहींअसें शुद्ध मायाच वैकुंठधामीं तथा पावला विप्र तो धन्य नामीं ॥२७॥
वैकुंठासि अशा अजामिळ असा नामप्रतापें करीगेला भागवतीगतीस न करी कैवल्य जीची सरीनामाचा महिमा अतर्क्य निगमा तो एथ कांहीं मुनीश्रीद्वैपायनपुत्र बोलत असे श्लोकद्वयें नेमुनी ॥२८॥
ज्याणें धर्म समस्तही बुडविले जो निंद्य दासीपतीजो नष्टव्रत ज्यास नेत असतां भोगावया दुर्गतीऐशाही समयीं अजामिळ असा तत्काळ तो सूटलानामें श्रीहरिच्या अनादि रचला तो बंधही तूटला ॥२९॥
नाहीं त्याहुनि कर्म - बंधन दृढ च्छेदावया आणिखीमोक्षापेक्षक त्यास कीर्तन सदां तैसें हरीचें मुखींनामेंजें मन शुद्ध तें रजतमा टाकी तयावेगळेंतें कर्मी न मिळे पुन्हा हरिगुणीं सप्रे म जें आगळें ॥३०॥
शुक म्हणे भरतान्वयनंदना हरिल पातक कर्महि बंधनाअजितकीर्तन ऐकचि सर्वथा इतर जें तप तीर्थ कथा नृथा ॥३१॥
प्रायश्र्वित्त न अन्य नाम - सम हें श्रोत्यां जरीं बिंबलेंगंगा काय करील ये रिति मनीं गंगा बहू तुबलेंएथें तीर्थपदानु - कीर्तन अशा एका पदें श्रीशुकेंश्लोकीं सूचितसें सभे मुनिजना रायासही कौतुकें ॥३२॥
गंगारव्य तीर्थ चरणीं उपजे जयाचेतो विष्णु तीर्थ - पद बोलति विप्र वाचेतीर्थाघ्रि तो म्हणुनियां म्हणतांचि पायींगंगा दिसे अजित - नाम समस्त - देहीं ॥३३॥
नामें स्फुरे तनु समग्र मनांत जेव्हांमंदाकिनी पदनरवांत दिसेल तेव्हांव्यापूनि नाम असणार समस्त अंगात्याची कसी सरि करी चरणांबु - गंगा ॥३४॥
शदांगुष्ठींच गंगा त्रिभुवनपतिचें नाम हें अंग - अंगाजे कां व्यापी विहंगासन - नख - शिख ते दाखवी अंतरंगागंगा ही पापभंगा परिहरुं नशके वासनेच्या कुसंगाहस्तीही तत्तरंगा धुति विषयदिवा इष्टचित्ता - पतंगा ॥३५॥
गंगेंतही गज जसा धुतला तथापीघाली शिरीं धुळि तसें जन चित्त पापींस्त्रानेंकरुनि जरि पावन देह झालापापीं प्रवृत्ति घडणार पुन्हा तयाला ॥३६॥
म्हणाल गंगा हरि पूर्व पापें शुद्धी अशा नामसुधाप्रतापेंदोहीं सही मागुति पापवृद्धी होणार नामीं तरि काय सिद्धी ॥३७॥
पूर्वीच हा निर्णय एथ झाला नामीं द्विधा शुद्धि असे जनालाउच्चारमात्रेंचि हरुनि पापा दावीतसे त्याउपरि प्रतापा ॥३८॥
आजन्म गंगा स्त्रपनेंचि केलीं दुष्टें द्रियेंतीं विषयीं भुकेलींगंगा तटीं ही हरि कीर्तनानें संव्हारिला संग अजामिळानें ॥३९॥
करुनि तीर्थ जप व्रत मागती श्रवण कीर्तन केवळ सद्गतीम्हणुनियां हरिनामसुधा जसी न गति जान्हवि देउं शके तसी ॥४०॥
हरि जसें जळ अन्न तृषा क्षुधा हरि तसी जन - भूक - तृषा सुधापरि सुधा अजरामरता करी न इतरें हरिनाम अशापरी ॥४१॥
जगीं नाना कामीं धरुनि रति नामींच तरलेविरक्तीच्या धामीं धरुनि रति नामींच उरलेसदा तीर्थग्रामीं तरि विषयभूमीं उतरलेमुखेंही स्वर्गामी विषय - विष - धामींच भरले ॥४२॥
याकारणें तीर्थपदानुकीर्तनें दुर्वासनेपासुनियां निवर्तनेंचित्तें असंगें हरिनामनर्तनें होतां नं होती विषयें प्रवर्तनें ॥४३॥
जरि म्हणाल अशा हरिकीर्तनीं विषयसंग न कां उपजेमनींतरि शुकोदित उत्तर अर्ध हा विशद अर्थ करुनि बरा पहा ॥४४॥
हरिगुणीं उपजे रति जेधवां रजतमीं न मिळे मन तेधवांसतत गुंफिल जो गुणरत्न तो नकरि काचमणीप्रति यत्न तो ॥४५॥
अमृतसिंधुतरंग उठे मुखीं नमन आठवि आंविल ते मुखींहरिगुणीं मन घे जरि आवडी मग न दे विषयांत कधीं बुडी ॥४६॥
विषय राजस तामस इंद्रियें विमळसत्वचि मानस निश्र्वयेंअमळसत्वहि तुच्छ - सुख - स्पृहा रजतमाकरितां धरितें पहा ॥४७॥
असुखमिश्रित सर्वहिहीं सुखें सुखचि तें हरि कीर्तन जें मुखेंजरि मनासि असें सुख आढळे रजतमीं न कधीं मग तें मिळे ॥४८॥
विषय कर्म असंग न घे मनीं निरत जो हरिकीर्तननर्तनींम्हणुनि तीर्थ तपोव्रत त्याहुनी अधिक हें हरिनाम म्हणे मुनी ॥४९॥
हरियले जन संशय हो शुकें कथियलें हरि - कीर्तन कौतुकेंप्रकरण - श्रवण - स्मृति - वर्णनीं कथिल पद्य - युगें फळ - एथुनी ॥५०॥
जो हें असें नरकहारक गुह्य कर्णीऐकेल जो सदितिहास विलास वर्णीतोही न जाय नरका न तयास डोळांपाहों कदापिहि शके यम - दूत - मेळा ॥५१॥
पृ० छंद - न जाय नरकाप्रती नवल काय हें भूपतीअमंगळहि पूज्य तो मनुज विष्णुलोकीं अंतीअसा सदितिहास हा श्रवण - वर्णनें सद्गतीकरी जरि अनुष्ठवे फळ न बोलवे तें किती ॥५२॥
फळ इतरपुराणीं तीर्थ - यज्ञ - व्रतांचेंवदति रुचिनिमित्तें तेथ तें लभ्य कैंचेंनवदति फळ तैसें बोलणें तथ्य जेथेंकटुक रुचिनिमित्तें बोलती तीन एथें ॥५३॥
धैर्यः प्रोइझत कैतवोऽत्र म्हणुनी श्रीव्यास ऐसेपरीषष्ठस्कंधमुखींच श्लोक दुसरा तेथें प्रतिज्ञा करीज्या धर्मी कपटार्थ लेशहि नसे तो ये स्थळीं बोलणेंहा वाक्यार्थ म्हणूनि एथ अवघें नाणें खरें तोलणें ॥५४॥
जो लाभ या श्रवणवर्णानिं बोलियेलाकीं तो अमंगळ तरी हरिलोक त्यालाश्रद्धे - करुनि हरिभक्ति करुनि जेव्हांऐकेल वर्णिल फळप्रद होय तेव्हां ॥५५॥
श्रोता श्रद्धायुक्त ऐकेल जेव्हां तो वैकुंठालागिं जाईल तेव्हांजो भक्तीनें यासि वर्णील वक्ता श्लोकीं सांगे लोक हा त्याचि - भक्तां ॥५६॥
श्रद्धा आस्तिक - नाम - बुद्धि महिमा जो वर्णिती तो खराऐसा निश्वय बाणतां स्वचरणें वैकुंठ येतें घराऐसा ही इतिहास हा परिसती त्यांला नुपेक्षी हरीत्यांचीं आचरणें अमंगळ जरी नासूनि तीं उद्धरी ॥५७॥
म्हणुनि शेवट पद्महि येरिती वदतसे शुक भूमिपतीप्रतीप्रकरण श्रवणीं हरि कीर्तनीं तरति विस्मय हा न गमे मनीं ॥५८॥
मरों टेंकला विप्र पुत्रोपचारें हरीचें वदे नाम लोकप्रचारेंअसा पातकी विष्णुलोकासि गेला म्हणे भक्तिभावें उणें काय त्याला ॥५९॥
प्रकरणश्रवण स्मृतिवर्णनें धरुनि भाव मनीं हरिकीर्तनेंनवल काय जगीं जरि तो तरे श्रवणमात्र करुनिहि उद्धरे ॥६०॥
प्रकरणश्रवणेंचि तरे जई नवल काय अनुष्ठिल तीं तईम्हणुनि भाव असा शुक बोलिला तदनु नामसुधेंत निरुपिला ॥६१॥
षष्ठस्कंधमुखीं अजामिळकथा अध्या हा दूसराश्रीमद्भागवतांत नाममहिमा - निर्धार जेथें खराटीका नामसुधा म्हणूनि रचिली हे वामनाच्या मुखेंश्रीकृष्णें सुरस प्रसन्नवदनीं कानीं मनीं दे सुखें ॥६२॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तेथ
— तिथे
तैसें
— तसे
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
ऐसें
— असे
माया
— भासमान करणारी शक्ती
समाधि
— चित्त पूर्ण स्थिर होण्याची अवस्था
देखे
— पाहतो
जेथ
— जिथे
सकळ
— सर्व
ठायीं
— ठिकाणी
वरी
— वर; शिवाय

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.