करिति चरण तुझे जे शिळा दिव्य रामाहरुनि दुरित माझे हो तुतें सेव्य रामाभ्रमर मन पदाऽब्जीं पाववी त्य विरामाभव - हर भव - चाप - ध्वंस विश्वाऽऽभिरामा ॥१॥
जगीं तूं असा कीं घटीं एक मातीगुण श्लोक - कोटींत तूझे न मातीनिरुपीन त्या सिं धुच्या बिंदु - मात्रापुरे तेचि संसार - रोगास मात्रा ॥२॥
महां औषधांतूनि थोडेंच कांहींकरी सेवितां नाश वातादि कांहींपुरे आमुची हे अविद्या मरायातुझें एकलें नाम जी राम राया ॥३॥
जर्ही नाशिली आमुची जी अविद्याजितां ही दिली मुक्ति देऊनि विद्यातुझी कीर्ति मुक्ती हुनी गोड वाटेशुकादीकही चालती याच वाटे ॥४॥
ह्नणोनि जे भागवतीं शुकानेंलीला तुझी वर्णिली कौतुकानेंटीका तिची मी क्षिति - लोक - वाणींकरीन जेथें न सुखासिवाणी ॥५॥
बहू वृद्धी ग्रंथा न करुनि वदावी यश - सुधाप्रति - श्लोकीं जे कां करि अमृत संतृप्त वेसुधासम - श्लोकीं टीका ह्नणुनि करितों जी रघुपतीजिला मंत्र - प्राय स्मरति वदती लोक यजिती ॥६॥
निजाश्रमा राघव कौशिकानेंनेली कथा तेथुनि हे शुकानेंआरंभिली मंगळ तीस गातेंगाधीमुनी उद्धरीतो जगातें ॥७॥
चाले वना - प्रति पुलस्ति - सुतासि मारीपाळी स्व कोसेल - धरा - सह भू - कुमारीया मंगळा - चरण - पद्य - रसें श्रुकानेंसंक्षिप्त वर्णिलि कथा अति कौतुकानें ॥८॥
टाकी ताताऽर्थ राज्या वन वन विचरे त्या पदीं ज्यांस वाटेसीता - हस्ताऽब्ज भारी अनुज कपि पती सेविती नित्य वाटेबोले निर्नाशिकेच्या असुर जनक - ज्याने तंई क्रोध लेशेंबांधे दापूनि सिंधू वधि रिपु - कुळ त्या रक्षिलें कोशलेशें ॥९॥
अहो विश्वामित्रें दशरथनृपा प्रार्थुनि तईस्वयज्ञातें नेला प्रभु असुर मारुनि विजईतया - संगे जातां करुण मिथुळाग्राम - गमनीशिळा शापें मार्गी करि पद - रजें हंस गमनी ॥१०॥
सीता - स्वयंवर - गृही भवचाप हातींभंगी मुख क्षितिप वीर अहो पहातीलीले - करुनि गज - बाळक इक्षु दंडमोडी तसा भय करी ध्वनि तो उदंड ॥११॥
जिंकोनि ने स्व - गुण - रुप - वयें समानासीता रमा स्व - त्दृदया - वरिलब्ध - मानानिःक्षत्रिया क्षिति करी हरि गर्व वाटेत्याच्या जयास नृप - बीज असात्द्य वाटे ॥१२॥
जो स्त्रीस लंपट सकाम तथापि त्याचीमाथां धरुनि करि गोष्टि खरी पित्याचीराज्याऽदिकें त्यजुनि जाय वना सदारप्राणावरी जितचि मुक्त तसा उदार ॥१३॥
लंका - पती - भगिनिच्या सुख दुषणातेंकेलें वधी मग तया खरे दूषणातेंमारी चतुर्दश - सहस्त्रहि चाप - हातींकोदंड चड वनिं कष्ट मुनी पहाती ॥१४॥
सीता कथा परिसतां स्मर - विव्हळानेंजो निर्मिला दश - मुखें मृग हो खळानेंमारीच तो वधि तया प्रभु कार्य - दक्षाजाऊनि दूरि शिव संहरी जेविं दक्षा ॥१५॥
तो राक्षसा धम हरी जनकाऽत्मजातेंनेतां तृकें जसि अजा अति दीन जातेंतेव्हां वनीं रघुपती अति शोक दावीकीं स्त्री - प्रियास गति सेवटिं हे वदावी ॥१६॥
झाल्या स्व कार्य मृत - देह कवंध मारीजे मित्र होति कपि शोधुनि भू - कुमारीवाळी - वधा - उपरि सांगाति तेच वेळेये विश्व - वंद्य मग यां - सह सिंधु - वेळे ॥१७॥
सक्रोध लोचन भयेंचि पडे समुद्राआंदोळतां जळचरें अति मौन्य - मुद्राझाला समूर्त्त शिरिं घेउनि पूजनातेंये पाय वंदुनि वदे भव - भंजनातें ॥१८॥
जो तूं अनंत समजोन कुबुद्धि त्यातेंकूटस्थ आदिपुरुषा जग - पाळिल्या तेंदेव प्रजाऽधिपति भूत - पति क्रमानेंमाया - पति स्त्रजिसि सत्व - रजें - तमानें ॥१९॥
माने तसें जलधितें अजि लंधि मातेंश्री पाव मारुनि पुलस्ति - सुताऽधमातेंपाषाण तारि पसरे यश जेविं लोकींगातील कीर्ति नृप सेतु पथा विलोकीं ॥२०॥
सुग्रीव नीळ हनुमंत कपींद्र सेनाते आणितांख गिरि - शिखा नभ तें दिसेनात्या सेतुनें रघुपती कपि - दग्ध - लंकादेखे विभीषण वदे मति - निष्कलंका ॥२१॥
वेष्टूनि ते नगरि वानर ते निघालेलंकेंत घालिति गृहादि - वरुनि घालेहस्ती जसे ढवळिती - हदिनी - जळाला ॥२२॥
पुत्र प्रहस्त अतिकाय विकंपनाऽदीधूम्राक्ष दुर्मुख दिशा भरिती स्व नादींसर्वास त्यांस सह - कुंभ - निकुंभ धाडीतो कुंभकर्णहि उठे जग झोडि धाडी ॥२३॥
येतां निशाचर चमू अति वीर्य - शक्तीहातीं धनुष्य शर तोमर शूल शक्तीसुग्रीव लक्ष्मण मरुत्सुत ऋक्ष नीळया अंगदादि सह ये प्रभु मेघ - नीळ ॥२४॥
त्या अंगदादि रघुनायक वानराचीशस्त्रीं गदा गिरि तरु शर तोमरानीते मारिली निघनिघों चतुरंग - सेनासीताऽपहारक - दळीं शुभ तें दिसेना ॥२५॥
लंकेश लक्षुनि बळ - क्षय कोप - तापेंये वाहनावरि चढोनि महा - प्रतापेंतों ये सुरेंद्र - रथ त्या - वरि राम - रायाहाणे शर त्रिशत राम शरें मराया ॥२६॥
बोले रघूत्तम खळा मळ राक्षसांचातूं श्वान शून्य गृह - भोजन भक्षसाचासीताऽपरोक्ष हरिसी तुज निस्त्र पातेंमी काळ मारित अमोघ - बळास्त्र - पातें ॥२७॥
जों घे दशानन असा व्यवसाय कानींदापूनि त्यास रघुनायक सायकानींभेदूनि ऊर वधि आननिं रक्त नाकींजैसा व्यये सुकृत - संचित - रिक्त नाकीं ॥२८॥
रघुपति विजयी त्या रावणानें व धूनींशुक मग विभुलीला दिव्य जो तीस वर्णीस्व पितृ - कृत वदे हे श्लोक बत्तीस वर्णी ॥२९॥
श्लोक - वृत्त कथिलें यमकानींगातित्यास न पडे यम कानींपावतील रघुनाथ - पदातेंजे सदां स्मरति नाथ - पदाते ॥३०॥
अष्टाक्षरी चरण तो यमकीं न साजेलीलाच त्यांतिल सुखा वह मानसा जेन प्रासही दिसति ज्यास वरे कदापीकीं काळ - मृत्युस तदर्थचि एक दापी ॥३१॥
समश्लोकी - मध्यें रघुपति करीतो नियमकींकथावे श्लोकार्थ स्वगुण - रचना युक्त यमकींअनुष्टुप पद्यातें म्हणुनि विषद - छंद - निकरींकरी तो रामाचे चरण शिरिं ते वंदुनि करीं ॥३२॥
मृतां राक्षसांची वधू - वृंद सेनारडे आफळे अंत दुःखा दिसेनास्त्रिया आणि मंदोदरी शोक - रीतीनिघोनी पुरींतूनि भारी करीती ॥१॥
मेले सुमित्राऽत्मज सायकानींआलिंगुनी त्यांसहि बायकानींकेला बहू शोक अनेक रीतीउच्च - स्वरें रोदन ज्या करीती ॥२॥
रडति दशमुखाच्या त्यास हा नाथ नाथातुज - विरहित लंका आणि आम्हीं अनाथानगरिवरि रुसोनी वीर सेजें निजावेंतरि शरण पुरीनें आजि कोणास जावें ॥३॥
होउनी वश तुवां मदनातेंआणिली प्रभु - वधू सदनातेंक्षोभली जनकराज - कुमारीतो प्रभावचि असा तुज मारी ॥४॥
लंका स्त्रियांसहित ते विधवाच केलीगृध्राऽन्नते तनुहि जे विषयीं भुकेलीसद्वंश - भूषणहि तूं नरकासि जासीकेला अनर्थ सकळा तनुजाऽनुजांसीं ॥५॥
पुसोनि रामास विभीषणानेंक्रिया मृतांच्या कुळ - भूषणानेंकेल्यास्व - शास्त्रें पर - लोक - रीतीतिळोदकीं लोक जसें करीती ॥६॥
देखे रघूत्तम अशोक - वनांत सीतेनेत्रीं स्ववे विरह - शोक - वनां तसी तेनाहींच बिंदु भरिही जळ जात कंठींकंठी तसे दिन असी जळजांत कंठी ॥७॥
पावली स्व विरहें तनु कंपाराम तीवरि करी अनुकंपाहोय तोचि सुख - वासर सीतेमग्न राम सुखवास रसी ते ॥८॥
जवळी अनुज सीता राम बैसे विमानींकपि - पति - सह ज्यातें बंधुतें जेविं मानीदशमुख - अनुजा दे उत्तम - श्लोक लंकापवन - ज - सह यानीं घे तया निष्कलंका ॥९॥
प्रभु करि चिरजीवी शत्रुच्या सोदरासीरवि - शशि - गगनीं तों राज्य दे मोद - रासीरघुपति परते हो तें सुरां सौख्य वाटेस्तविति कुसुम वर्षे त्या विमानांत वाटे ॥१०॥
गो - मूत्र - पक्क जव भक्षूनि वाट पाहेयेणें तदऽर्थ भरतावरि हो कृपा हेकीं स्थडिलावरि निजे क्षण कल्प कंठीजो प्राण देउनि असे बसला स्व - कंठीं ॥११॥
श्रवणि भरत ऐके राम आला अयोध्येंअभिमुख विभुतें ये येति आमात्य योध्येपुर - जनगुरुसंगें पादुका मस्तकांऽतींकरिति रवि - शशीच्या ज्या अहो ध्वस्त कांती ॥१२॥
वसे नदिग्रामीं परि त्दृदय रामीं भरत तोविनां त्याचे पाय त्रिभुवनिं न जो लाभिं रत तोसवे वेदाऽध्यायीं धरि इतर ठायीं न मन तोकरी वाद्यां - गीतां - सहित पद - पद्या नमन तो ॥१३॥
कनक - मय पताका वृंद चित्र - ध्वजांचेरथ चपळ तुरंगीं स्वर्ण - सन्नाह ज्यांचेकवच - सहित योद्धे मुख्य मुख्य प्रजांचेप्रभु अभिमुख येती दास पादांऽबुजाचे ॥१४॥
चिन्हें महा विभव - राजविलास - मुद्राआणी पुढें भरत त्या करुणा - समुद्राप्रेमें पदावरि पडे विसरुनि देहाआलिंगनें प्रभु भुजा पसरुनि दे हा ॥१५॥
प्रथम शिरिंहुनी त्या पादुका पादपद्माजवळी भरत ठेवी ज्या पदीं नित्य पद्मोंमग चरणिं पडेल्या क्षेम दे सु - स्वभावाप्रभु नयन - जळीं सप्रेम न्हाणी स्वभावा ॥१६॥
ब्राह्मणांस करि वंदन पादींहें मला प्रिय असें उपपादीलक्ष्मएग क्षिति - सुतंसह पाईलोक वंदिति जयासि उपाईं ॥१७॥
कोसलाऽधिपति कोसल लोकींदेखिला बहु दिसां अवलोकींनृत्य वस्त्र उडऊनि करीतीपुष्प - वृष्टि वरि कौतुक रीती ॥१८॥
पृथ्वीछंद - धरी भरत पादुका व्यजन चामरें विंजितीविभीषण कपींद्रजे निज सुखें तयाच्या जितीसुधाऽकर धरी मरुत्सुत सिताऽतपत्रा कृतीप्रवेश करि राघव स्व - नगरीं पवित्राऽकृती ॥१९॥
श्लोक - धरुनि सधनु भाते दास्य शत्रुघ्न मानींधरि करिं जळ - झारी राम - कांता विमानींधरियलि असिचर्मे अगटें ऋक्ष - पाळेंविभव नगरलोकां दाविलें हें कृपाळें ॥२०॥
रघुपति अति शोभे पुष्पकीं व्योम - वाटेद्विज - गुरु - सह नेत्रा - उत्पली सोम - वाटेनटति युवति गाती कीर्ति बंदी विमानींप्रियतम - जन आत्मा आपुला जेविं मानीं ॥२१॥
रचित कुसुम - रत्नें श्री अयोध्या पुरी तेजन - अमृत - रसाच्या वाहती त्या पुरी तेंनृप - गृहिं गुरु - पल्या माउली त्यांस भावीनमन करि जयांतें तोषिलें बंधु - भावीं ॥२२॥
वंदिलें अवघियां वडिलां होधाकुट्यां स्वपद - वंदन लाहोराम - लक्ष्मण - धरा - तनयांहींघेतलें पुजूनि पूजन यांहीं ॥२३॥
वसे नंदिग्रामीं जननिहि विना - राम नयनींन पाहे शत्रुघ्ना - सह भरत जो भूमि - शयनींम्हणोनी चौघांही भिजविति तिघी एक समयींतनु - प्राण - न्यायें नयन - जळिं माया - रस - मयी ॥२४॥
मग उकलि जटांतें राम कोदंड - पाणीकुळ गुरु जई न्हाणी घे चतुः सिंधु - पाणीत्रिदेश - गुरु सुरेंद्रा ये रिती रामचंद्राद्विज वडिलहि देती मान वंशाऽब्धिचंद्रा ॥२५॥
सुस्त्रात होउनि असा करुणांऽबुराशीअंगी करी मग विभूषण अंबेराशींप्रार्थूनि दे भरत बंदुनि आसनातेंघेतो पद - प्रद सुरां कमळाऽसनातें ॥२६॥
प्रजा स्ववर्णाऽश्रम - धर्म - वाटेलाबी जयां बापचि राग वाटेप्रजा गमे संतति त्य पित्यालास्पर्शो न दे दुःख कदापि त्यांल ॥२७॥
त्रेतायुगीं कृतयुगा - परि काळ जालादेखूनि राज्य करितां रघुवंश जालाधर्मज्ञ राम सुख दे सकळां प्रजांलाप्रेमें प्रजा भजति त्या भरताऽग्रजाला ॥२८॥
वनें नद्या पर्वत सर्व खंडेंद्वीपां - समुद्रां सहितें अखंडेहे काम धेनू सकळां प्रजांलादेखूनि होती भरताऽग्रजाला ॥२९॥
बहु भिन यम लोका श्रीवरा रामरायाजन मरण न पावे जो न बैसे मरायावळखति न जराऽधि - व्याधि - शोकादिका याश्रम भय असुखांतें नेणती लोक - काया ॥३०॥
रघुपती निज एक वधु व्रताशिकवि हो जन - चित्त मधुव्रतास्फुट करी गृह - धर्म समस्त कींधरुन लोक कथा - रस मस्तकीं ॥३१॥
करि जनक - कुमारी नित्य निर्व्याज सेवातुह्मिं हि जन मनीं हो तो महाराज सेवासगुण सलज सीता भाव जाणे पतीचेमन हरिति पतीचें प्रेम संलाप तीचे ॥३२॥
राम वृत्त कथिलें यमकांनींगाति त्यांस न पडे यम कानींभिन्न अर्थ रचना - समजावीकाव्य - रीती चतुरीं समजावी ॥३३॥
तदुपरि शुक सांगे राम मांडी मरवा तेंनिज पदचि यजी जें हें जगद्धाम खातेंगुरुवचन विधानें लंकना थारि पूजीसुर - मय सुर सेवी तद्रिपूचा रिपू जी ॥१॥
दिशा पूर्व होत्या दिल्ही दक्षिणा होदिल्ही ब्रह्मयातें दिशा दक्षिणा होप्रतीची स्व अध्वर्यु दे जो तयालाउदीची दिशा दे स्व - उद्गात याला ॥२॥
आचार्य जो मध्यम भू तयालादेतां महा उत्सव दात यालाहें निस्पृह ब्राह्मण सर्व लाहोगोडी ह्नणे राम मतीस लाहो ॥३॥
तनुस अंबर मात्रचि भूषणेंइतर सर्व दिल्हें रघु - भूषणेंकरि असें रघु - नंदन दान कींउभि समंगळसूत्रचि जानकी ॥४॥
घेऊनियां ब्राह्मण सर्व लाहोते बोलती ब्राह्मण वत्सला होजो ब्राह्मणाचा स्वयमेव देवप्रभूसित्या बोलति भूमि - देव ॥५॥
न जी दीधलें काय आम्हांसि देवादिल्हें फार याहूनिही देव - देवाप्रकाशोनि चित्तीं अविद्या तमातेंहरी देखतों त्याचि सर्वोत्तमातें ॥६॥
सर्वज्ञता दशशताऽननही न मोजीब्रह्मण्य देव रघुराज तुतें नमो जीतूं पुण्य मूर्ति अजि मस्तक - रत्नदेवाजो दे स्व पाद - रज हंस जना सदैवा ॥७॥
जयाचा जगीं कीर्ति - सल्लाप होतोस्वयें गूढ - राती जना हो पहा तोवदे एक कोण्ही स्व - भार्येस वाचातितें आयके श्रोत तो राघवाचा ॥८॥
स्वयें जासि दुष्टे पराच्या गृहातेंनव्हे राम मी कीं धरुं तूज हातेंदशग्रीव लाऊनि ने हात सीतेवधू - लुब्ध अंगीकरी हा तसीते ॥९॥
दुराऽराध्य जे अज्ञ ते लोक रीतेन जाणोनी वार्त्ता अशा ही करीतीह्नणूनी सतीतें वियोगाऽश्रमातेंकरी जाय ते वाल्मिकी - आश्रमातें ॥१०॥
ऋषि - जवळि असे ते गर्भिणी राम - राणीवन विभवहि मानी डोहळ्याची शिराणीकुश लव सुत दोघे होति ते दिव्य काळींमुनि करि विधि - कर्मे उत्सवाच्या सुकाळीं ॥११॥
ऐसेच लक्ष्मण - कुमारहि वंशे - केतुतो एक अंगद दुजा सुत - चित्रकेतुतक्षाऽख्य पुष्कळ असीं भरताऽत्मजांचींनामें कुळें बहुत विस्तरणार ज्यांचीं ॥१२॥
शत्रुघ्न - पुत्री रच - समान साचींनामें सुबाहु श्रुत सेन साचींशत्रुघ्न मारी असुरास आणीतद्वित्त रामार्पण - हेतु आणी ॥१३॥
शत्रुघ्न नाम - गत दाखवि अर्थ साचाकीं पुत्र जो लवण त्या मधु राक्षसाचामारुनि तो मधुवनीं मधुरा स्त्रजी कींजी माजि कृष्ण - तनु राम खळास जिंकी ॥१४॥
पतीचीं पदें काननीं राम - रामास्मरोनी ह्नणे आननीं राम रामामुनीच्या करीं पुत्र आणूनि घालीक्षितीत स्वयें माय - पोटीं निघाली ॥१५॥
आयकोनि जहि शोक निवारीचालिलेंच नयनांतुनि वारीराखिले गुण तिचे त्दृदयातेंनाऽवरेच आजि त्या सदयातें ॥१६॥
सीता हेतु क्लेश आद्यंत रामाएवं लोकीं दुःख मूळाच रामाथोरां थोरां कष्ट यांच्याचि संगेंदावी ऐसें राम सीता - प्रसंगें ॥१७॥
तया हीवरी अग्नि होत्रादि याजीकरी ब्रह्मचर्य स्वयें तो क्रिया जीअखंडाऽग्नि तेरा सहस्त्राऽब्द होमीकरी ख्याति कीं कर्म - कर्ता अहो मी ॥१८॥
पद - युग मृदु जें कां पल्लवां तुल्य वाटेतदपि तुडवि कांटे दंडकाऽरण्य - वाटेस्मरत चरित त्याला ठेउनी तोचि ठेवागमन करि मनीं ते लोक हो पाय ठेवा ॥१९॥
आश्चर्य कीं अधिक साम्य जया असेनात्याला सहाय समरीं कपि ऋक्ष सेनाबांधी समुद्र वधि रात्रिचरादिकांहीहे कीर्ति तारकहि त्यास न थोर कांहीं ॥२०॥
गाती ऋषी नृप - ऋषी प्रति या यशांतेंपापघ्न शुभ्र करि दिग्गज जो दिशांतेंतो राम मी शरण तच्चरणांऽबुजातेंसंभाविती सुर - नरेंद्र किरीट ज्यातें ॥२१॥
रघुपति - चरणाचा दर्शन स्पर्श लाहोउठत वसत चित्तीं राघव स्पर्शला होनिघति परम योगी भाग्य तें कौसला होजितचि भव जयांचा राघवीं नासला हो ॥२२॥
पुरुष रघुपतीच्या आयके जो कथा रेभव - भय न तयाचें हें घडी एक थारेतुटति सकळ कर्मे होय दुःखाऽग्नि हिंसापरम - करुण - भूतीं होय टाकूनि हिंसा ॥२३॥
नृप पुसत शुकातें वर्त्तला केविं रामस्व - जन - अनुज - लोकीं सर्व लोकाऽभिरामवद सकळ जनींही केविं तो पूर्ण - कामप्रियतर वरिला जी हा करी पूर्ण काम ॥२४॥
सिंहासनीं बसलियावरि दिग्जयातेंधाडी स्वबंधु - वश सर्वहि ते जयातेंभृत्यां - सह प्रभु फिरे नगरीस पाहेश्री - मूर्ति दाखवि जनांस करी कृपा हे ॥२५॥
गज - मद सलिलाचे कीं सडे चंदनाचेसुरवर - मुकुटाचे वोवसे वंदनाचेनगर विविध दावी भाव हे मानसाचेरघुपति - पद - पद्मीं लाधले मान साचे ॥२६॥
गोपुरें उपरमाडिया सभाहेम - कुंभ वरि देति यास भामंदिरीं सुर - गृहीं ध्वजाचि यासाउल्या निबिड नित्य ज्यांचिया ॥२७॥
प्रतिद्वार रंभादि - पूगी फलांचेतरु घोंस केले फुलां - पोफळांचेप्रभा तोरणामाजि कां आरशांचीमहा दीप्ति हेमांऽबरा फारशांची ॥२८॥
स्थळीं स्थळीं आणुनि पूजनातेंतों पूजिती लोक निरंजनातेंते बोलती पाळि अजिक्षितीतेंपूर्वी तुवां उद्धरिलेंचि तीतें ॥२९॥
देखोनि काळें बहु राघवास त्यात्या पाहती टाकुनियां गृहा सत्याज्या सुंदरी वेंधति मंदिरोपरीपुष्पें बहू वर्षति हो परोपरीं ॥३०॥
ये त्यावरी निजगृहा - प्रति जे विराजेकीं देखिले सकळ पूर्वज राज राजेंवस्तू अमोल्य गणना न धना कदापीजें कां कुबेर - वरुणेंद्र - गृहांस दापी ॥३१॥
स्वयंभा वैडूर्या करुनि रचिले स्तंभ वरवेतयांच्याही पंक्ती क्षितिवरि वरी पाच मिरवेप्रवाळांची द्वारें स्फटिक मय - भिंती विरचितागृहाच्या रामाच्या सकळ रचना दिव्य उचिता ॥३२॥
शृंगारिलें चित्र - विचित्र - हारींमुक्तादिकीं रात्रि तमोऽपहारीसर्वोपभोगाऽर्थ समृद्धिकारीवसे गृहीं त्या प्रभु निर्विकारी ॥३३॥
सुगंधीं सदा धूप - दीपीं विराजेजन स्वामि त्यांच्या गृहीं जेविं राजेस्त्रिया जेविं देवाऽगना दास दासीअशा मंदिरी चित्त रामीं उदासी ॥३४॥
प्रभु करि सहसीता त्या गृहीं लोकलीलाश्रवण - पठण - मात्रें नाशती ज्या कलीलास्व - सुख - रत विरक्तां सेव्य जो राम होतोस्मर तदुरति काळीं श्रीघनश्याम हो तो ॥३५॥
स्वधर्माऽनुकूळ प्रभू भोग सारेयथा काळ भोगूं न वर्णी असारेबहू वर्ष - वृंदें जरी राहिला होदिल्हा वामनाला पद - ध्यान - लाहो ॥३६॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.