लता सत्या कीं खगगमन - भक्ताऽमरतरुतरु हातीं तो श्रीपति भवनदी - पार उतरुधरी लक्षी पक्षी करतळयुगीं पादयुगळागळां रत्न ध्यावा द्रुम - गरुड - संयुक्त सगळा ॥१॥
खगेंद्र खांटां सुरभूरु हातेंहातें धरी पादसरोरुहातेंत्याच्या स्मरा नासिल तो असल्यासत्यापती दाविल नित्य सत्त्या ॥२॥
श्रीकृष्णपादाद्भुत वारिजातीजाती भवार्ती सुख - पार जातीजाती उणे त्यांसहि दे पदासीदासीं अशाच्या स्तविजे पदासी ॥३॥
म्हणूनि गातों गुण माधवाचावाचाळ मी भाट रमा - धवाचावाचा प्रबंध प्रभु - वैभवाचावाचा हरीते भ्रम या भवाचा ॥४॥
वदा नाम भामाविलास प्रबंधाअविद्येचिया जो हरी क्षिप्र बंधाहरी भा प्रभा मा रमा सत्य भामाप्रकाशे न कां जेविं नासत्य भामा ॥५॥
कृष्णासि कृष्ण - पद - भक्ति - विशारदानेजें स्वर्ग - पुष्प दिधलें मुनि नारदानेंतें रुक्मिणीप्रति दिलें त्रिजगान्निवासेंजें द्वारका करि भरोनि सुगंध वासें ॥६॥
असी गोष्टि दासी - जनीं बायकांनींविचारुनियां सांगतां जाय कांनींतईं सत्यभामा महा - क्रोध दावीबुझावी हरी तेचि लीळा वदावी ॥७॥
गडबडां धरणीवरि लोळतेवदवती न कवीसहि लोळ तेरडत मूर्छित होय घडी घडीपवन निश्चळ नेत्र न ऊघडी ॥८॥
अलंक हार गळांतिल तोडितेकुरळ केश मुखांवरि सोडितेकर - युगें उर मस्तक ताडितेवसन आणिक कंचुकि फाडिते ॥९॥
महा - उष्ण - श्वासें करुनि वदते शुष्क अधराधरापृष्ठीं जाडा न शठ दुसरा या गिरिधराधराया माझा हा कर कपटि कैंचा जनमलामला जो निंदूनी कुसुम तिस देऊनि रमला ॥१०॥
सख्या हो मेल्याही शवहि न शिवो हें यदुपतीपती नाना स्त्रींचा पतित - जनही ज्यासि जपतीनका येऊं देऊं सदनिं सवतीच्या पियकराकरातें लावीना मज कपटि ऐसें तुम्हिं करा ॥११॥
इत्यादि नानाविध भाव दावीते शोक - वार्ता कितिहो वदावीकृष्णें समाधान विचित्र केलेंत्या वर्णनीं चित्त असे भुकेलें ॥१२॥
रडत रडत मूर्छेमाजि वृत्ती बुडाल्यापरम विकळ मी तूं या स्मृतीही उडाल्याउचलुनि सखियांनीं मंचकीं दिव्य - सेजेनिजविलि मृततुल्या सत्यभामा दिसे जे ॥१३॥
ये अशांत सदनांत हरी तोजो अनादि भव - शोक हरीतोकिंकरी नमुनियां चरणातेंसांगती सकळ आचरणातें ॥१४॥
सर्वज्ञ तीची समजोनि ठेवीमौनेंचि नाकावरि बोट ठेवीकाढी उशी घालुनियां स्वमांडीत्यानंतरें सांत्वन - यत्न मांडी ॥१५॥
स्तनीं आननीं बिदु जे काजळाचेतिच्या लोचनींच्या स्वशोकाजळाचेपुशी हस्त - पद्येंचि आधीं हरी तोजया पाणिनें सर्व आधीं हरी तो ॥१६॥
म्हणे शोक कां प्राप्त झाला महाहाअसी कष्टली कां शुभांगी अहाहान बोलेचि कां आमुची आजि राणीजिच्या बोलण्याचीच आम्हां शिराणी ॥१७॥
कस्तूरि आजि न दिसे वदनीं कपाळींहें निष्कळंकपण या द्विजलोक पाळींमुक्तां द्विजां त्यजुनि कां परि शोक पाळीकां क्रोध या शशिस यासि जसा कपाळीं ॥१८॥
इत्यादि सौंदर्य मुकुंद वर्णीतें आइके तप्त - सवर्ण - वर्णीतरी न पाहे मुख कृष्णजीचेंस्वमानभंगें मन उष्ण जीचें ॥१९॥
जईं श्रीवत्सांक प्रभु करि निजांक - स्थिति शिराशिरा नाडी प्राण प्रगटति न लाऊनि उशिराशिगणी शब्दांची पुरवि तरि डोळे न उघडीघडी जे मानाची बिघडलि असे तोंवर घडी ॥२०॥
ब जागीची जागी स्वमति परि डोळे न उघडीघडी एक क्रोधें मन बुडवि मानी अवघडीघडी पूर्व प्रेम - स्थितिस बसतां तीस विघडीघडी स्त्रीजातीची घडविलि असे ख्याति उघडी ॥२१॥
जयां देती लाड प्रियपति तयांचाच ठकळाकळा कांति भ्रांति धरुनि अति धीटाच सकळकळावें या लोकीं म्हणुनि वदती ते शशि - कळाकळा हे दावी कीं थट घट वदे क्रोध - विकळा ॥२२॥
सख्या दुःखी तूझ्या मजसहित कीं कान उगलेगळे नेत्रीं पाणी न निघति मुखीं शब्द सगळेकिती मी प्रार्थीतों धरुनि शिर अंकाच उपरीपरी क्रोधाची हे अधिकचि दिसे अद्भुत परी ॥२३॥
वदे भामा कोपें अति विकळ चाऊनि अधराधरा पृष्ठीं नाहीं ठक तुज असा अंबुज - धराधरावें या अंकीं शिर अजि तिचें पक्षिगमनामना आलें देणें कुसुम जिस तें कंस - दमना ॥२४॥
तों नेत्र मोडुनि वदे ढकलूनि मांडीभ्रू - मंडळीं भ्रमण अंगुलि - भंग मांडीतों कृष्णजी करुनि हास्य म्हणे अहाहावेडे अनर्थ इतुक्यास्तव कां महाहा ॥२५॥
अर्पितां मुनिवरें सुमनातेंवाढलें प्रथम हेंचि मनातेंकीं असा तरु पुरींत असावात्यांतही स्वसदनींच वसावा ॥२६॥
तत्रापि जे प्रिय बहू स्ववधूचि माजीतो स्थापणें तरु तिच्या सदनाचि - माजीते तूं प्रिया तुजचि देइन त्या द्रुमातेंहें वाटलें प्रथम आण तुझीच मातें ॥२७॥
तुतें वृक्ष देणेंचि यालागिं आधींफुलें नासिला जो तिला होय आधीन जाणोनि केले तुवां कष्ट भारीसमाधान ऐसें करी कैठभारी ॥२८॥
जे शब्द योजित असे मनिं पारिजातींजाती तिच्या त्दृदय - सुंदर - वारिजातींजाति स्वभाव तरि ये वदनांबुजातींजा तीस द्या तरुहि सेवित - देव - जाती ॥२९॥
मत्प्रीति तीवरि अगे जसि आरसाचीसाची तुझी शपथ लोचनसारसांचीसाची नसेल तरि त्यांतहि श्लाघ्य राणीराणी वडील म्हणती तिस ते शिराणी ॥३०॥
फूल देउनि तिला उतराईहोय मी समज हे चतुराईदेतसें तरुचि तो तुजला गेखेद हा न करणें तुज लागे ॥३१॥
हरी जाणें हें कीं न वदत असें क्रोध - निकरेंकरें आलिंगावी प्रिय वदत हे म्यां प्रियकरेंकरें श्री चंद्राच्या कठिन शशिकांत द्रवतसेतसे हे ही भाव प्रगट करणारी अमृतसे ॥३२॥
करुनी अशा सत्य नेमास तीतेंवळें वोढुनी सत्यभामासतीतेंदिलें क्षेम त्या दुर्लभा माधवानेंचहूंहीं भुजीं सत्यभामा - धवानें ॥३३॥
असी ते बुझावूनि रंभोरु हातेंतिच्या धूतसे हो मुखांभोरु हातेंउटी लावुनी वाटिल्या केशरा जी ॥३४॥
पुढें राखडी गुच्छ केशाऽग्रभागींमध्यें भूषणें अन्य त्यांच्या विभागींवरी शीसफूलाख्य सीतांशु भांगींद्विजें मोतियें लेविलीं त्या शुभागीं ॥३५॥
मुक्तां द्विजांची नवसिंधु जाचीज्याची चमू नौक्तिकसिंधु ज्याचीज्याची प्रभा क्षीरसमुद्र ज्यातेंत्यातें धरी कृष्ण करां बुज्यातें ॥३६॥
करि हरि यमुना हो मूद गंगावनाचीमिरवि धवल - पुष्पीं दीप्ति गंगा - वनाचीसित असित नद्यांच्या संगमीं श्री - त्रिवेणीतसिच यदुपतीनें घातली चित्र - वेणी ॥३७॥
पतीनें अळंकारितां फार साजेसखीचे करीं पाहते आरसा जेगमे की स्वसौंदर्य - सीमा न साहेप्रिया प्रीतिनें वाढवी मानसा हे ॥३८॥
मुखेंदु शोभे बहु भामिनीचानीचा दिसे हा पति यामिनीचानक्षत्र - सेना जसि सिंधु ज्याचीज्याची चमू मौक्तिक सिंधु ज्याची ॥३९॥
बोले सखी वृंद उभा असाचीसाची प्रिया हे पति मानसाचीम्हणोनि शोभे बहु सत्यभामाभामापती प्रीतिच सत्यभामा ॥४०॥
अळंकारितां येरिती जो हरी तोअनेकांपरी शोक तीचा हरी तोप्रसंगांत त्या वृंद आले सुरांचेतिही वर्णिले त्रास भौमासुराचे ॥४१॥
आयके बळ हरी नरकाचेंबीज जो परी हरी नरकाचेंभीत देखुनि सुरां शरणांतेंनेमिलें असुर नाश - रणातें ॥४२॥
तों दाखवी म्लानमुखां बुजातेंश्रीसत्यभामा न सुखांबु ज्यातेंम्हणूनियां युद्धविलास तीतेंदावी सवें नेउनियां सतीतें ॥४३॥
या दुःखितांची न हरुनि आधीस्त्रीकाम कर्यव्य अयुक्त आधींदेवार्थ जाऊं तरि हे वजागीमूर्छेसि जातां करि कोण जागी ॥४४॥
दोहीं परी संकट हें हरी तोसंगें तिला नेउनि जो हरीतोम्हणे खळा मारिन याच वाटेआणूं तरु कीं सुख ईस वाटे ॥४५॥
होती अधिष्ठूनि जसीच मांडीतसी सवें नेउनि युद्ध मांडीवधूनि भौमासुर पारिजाताआणी नमों तत्पदवारिजाता ॥४६॥
प्रकाशतो देउनि सत्य भामातों तोचि तेथें अजि सत्यभामावाच्यांश तो तो हरि वामनाचाआत्मा ठसा हा बरवा मनाचा ॥४७॥
भातें प्रभा केवळ चित्स्वरुपेंमा शक्ति शुक्तीवरि जेविं रुपेंभामाविलास प्रभु नाम याचेंठेवी असें कृष्ण अनामयाचें ॥४८॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.