मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
भरत भाव

साहित्य

भरत भाव

bharata bhava

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

भरताचे चरित्र. आई टाकून रामाच्या पायाकडे निघालेला भरत, दशरथाचे निधन, आणि वसिष्ठांनी अयोध्येत आणलेला भरत ज्याला आईने काय केले हेच कळत नाही. ‘भरत भाव’ — म्हणजे भरताची वृत्ती, हाच या काव्याचा विषय.

करुनि वंदन जानकिनायका भरत भाव निरोपिन आयकाजननि टाकुनि रामपदीं निघे सुकृत तो मति हे समजोनि घे ॥१॥
भरत जबळि नाहीं मातुल - ग्राम - वासीभरत - जननि धाडी कानना राघवासीदशरथ मृत झाला राम जातो वियोगेंतृण बहुत दिसांचें अग्निच्या जेविं योगें ॥२॥
मग भरत वसिष्टें आणिला जो अयोध्येनगरि गतधवा ते आणि निर्वीर्य योद्धेजन मृतसम देखे हेतु कांहीं कळेनाजननि - कृत - कुचेष्टा - बुद्धितें आकळेना ॥३॥
वृत्तांत सांगे भरतासि माय स्वानंद जीचा त्रिजगीं नमायभेदूनि वक्षस्थळ शब्द तीचा करी महा क्षोभ महामतीचा ॥४॥
जाळील तीतें निज - दृष्टि - पातें पाहे असा हालविताच पातेम्हणे अहो पापिणि पापरुपे जळो तुझें तोंड जडस्वरुपें ॥५॥
जाळीन हें तोंडचि जाण आधीं मुखें जया देसि अनंत आधीन माय तूं वैरिण होसि साची माझे मनीं भाव खरा असाची ॥६॥
केला तुवां देखत भर्तृ - घात क्षणें तिवाठा रचिल्या तिघांतशत्रुघ्न मी लक्ष्मण राम जोडे राजा तिजा तीस अनर्थ जोडे ॥७॥
गिखिना प्रति राम रमापती दवडिल्यावरि मृत्यु - मुखीं पतीनिजविला मज हे विधवा धरा म्हणसि भोग अयोग्य वसुंधरा ॥८॥
वना धाडिलें जेधवां रामराया तुवां हेतु केला स्वभर्ता सरायाअहा राम सीता अशा दंपतीतें वना धाडिलें मारिलें कां पतीतें ॥९॥
नकळत पतिताचें खादलें अन्न ओकींतर पतित नव्हे तो पापरुपे अहो कीम्हणुनि उदरिं तूझ्या देह हा जन्मला गेत्यजिन तरि मला हें पाप तूझें नलागे ॥१०॥
हे अग्नि - तापित घृतांत तनू तळेनाप्रत्यक्ष तो कधिंहि पावक आतळेनारामापराधिनि सुतास शिवेल कां जीघे ब्राम्हणोत्तम न अंत्यज पात्र - कोजी ॥११॥
राजर्षि योगें निज - धर्मपूतें जीं कां स्वधर्मे बधिती रिपूतेंशरघें न तीं आतळतील मातें त्वद्रुर्भ - संभूत - नराध मातें ॥१२॥
मारील सद्य मज खायिन त्या विखातेंकीं पापियास निज पातक जेविं खातेंतूं पापिणी त्वरित जासिल सैरवासीहोसी सदा निरथ - दारुण - लोक - वासी ॥१३॥
घना० अहो कैकई हें काय केले तुवां हाय हायन म्हणवे तुज माय जन्मोजन्मीं वैरिणी ॥१४॥
सर्वजगदभिराम वना धाडिला तो रामकेले विख्यात कुनाम कीं हे पति - मारिणी ॥१५॥
तुझ्या वधें न अधर्म तुज मारावें हा धर्मपरि निदील हें कर्म राम पापकारिणी ॥१६॥
नाहींतरी प्राण आज्य तुझें घालूनियां प्राज्यजाळूनियां सामराज्य दाखवितों करणी ॥१७॥
धिक्कारुनी गोष्टि मातेसि सांगे कौसल्येच्या ये गृहा सानु रागेंत्यातें देखे जेधवां राम - माय श्रीरामाचा शोक लोकीं नमाय ॥१८॥
मोकळा करुनि कंट तेधवां आठवूनि मनिं जानकी धवाते रडे भरतही तसा रडे जोंवरी नयन होति कोरडे ॥१९॥
म्हणे वांसरा घात झाला असा रे तुझ्या माउलीचेच हे खेळ सारेवृथा धाडिला राम माझा वनासी न देखों शके त्या जगज्जीवनासी ॥२०॥
अरे राघवें व्यापिले लोक सारे तरी नावरे शोक माझा कसा रेतृषाक्रांत डोळे घनश्याम - रामा पहायास रे सर्व - लोकाभिरामा ॥२१॥
जानकी जनकराज - कुमारी पाय कोमळ जिचे सुकुमारीचालली जसि वना अनवाणी बोलली कटकटा जनवाणी ॥२२॥
सुनु सूनहि वनाप्रति जाती आणि जे जित असेल कुजा तीमानवी तनु पशूंत गणावी ते शिळा परि सजीव म्हणावी ॥२३॥
भरत शोक अनेक तिचे असे परिसतां मग बोलत तो असेजननि गोष्टि समस्तहि हे खरी परिस येविषयीं मम वैखरी ॥२४॥
मी ब्रम्ह हत्या - शतपाप लाहें ठावें असे लेश जयीं मला हेंखङ्गें वसिष्ठासि अरुंधतीतें वधीं जई ठाउक हे मतीतें ॥२५॥
म्हणे राममाता अरे वासरा मी तुझा जाणतें प्रेम उल्हास रामींतुला राम - सेवेविणें काम नाहीं न राज्यादिकांची जया काम नाहींतो वसिष्ठ वदला भरतातें राम - पाद - निजलाभ - रतातेंपाळिं यावरि समस्त धरा हे राजनीति करिं सावध राहें ॥२६॥
रायें तुतेंचि दिधलें स्व - नृपासना रेसंपूर्ण तूं जननिची करिं वासना रेशब्दार्थ हे नकळती गुरु - लाधवाचेसाचे म्हणूनि पद आठवि राघवाचे ॥२७॥
घना० म्हणे भरत हा राम त्राहें त्राहें मेघश्यामवसिष्ट हा गुरुनाम तोही मज कोपला ॥२७॥
अंतरले तुझे पाय तया राज्याचे उपायसांगे मज हाय हाय नव्हे गुरु आपला ॥२९॥
अग्नितुल्य वाटे राज्य मज जाळिल सामराज्यवरी ऋषी घाली आज्य त्याणें जीव तापला ॥३०॥
दावीं सत्वर चरण किंवा स्वामी दे मरणतुझ्या नामाचें स्मरण त्याचा भाव संपला ॥३१॥
स्मरोनि ऐसें रघुनंदनातें त्या राघवाच्या पदवंदनातेंजावें असा भाव धरुनि साच बोले वसिष्ठा प्रतिही तसाच ॥३२॥
राजाधिराज रघुराजचि एक जाणापाहों चला सकळ जाउनि त्या सुजाणाआम्हीं समस्त जन किंकर राघवाचेजें रामनाम जपतों अजि नित्य वाचे ॥३३॥
विना राक्षसी कैकयी काननातें चला सर्व पाहूं मृगांकाननातेंप्रयत्नेंचि घेऊनि येऊं गृहातें नयेतां समर्पू शरीरें स्वहातें ॥३४॥
येणार ते या अथवा न काही राहेन मी हे नघडेचि कांहींबोलोनियां स्पष्टचि चालिला हो शोकांतही घे प्रभु - नाम - लाहो ॥३५॥
हा राम हा राम असेंचि वाचे चित्तांत पाय प्रभु - राघवाचेत्यजी कुलाचार्यहि राम - वाटे कीं तो गुरु त्यास गुरु नवाटे ॥३६॥
येणार ते या अथवा नकाहीं शब्दांत या अर्थ सखोल कांहींकीं जो गुरु अंतर राम - पायीं पाडी त्यजावा गुरु तो उपायी ॥३७॥
श्रीरामही टाकुनि राज्य मातें जो घे म्हणे त्या ऋषिसत्तमातेंगुरुत्व कैचें तरि मी उपेक्षा करीन त्याची न मला अपेक्षा ॥३८॥
या कारणें या अथवा न कांहीं राहेन मी हें नघडेचि कांहींऐसी उपेक्षा वदनीं वदे तो श्लोकांत या व्यासचि भाव देतो ॥३९॥
नाहींतरी या अथवा नकाहीं गुरुस बोलेल घडेल कांहींरामानिमित्तें गुरुही त्यजावा वाक्यांत भावार्थ असा भजावारामानिमित्तें जननीस टांकी पाणी नपी राज्य नदी - तटाकींलंघूनियांही - गुरु - संगतीतें पावे अहो दे गुरु ज्या गतीतें ॥४१॥
गुरुविणें न घडे परमा गती गति शुकादि गुरुसचि मागतिपरि गुरु करि अंतर राघवीं न गुरु तो ठक दांभिक लाघवी ॥४२॥
तो बाप जो राघव - भक्ति दावी तसीच जी मायहि ते वदावीजो राम दावी गुरु तोचि साच श्रुत्यर्थ - इत्यर्थ असे असाच ॥४३॥
वसिष्ठ घे राज्य म्हणे नसाच परंतु भावार्थ नव्हे तसाचत्याच्या परिक्षार्थचि बोलिला हो त्याहूनि आधीं मुनि चालिला हो ॥४४॥
आज्ञा गुरुची अवघे करीती सच्छिष्य ते लोक अलोकरीतीपरंतु त्याच्या वचनें तयातें नटाकिती सत्पद - दातयातें ॥४५॥
राम तोचि गुरु भेद असेना भिन्न भाव तरि राम दिसेनाराम टांकि म्हणणेचि गुरुचा त्याग आत्म - सुख - कल्पतरुचा ॥४६॥
तूं टाकि माझ्या वचनेंचि मातें शब्दें अशा जो गुरुसत्तमातेंटाकील शिष्याधम तो गणावा टाकी न जो उत्तम जो म्हणावा ॥४७॥
राम नत्यजि तंईच गुरुतें न त्यजी स्व -सुखकल्पतरुतेंजो असें वचनही नमनीं तो श्रीगुरु न मनिंही नमनीं तो ॥४८॥
लंघूनि शब्दहि असा गुरु तो उपेक्षीशिष्यासि त्या मग कसा गुरु तो अपेक्षीजो रामनिष्ठ गुरु निष्ठचि निर्विकारेंसोडी वसिष्ठ भरतासि तयाप्रकारेंम्हणे परिक्षार्थचि टाकि मातें तसा म्हणे टाकि रघूत्त मातेंउल्लंघितां शब्दचि इष्ट वाटे म्हणोनि लागे ऋषिवर्य वाटे ॥५०॥
प्रकरणीं पुढिल्या गुरुराज तो भरत संगतिनेंच विराजतोजरि पथीं गुरु होय समागमीं तरिच राम मिळे निगमागमीं ॥५१॥
वसिष्ठ तो आणि समस्त माया रामार्थ टाकूनि समग्र मायासेना प्रजा सर्वहि त्याचवेळे जाती जसे लंघिति सिंधु - वेळे ॥५२॥
पायीं निघे भरत सानुज रामवाटेरामाविणें इतर इष्ट न काम वाटेमाथां जठा मुकुट वल्कल नेसला होश्रीरामवेष वदनीं प्रभु - नाम - लाहो ॥५३॥
राम - वल्कल - जटादिक रीती वेष तो उभय बंधु करीतीराम सानुज तसें भरतातें देखती सकळ रामरतातें ॥५४॥
तों भेटला गुहकनाम किरात पाटेश्रीराम भक्त परमाप्त तयास वाटेगंगातटीं रघुपती शयनास दावीते भक्ति काय म्हणुनी मुखिं हो वदावी ॥५५॥
दर्भ निर्मित तया शयनातें देखतां उदक ये नयनातेंभूतळीं भरत घालुनि घे हो त्या स्थळींहुनि न चित्त निघे हो ॥५६॥
राम - वृत्त रघु - वश - वरातें सर्व वर्णुनि गुहारव्य - किरातेंलंघुनी सुरनदी भरतातें ते ससैन्य रघुराज - रतातें ॥५७॥
ब्रम्हा रमा वंदिति नित्य ज्यातें त्या राघवाच्या चरणांबुजातेंपाहूं बरें हे भरता असोसी वियोग तो प्राणवियोग सोसी ॥५८॥
कैकेयीच्या दुष्ट भावें जळाला इच्छी रामाच्या पदाच्या जळालातों स्वामीच्या देखिलें आश्रमातें कांहीं चित्तें टाकिलें हो श्रमातें ॥५९॥
पाद - चिन्हित - तये वसुधेतें देखतां तृषित जेविं सुधेतेंरामचंद्र - पद - सारस - मुद्रा याढवी भरत - सौख्य - समुद्रा ॥६०॥
घालूनि घे भरत देखुनि त्या रजातेंशत्रुघ्नही अनुसरोनि निजायजातेंचित्त स्मरे प्रभुचिया पद - नीरजातेंप्रेम - प्रवाह नयनीं सुखनीर जातें ॥६१॥
तनुवरी गुटियाच उभारती कवि मुखें किति वर्णिल भारतीभरत येरितिने अजि लोळला प्रभु - पदाब्ज - रजीं बहु घोळला ॥६२॥
हा राम राम रघुनंदन हेंचि वाचेचित्तांत ते चरण दीसति राघवाचेते रेणु हे मुकुट मंडण जे शिवाचेऐसें म्हणे त्यजुनि भाव अहो जिवाचे ॥६३॥
भरत पदरजीं त्या घोळला दीर्घकाळत्रिभुवनिंहि सुखाचा होय तेव्हां सुकाळनमिळति पदरेणू जे विरंच्यादिकांहींसुलभ मज म्हणे हें भाग्य माझेंचि कांहीं ॥६४॥
देखोनि राघव - पदाब्ज - रजास वाटेलोटांगणीं गडबडी सुख फार वाटेआनंद - नीरत्दृदयीं नयनां बुजाचेंचित्तांत राम - पद घे रज अंबुज्याचें ॥६५॥
बाम - अंकगत भूमि - कुमारी बाम बाहु सुरता सुकुमारीवल्कलांवर जटा अभिरामा देखतो भरत त्या रघुरामा ॥६६॥
दूर्वा - दल - श्यामल दीप्ति देहीं सेवी पदें लक्ष्मण तो विदेहीगंगातटीं सेवित मंदवातें देखे अशा श्रीरघुपुंगवातें ॥६७॥
देखोनि ऐसें रघुनंदनातें धावे त्वरेनें पदवंदनातेंअलभ्य जो हर्ष सुरादिकांहीं तो होय त्यामाजिच शोक कांहीं ॥६८॥
रडे फुंदफुंदे शिरी पादपद्मा धरी सद्म मानीतसे नित्य पद्माबळें क्षेम दे त्यास वोढूनि राम स्व - भक्त - प्रिय स्वामि विश्वाभिराममांडिये उपरि बैसविला हो अश्रुनीर पुसि दे सुख लाहोवासरा न रड सांग सुवार्ता शब्द हा निववि दुःख दवार्ता ॥७०॥
तों देखिला गुरु वसिष्ठ तयास वंदीब्रम्हण्यदेव जडला चरणार विंदींतों माउल्या तिघिहि सत्वर पावल्या होभेटोनियां तिघिही सत्वर सेविल्या हो ॥७१॥
पिता सुखी कीं म्हणतांचि रामा रडोनि त्या सांगति सूपरामारडे अहो रामहि लोकरीती स्त्रिया पुन्हा शोक महा करीतीसपिंडीक्रिया राम गंगे - तटाकीं करी आणि तो पिंड गंगेंत टाकीरडे लोक दृष्टीस शोक श्रमातें प्रभू दाउनी ये पुन्हा आश्रमातें ॥७३॥
तों वदे भरत गोष्टि मनाची प्रार्थना बहुत आगमनाचीमांडिली परि न राघव मानी देखतां सुखरांस विमानीं ॥७४॥
झणि फिरे स्वपुरी प्रति राम हा म्हणुनि आधि मनीं अमरा महाभरतशब्द तदर्थ नये मना पुरवणें प्रभुला सुरकामना ॥७५॥
आज्ञा पित्याची मज मोडवेना वत्सा तुझी गोष्टिहि तोडवेनाघालूं नको बा मज संकटांत नको पडों या सहसा हटांत ॥७६॥
असी आयके जे धवां रामवाणी मुखश्री करी बंधु तो दीनवाणीम्हणे तात आज्ञा मृगांकानना रे मला सांग जाईन मी कानना रे ॥७७॥
बापा ऐसें वर्ततां तो विशेषें आज्ञा - भंग प्राप्त दोघां अशेषेंएवं राज्यातें तुवां रे भजावें ताताज्ञेनें कानना म्याच जावें ॥७८॥
असी आयके जे धवां रामवाचा करी कर्म जें बंध तोडी भवाचापुढें पांचवा भाव त्यामाजि वाचा स्मरा आयका बंप तोडा भवाचायेना असें भरत देखुनि रामरायागंगातटीं रचुनि दर्भ बसे मरायापाहे वसिष्ठ - मुनि - वकत्र - सरोरु हातेंश्रीराम आणि खुण दाखवि हो स्वहातें ॥८०॥
कीं सांग गुत्द्य अवतार - चरित्र यालाजें तारितें चहुयुगांत जगतत्रयालाबोले वसिष्ट मग सन्निध जाउनीयांकां प्राण टाकिसि म्हणे समजावुनीयां ॥८१॥
हा राम मारील दशाननासी यालागिं जातो प्रभु काननासीनको निवारुं भरता तयाला ब्रम्हादिकांच्या पद - दातयाला ॥८२॥
येणार मागुति चतुर्दश - वत्सरांतींराहो वनांत तितुके दिन आणि रातीआत्माच तो तुज वियोग तयासि नाहींयेऊनियां करिल जे तय कामना ही ॥८३॥
हें आयकोनि जरि शोकहि दूर केलाप्रत्यक्ष दर्शन सुखास बहू भुकेलातेव्हां उठोनि भरतें पद वंदनातेंकेलें दुरुनि म्हणतो रघु नंदनातें ॥८४॥
देखोनियां गमन - निग्रह राघवाचाबोले उभा भरत निश्वय रुप वाचावर्षे चतुर्दश वरीच धरीन देहात्यानंतरें त्यजिन यास निरोप दे हा ॥८५॥
वर्षे द्विसप्त भरि काल समाप्त झालात्यानंतरें अजि तुझ्या चरणांबुज्यालास्पर्शे शिरें न जरि देह तयाच वारींयातें त्यजीनचि विरिंचि जरी निवारी ॥८६॥
वर्षे चतुर्दशहि रक्षिन शासनानेंअंगीं करीन नवसेन नृपासनातेंसिंहासनावरि तुझ्या पद पादुका मीपूजीन जों तव - पदांबुज - लाभ - कामीं ॥८७॥
पादुका जडित आणुनि हातें रामचंद्र चरणांबुरुहातेंलावुनी निजशिरीं भरतानें वंदिल्या रघुवरांघ्रि - रतानें ॥८८॥
भरत - जननि जागी होय राम प्रतापेंविकळ रघुपतीच्या द्रोह पापानुतापेंरडत म्हणतसे मी पापिणी रामरायान धरिन तनु आज्ञा येस्थळीं दे मराया ॥८९॥
रघुपति तिस बोले टाकि हा शोक मातेइतुकिहि मम माया जीत ही सृष्टि मातेसकळहि सुरकार्या म्याचि हा हेतु केलाअमर दशमुखाच्या मृत्युतें हो भुकेला ॥९०॥
झणी हो कैकेई बुडविशि तुं शोकांत त्दृदयातुझी माझे ठायीं सुमति भरताहुनि सुदयातुतें मी कौसल्येहुनि अधिक माते समजतोंतुयां ऐसें केलें म्हणउनि नवाटेच मज तों ॥९१॥
म्हणे मंथरा राम राज्यार्थ सिद्धी करी ती तुझा हो पती हे प्रसिद्धीतुवां इष्ट मानूनि त्या भारतीतें दिला टाकुनी कंठिंचा हार तीतें ॥९२॥
शरीरीं तुझ्या यापरी देवराया निघोनी करी येरितीतें भ्रमायातुझा यांत अन्याय कांहींच नाहीं करी मोह माया विरिंच्यादिकांहीं ॥९३॥
करुनि मागुति बुद्धि सकोमला क्षणभरी विसरुंचि नको मलातरि असा न पडे भ्रम मागुती जितचि पावशि हो परमा गती ॥९४॥
भरत भाव असा बरवा मनें सुरस सेवुनि सादर वामनेंअजि समर्पियला पदवंदनीं रचुनि पद्यपदें रघुनंदनीं ॥९५॥
हरिगुणीं ग्रथिल्या यमकां पहा धरिल थोरभयें यम कांव हाहरिगुणाविण हो यमकां करी करि न दंड धरी यम कांकरी ॥९६॥
राम तुष्ट असिया यमकां हो आणिखी नियम संयम कां होवामनें हरिगुणीं रसनेला अर्पितां अनुभवीं रस नेला ॥९७॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

मातें
— मला
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तुवां
— तू (करणरूप)
ऐसें
— असे
माया
— भासमान करणारी शक्ती
देखे
— पाहतो
तुज
— तुला
तया
— त्याला, त्या
सकळ
— सर्व
देखोनि
— पाहून
वरी
— वर; शिवाय
घडे
— घडते, शक्य होते
म्हणोनि
— म्हणून
एवं
— अशा प्रकारे
ठायीं
— ठिकाणी

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.