चरम - गुरु मुकुंद श्रीपती श्रीहरी तोचरमपण - जडत्वें भ्रांति जेव्हां हरीतोचरम - परम - बोधें जेविं आत्मत्व दावीचरमतनुमुखें ते रीति वाटे वदायी ॥१॥
जडीं ब्रम्हाऽद्वैतप्रद गुरु म्हणावा चरम तोअपूर्णाचा शिष्य स्थिर - चर - जडत्वींच रमतोजडें नाना पाहे श्रुति म्हणति तों तों मरतसेनजातां पूर्णातें शरण मरती पामरतसे ॥२॥
नानात्व अज्ञ अवघेचि सदा पहातीत्यांला असेचि यम दंड धरुनि हातींहे गोष्टि तों प्रगट जाणति लोक सारेठावेंचि तें कथिल वेदहि तो कसा रे ॥३॥
म्हणोनी हा अर्थ श्रुति कथिल हे गोष्टि नघडेवदे आत्मज्ञानी विषय म्हणतां तत्व नुघडेकळे आत्मा तोचि स्थिरचरजगीं तों नगवसेजडें पाहे नाना तरि मरण - वत्क्रांतचि बसे ॥४॥
जयातें आद्यंतीं इतरपण त्यासीं नगवसेसुवर्णा स्वर्णत्वें स्फुरतचि मधीं हेम गवसेजगाचे आद्यंतीं जग नग तयावीण नकळेगुरु तो जो दावी उकलुनि असा पावळ - कळे ॥५॥
न होतें हें काहीं गुणमय तई ब्रम्हचि असेंतथापासूनी हें जग म्हणति वेदागम असेसुवर्णापासूनी उपजत तदैक्यें नग वसेपहातां यारीती अवसरचि भेदा न गवसे ॥६॥
सुवर्णापासूनी उपजति अलंकार जितुकेसुवर्णत्वें लोकीं मिरवनि न संदेह तितुकेजग ब्रम्होत्पन्न श्रुति म्हणतिं कीं भेद नघडेसुवर्णा मातीचे श्रुति वदति कीं दृष्टांत उघडेउपादानीं ब्रम्हीं श्रुति म्हणति कीं भेद नघडेसुवर्णा मातीचे श्रुति वदति कीं भेद उघडेउपादानें कार्ये दिसति म्हणतां विश्वरचनापहावी ब्रम्हत्वें तरि सकळता वेदवचना ॥८॥
सुवर्णावांचूनी दिसति न अलंकार जितुकेस बात्द्यत्वें स्वर्ण स्फुरति नग सोनेंचि तितुकेंश्रुति - प्रोक्त - न्यायें श्रुतिच अवघें ब्रम्ह म्हणतीअसें दावी त्याची करिती गुरुवर्यात गणती ॥९॥
उपादान मातीच जैसी घटातें उपादान तंतूच जैसा पटातेंविनाब्रम्ह येना जग प्रत्ययातें उपादान तें नेंमिलें सत्य यतिं ॥१०॥
नगाच्या सबात्द्यांतरीं भाव दावी नगीं ते उपादान - सत्ता वदावीसबात्द्यांतरी हेम जैसे नगानें सबात्द्यांतरीं ब्रम्ह तैसें जगातें ॥११॥
स्फुरे ज्याणें आणी स्फुरणचि जयावीण नघडेअसे अंतर्बात्द्य प्रगट दिसतो तत्व उघडेंजडीं आत्मा ऐसा परि विरळ ऐसें अनुभवीजड द्रष्टा मात्र स्फुट वदति भेदज्ञहि भवी ॥१२॥
दसोडी जे देखे तिस न वळखे वाळक पटींकळोनीहि स्वात्मा अकळ नकळे विश्वकपटीदसोडी पासोडी रचुन उरली प्रौढ सम जेजडी आत्मा ऐसा परि विरळ सर्वज्ञ समजे ॥१३॥
जडें - तत्वें देहीं गुरु निरसतां तें उरतसेजडीं त्या चैतन्वाविण जग न कांहीं स्फुरतसेनपावे या बोघेंकरुनिहि तिचे पावनकळेजडाऽळंकारीं जों निजकनक तें व्याप्त नकळे ॥१४॥
शरीरीं या एक जड निरसतां जें उरतसेस्व - चित्त - सिंधू तोचि स्थिरचरतरंगीं स्फुरतसेचिदब्धीमध्यें त्या स्व - तनुसह भूतें गबसतीगुरु जो तो शिष्या करि अनुभवें विश्ववसती ॥१५॥
चिदात्मत्वें दाबी गुरुवर जडें सर्व शरणागुरुत्वाची सीमा हरि करितसे त्याच चरणापहासी तूं पार्था स्थिरचर चिदब्धींच लहरीअसें ज्ञान ज्ञानी वदतिल म्हणे आपण हरी ॥१६॥
उदंड क्ष्मालोकीं जड अजड तत्वें निवडितीशरीरात्म - भ्रांती श्रुति अनुभवेंही दवडितीपरंतु स्वात्मत्वीं सकळ जग दावी स्वशरणागुरुत्वाची सीमा हरि करितसे त्याच चरणा ॥१७॥
दिसे एक सर्वत्र आत्माच सारादिसे त्यांत तेव्हां जडाचा पसारामृषा हीं जडें चित्समुद्रीं तरंगींदिसों लागती तेधवां अंतरंगीं ॥१८॥
भावें अशा हरि म्हणे जड भाग सारातूं आत्मयांत अवलोकिसि हा पसाराकीं आत्मभाव कळतां तुज अंतरंगींचित्सिंधु देखसिल तोचि जडातरंगी ॥१९॥
आत्मयांत म्हणती जरि भूतेंतीं खरीं गमति काय विभूतेंचित्समुद्र - लहरीच कळायासूचवी स्ववचनांत कळा या ॥२०॥
गणावीं जरी हीं खरीं सर्व भूतेंतरी भिन्नता व्यापका ये विभूतेंअसत्या जगीं ब्रम्ह जो भिन्न मानीखरा मूढ तो ब्रम्हशब्दाभिमानी ॥२१॥
सत्याश्रयाविण विवर्त नसे असत्यजें आंत बात्द्य उघडें निज एक सत्यसत्या मृषासि जरि भेद वदे असाधूमिथ्या नगासि कनकासिहि भेद साधू ॥२२॥
अधिष्ठान बात्द्यांतरीं जें असावेंविवर्ते तयाच्या प्रकाशा दिसावेंगुरुतें जडीं ब्रम्ह ऐसें पुसावेंन दाऊं शके त्या गुरुसी रुसावें ॥२३॥
ब्रम्ह सर्व - खलु निश्वित्त साच स्पष्ट हा श्रुतिमुखार्थ असाचवामनें गुरुमुखें कळला हो सर्वदा अनुभवें फळ लाहो ॥२४॥
जरी सर्व ब्रम्ह श्रुतिविहित हें केवि घडतेंजडत्वीं चैतन्य स्थिरचर विकारीं बिघडतेंअसे सर्वामध्यें म्हणुनि म्हणती सर्वहि असेश्रुतीचे स्पष्टार्थ त्यजुनि कथिती कल्पक असें ॥२५॥
सरा ब्रम्ह असे न सर्वहि असे ऐसें घडे जेधवांसर्वा व्योम असे न सर्वहि असे ऐसें घडे तेधवांएवं व्योमचि सर्व तो नर म्हणे जो भ्रांतिफांसां पडेप्रामाण्य श्रुति मस्तकास वदतां ऐसें कसें सांपडे ॥२६॥
उत्पत्ति हेमींच जशी नगातेंप्रवेशही येचरिती जगातेंब्रम्हींच दोन्हीं घडतां प्रकारब्रम्ह स्वयें सर्वहि निर्विकार ॥२७॥
ब्रम्हीं प्रपंच - लय - उद्भव वेद वर्णीदृष्टांत सूचवुनि येरिति मृत्सुवर्णीहोऊनि शांत करितीच उपासनाहीऐसें वदे श्रुति विकल्प ययास नाहीं ॥२८॥
सर्वी ब्रम्ह असो समस्त न असो तें ब्रम्ह कैसे वदाकीं साचें अथवा असत्य म्हणतां सर्वीच या सर्वदात्याचे सर्व म्हणेल त्यास सहसा अद्वैत तें अंतरेतें मिथ्या म्हणतांच साधत असे सर्वैक्य - सिद्धांत रे ॥२९॥
खरें नीर नाना असत्यां तरंगींअसत्या नगीं हेम बात्द्यांतरंगींविना व्यापक व्याप्य आकार सारेन कांहीं नव्हे सर्व आत्मा कसा रे ॥३०॥
मुखें व्याप्य मिथ्या म्हणे बोध मानीअसत्यांत त्या व्यापक ब्रम्ह मानीनिषेधी पुन्हा ब्रम्ह सर्वत्र वाणीनसे मूर्खतेची तयामाजि वाणी ॥३१॥
सर्व ब्रम्हपणा न मान्य करिती अद्वैत तें बोलतीब्रम्ह व्यापक सत्य कारण असें वर्णूनेही डोलतीविश्वव्याप्य असत्य कार्य म्हणती इत्यादिकें भूषणेंसर्व ब्रम्ह न मानितां सकळ तीं होती तयां दूषणें ॥३२॥
सत्या व्यापक कारणास अनृता व्याप्यास कार्यास जीबोला एकचि युक्ति योजुनि अशी कीं द्वैत दोघां सजीनीर क्षीर खरींच दोनिहि जग दयोमोपमा ही खरीसर्व ब्रम्ह न मानितां जग मृषा बोले वृथा वैखरी ॥३३॥
आतां रज्जु विवर्त सर्प लटिक्या व्योमेंचि तो व्यापिलाआम्ही कोरुनि युक्ति काढुनि जरी तो पक्षही स्थापिलाकार्य व्याप्य नव्हे न कारण तथा व्यापूनि कार्या जसेंसर्व ब्रम्हपणास सर्व गवसे दृष्टांत वेदीं असे ॥३४॥
रज्जु व्यापक सत्य कारण असे व्याथ्या भुजंगा कृतीत्यातें कार्य मृषाचि कीं जड असें ज्ञानी पहाती कृतींसोनें व्यापक सत्य कारण असे व्याप्या नगांभीतरीतें मिथ्या नगकार्य चिज्जड असें कांहो न नाना तरी ॥३५॥
पाणी व्यापक सत्य कारण असे व्याप्या तरंगाकृतीमिथ्या आणिक कार्य चिज्जड असें ऐक्यें पहाती कृतीहे दृष्टांत न अस्मदादि रचना शास्त्रें श्रुती बोलतीश्रीव्यासादि सुनींद्र याच उपमा देतां सुखें डोलती ॥३६॥
श्रुती सर्व ब्रम्ह स्फुट वदति तें जे रिति पडेप्रतीतीतें येना तिळ नयन तेथोनि बिघडेप्रतीतीतें येना म्हणुनि बिघडेना म्हणतसागुरु नाहीं केला तुम्हिं अनुभवी ब्राम्हण तसा ॥३७॥
न वेदा पुराणांत दृष्टांस - वाणीअसी ते जगीं शंकराचार्यवाणीवदे कारणत्वेंचि दृष्टांत नानानुरे ज्या पुढें शाब्दिकांचा तनाना ॥३८॥
प्रपंचाचें उपादान विना ब्रम्ह असेचिनाकार्य ब्रम्हचि कीं तेव्हां दुजें कांही न बोलवे ॥३९॥
तरंगाच्या आकृतीनें पाणीच स्फुरते जसेंपात्ररुपें स्फुरे तांबें ब्रम्हांडी आत्मता असी ॥४०॥
घटनामें जशी पृथ्वी पटनामेंचि तंतुहीजगनामें तसा आत्मा असे आत्मा नसे जग ॥४१॥
बळें हातीं माती कलश धरितां सांपडतसेपहातां केयूर स्फुट कनक दृष्टी पडतसेप्रतीती येरीती विविध घडतां ब्रम्ह गंवसेशिश्रू नेणो तंतू परि पटपणीं तंतुचि वसे ॥४२॥
हेमापासुनि होति जे नग तयां प्रत्यक्ष हे हेमताब्रम्हापासुनि विश्व या अनुभवें याला असी ब्रम्हताऐशा स्वानुभवें निजाःद्वय सुखें सर्वज्ञ ते डोलतीश्रीमच्छंकरभाष्यकाराहि असे शास्त्रीं तयां बोलती ॥४३॥
जगनगा म्हणती जरि नश्वरश्रुति म्हणे कन कोपम ईश्वरतसि न शंकित शंकर - वैखरीकनकशाश्वतता वदते खरी ॥४४॥
आकार जाय परि शाश्वत हेन राहेप्रत्यक्ष गोष्टि नकळे कसि पामरा हेतैंसीच आकृति घडे बिघडे न कांहींहेमत्व हें निवडिलेंच श्रुकादिकांहीं ॥४५॥
हिरण्य म्हणतां स्वयें सुकृत श्रुद्ध वाचा हरीमनामधिल संशय प्रभुच उद्धवाचा हरीदिसे कृत तरी असे अकृत शाश्वतीं हेमताअगा सुकृत येरिती असि असे जगीं ब्रम्हता ॥४६॥
झालेंचि नश्वर तरी जडता असत्यजो जो असत्या नगआश्रय त्यास सत्यचित्स्वर्ण जो जड - नगीं गुरु सत्य दावीत्यालाचि पूर्ण गुरुची पदवी वदावी ॥४७॥
घडे मोडे माया घडत घड मोडी न कनकींनमोडे हेमत्व क्वचिदपि खरें हें वचन कींदहीं होतां जैसें त्वरित अति दुग्धत्व बिघडेघडे ना मोडेना कनक नग मोडे मग घडे ॥४८॥
नगा एकाचे ते दिसति तुटतां चारि तुकडेन भेद स्वर्णत्वीं समचि मिरवें जें चहुंकडेन ते चारी स्वर्णे नग न म्हणवे चारि शकलेंघडेना मोडेना कनकपण इत्यादि उकलें ॥४९॥
व्याप्य आणि जग कार्य असत्यब्रम्ह सर्वगत कारण सत्यब्रम्ह सर्व म्हणतांचि घडावेंअन्यथा सकळ हें उघडावें ॥५०॥
दिवांधाच्या दृष्टीं दिसति रवि - रश्मी न उघडेन सर्व ब्रम्ह त्वीं तसि उघडही दृष्टि उघडेअपूर्णे पूर्णत्व्वें म्हणति सकळ ब्रम्ह न घडेविना सर्वात्मत्व - स्फुरण परिपूर्णत्व बिघडे ॥५१॥
स्वयें ब्रम्ह हें सर्व दृष्टांत नानावृथा तों अविद्यावृतांच्या तनानादिसे सर्वही ज्यास आत्माच सारान बोलेल गोष्टी अशा तो असारा ॥५२॥
चिदंशास देहामधें भिन्न पाहेअपूर्वा गुरुची तयातें कृपा हेगुरु जो न सर्वत्र आत्मत्व दावीगुरुत्वाचि सीमा कसी ते वदावी ॥५३॥
असें प्रसुतें पंडुपुत्रास देवेंक्रमें बोलिलें हें पहावें सदैवेंगुरु तोचि कीं स्वात्मयामाजि साराचिदैक्येंचि दावी जडाचा पसारा ॥५४॥
अशा भावें पार्थाप्रति हरि वदे कीं जड जगापहासी आत्मत्वीं वदसिल असें ज्ञान तुज गाअसत्यें सत्यांत स्फुरति नग अन्यत्व न घडेपुढें गीतेमध्यें प्रगटहि असे शब्द उघडे ॥५५॥
अगा ज्ञेय तें सांगतों सव्यसाचीतया जाणतां मुक्ति ते दिव्य साचीवदोनी असें आदिपद्यांत दावीअनिर्वाच्च सत्ताच ते तों वदावी ॥५६॥
परब्रम्ह आधीं असें देवदेवेंम्हणे तें अनादि स्वसत्तादि भावेंतया विश्व होणें अनादि स्वभावेंअसें बोलिलें ज्ञेय जें वासुदेवें ॥५७॥
म्हणे सर्वतः पाणिपादं म्हणोनीजडोर्मीस चित्सिंधुरुपें गणूनीवदे केवळ ब्रम्ह बारावियांतजगद्रूप हें ज्ञेय तेरावियांत ॥५८॥
जसें पाणि - पादादि हें सर्व कांहींम्हणे ज्ञेय वर्णीतसे व्यापकांहींजरी ऊर्मि हे तोयरुपें वदावीतरी आकृती व्याप्य हा भाव दावी ॥५९॥
मृषा भोगही त्याचपासूनि होतोम्हणोनी असे सर्व आत्मा अहो तोकळे ब्रम्ह कीं सर्व तेव्हां असाचस्फुरे सर्वदा बोध अद्वैत साच ॥६२॥
तेरावा जो श्लोक तेरावियाचाबोले आत्मा सर्व - गोसांवियांचावेदप्रोक्त ज्ञेय तें जो नदावीत्याची येथें काय वार्ता वदावी ॥६३॥
जे जडीं अजड वैभव दावी तेचि एक गुरुमूर्ति वदावीअक्षर क्षरचि एक कळाया वेद शास्त्रहि वदेच कळा या ॥६४॥
जडावेगळा कोण आत्मा नमानी म्हणे द्वैत हें इष्ट भेदाभिमानीअसा बोधही भेद फांसा भवाचा वदे येरिती शंकराचार्य वाचादेहादिक ब्रम्हचि सर्व वाटे तो लागला अद्वय - बोध - वाटेम्हणोनि देहात्म - विवेक - रीती बोलोनिही तुच्छ पुन्हा करीती ॥६६॥
नये सर्वही ब्रम्ह हें प्रत्ययातें नसे तोंवरी ज्ञान हें सत्य यातेकळे सर्वही ब्रम्ह तेव्हां भवाचा तुटे पाश बोले असी वेद वाचापर अबर म्हणावें थोर लहान सारेंसुर - नृप - सुशरीरें सर्व सारें असारेंपर अबर असे जें ब्रम्ह तें ब्रम्ह पाहेमन अनुभवि जेव्हां श्रीगुरुची कृपा हे ॥६८॥
दिसे ऐसें जेव्हां पर - अवर - त्दृद्वंथि सुटतीदिसे ऐसें तेव्हां पर - अबर - संदेह तुटतीदिसे ऐसें जेव्हां पर - अवर - कर्म - क्षय घडेदिसे ऐसें तेव्हां चरमग तिचें द्वार उघडे ॥६९॥
श्रुती ब्रम्हज्ञानें करुनि म्हणती मुक्ति जितुक्याअशा सर्वाद्वैतें स्फुट करिति तात्पर्य तितुक्यादुहावें जेथूनी मथन वरि सर्वानुभव देन हें बोलोनीही परि नर उगें गोधृत वदे ॥७०॥
परि प्रथम - पायरीवरिच ठेवितो जो पदाक्रमें चरमपायरी वरुनि तो चटे त्या पदाचढेल म्हणती तया धरुनि भावना अंतरींस्वरुप कळतो असा वदति मोक्ष वाक्यांतरी ॥७१॥
कसा मोक्ष अद्वैत - बोधाविनाहीं विना बोध अद्वैत सर्वत्र नाहींम्हणोनीच जें ब्रम्ह सर्वत्र मानें न वेदांतवाक्यें दुजीं त्यासमानें ॥७२॥
आत्मा जडांत सकळांत अतर्क्य वाटेश्रुत्यर्थ यावरुनि लाविति अन्यवाटेत्याचें नसे नवल तो कुमताऽभिमानीतैसेंचि हें वदति अद्वय - बोध - मानी ॥७३॥
असे सर्वा तायी म्हणुनि म्हणती सर्वहि असेंजड ब्रम्हद्वैत श्रुतिविहितही मोडिति असेंअशा या शिष्यांला कसि जड चिदद्वैतरचनाकळे साक्षात्काराविण विफळता वेदवचना ॥७४॥
नहो सर्व सर्वी तया व्यापकाच्या न जो प्रत्यय - प्राप्त तो बोध काचाअसी गोष्टीं तो त्यासही मान्य साची वदों तत्प्रतीति स्वयें मानसाची ॥७५॥
प्रतीति जसि आपुले तनुमधें स्वयें सांपडेसचेतन - अचेतनी जरि ठसाच ऐसा पडेजडोर्मि मग ते दिसे निज चिदंबु - सत्ता खरीजडैक्य नघडे असी म्हणु निघेल कां वैखरी ॥७६॥
प्रतीति आहे म्हणऊनि वाणी वदेल शब्दीं नकरुनि वाणीपरंतु मानूनि मृषा जडाला न ब्रम्ह मानी तरि तो उडाला ॥७७॥
कीं ठाव कीं व्यापकता म्हणोनी बोले जई व्याप्य मृषा म्हणोनीतेव्हां अधिष्ठान - विवर्त्त - सिद्धी रज्जूचि कीं सर्प असी प्रसिद्धी ॥७८॥
एवं जई व्यापकता कळावी जडैक्यता निश्चि आकळावीजो हें घडेना म्हणतो स्ववाणी त्याला असे व्यापक बोधवाणी ॥७९॥
असा सर्वस्वाचा निगम न तया स्वानुभव देअसे सर्वा देहीं विदित नसतां कल्पुनि वदेजडोर्मी व्यापी जो चिटुधधि निजात्माचि समजेस्व - सर्व - ब्रम्हत्वीं पुरुष मग कां तो न उमजे ॥८०॥
न ज्या सर्व ठावें न सर्वत्व ठावें न ज्या द्वैत ठावें कसें हो उठावेंजडावेगळा जो स्वदेहींच पाहे अपूर्णा गुरुची तयातें कृपा हे ॥८१॥
गुरु स्वात्मता जो स्वशिष्यास दावी अहो काय ते एकदेशी वदावीस्वदेहांत आत्माच या प्रत्ययातें दिसावेंच सर्वत्र ते सत्य यातें ॥८२॥
एका स्वदेहींच जसा कळावा तैसाचि सर्वत्रहि आकळावातरीच आत्मा कळला म्हणावा तो आत्मवेत्ता गुरु हा गणावा ॥८३॥
जिज्जडाद्वय जसें उडवीती व्यापकत्वहि तसें बुडवीतीते गुरु म्हणुनि केविं म्हणावे वेष मानुनिच सत्य गणावे ॥८४॥
मृषा व्याप्या तेव्हां म्हणति लटिकें व्यापकपणस्व आचार्यत्वा ते मिरविति असे येचि कृपणन या चित्सिंधूता स्थिर चर तरंगांत दिसतीवदावें हें तेणें इतर वदती गोष्टि नुसती ॥८५॥
स्वदेहींच आत्मत्व ये प्रत्ययातें न सर्वत्र तैसें दिसे सत्य यातेंअसे प्राप्ति एकाच देहात्मयाची नसे सर्वथा भेटि सर्वात्मयाचीममैवांशो जीव प्रबु म्हणतसे पांडुतनयाचिदंश - ज्ञानी तो करित निजदेहीं जतन या ॥८६॥
जसे नाना भानू प्रतिघटजळीं भिन्न दिसतीअहंसत्वीं तैसे प्रतितनु चिदात्मे गवसती ॥८७॥
जया ज्योति रुपें रधी नीर - भेदे दिसे भिन्न भेटे पुन्हा ते अभेदेंआसा क्षेत्रभेदी असे वासुदेव श्रुती बोलती जाणती हें सदैव ॥८८॥
सचेतन - तनूमधें वसति चित्प्रकाश द्वयस्वरुप सचराचरीं विषय - वर्ज तें अद्वयतदंशचि चिदंग ते जग तरु फळें भक्षितीतयां जड निषेधुनी जन अपूर्ण ते लक्षिती ॥८९॥
तया जो या देहीं जड - तनु - निरासें समजलागमे त्याला झालें अधिगत परब्रम्ह मजलापुसेना कीं ब्रम्ह श्रुति म्हणति सर्वत्र वसतेंमला काया - ऐक्यें जडतनुचमध्यें गवसते ॥९०॥
तयातें तो नेणें मुख म्हणतसे जो प्रतिमुखामुखा नेणें जेविं प्रतिमुखपणें जाणत मुखामिळे सर्वात्मत्वीं मति मग न तो अंश गवसेतट स्पर्शे नीर प्रतितट न नीरीं नगवसे ॥९१॥
द्विधा चैतन्याचा अनुभव नसे तो न समजेपहाती सर्वज्ञ स्थिर - चर - जगामाजि समजेस्वकर्माचें भोगी कृतफळ गुणीं तोंवरि वसेअशेषात्म - ध्यानीं इतरपण त्याचें न गवसे ॥९२॥
जया बंध भोक्तृत्व याही भवार्ता तया लागिं मोक्षाचिही लाभ वार्ताजया रोग आरोग्य त्याला प्रसिद्ध श्रुती - प्रोक्त सिद्धांत हा क्षिप्र सिद्ध ॥९३॥
भोग यास्तवचि चित्प्रति बिंबी भेद ऐक्यहि तया निज - बिंबींब्रम्ह तें म्हणुनि जो गुरु दावी भोक्तृता तरि तया न वदावी ॥९४॥
गुरुच्या मुखें आयके ब्रम्ह कांनीं पदी दुःख त्यातें चित्वा कंटकानींतयावीण भोक्ता दुजा सांपडेना परब्रम्ह तो भोग - फांसा पडेना ॥९५॥
उक्रामंत स्थितं वा म्हणउनि हरि हा श्लोक बोले स्ववाचेकां देखे ज्ञानचक्षूकरुनि अनुभवी भोग अंशाचि वाचेज्ञानी सर्वात्मवेत्ते निजतनुच भवीं भोगितां अंश सारेसाक्षित्वें जो पहातो तुझिं इतरपणें तो पहाना कसा रे ॥९६॥
तुम्हां ब्रम्ह वाटे तथा भोग सारे दिसेना तुम्हांलागिं तोही असा रेअशा संकटें प्राकृत - ग्रंथकारीं मनीं मानिला भोग नाना प्रकारी ॥९७॥
प्रकृति माजितिचे गुण भक्षितो प्रकृतितें प्रकृतीस अपेक्षितोप्रकृतिनें प्रकृतींतचि धांवतो विविध देह म्हणूनिच पावतो ॥९८॥
म्हणे श्रुति शरीर हें रथ चिदंश आत्मा रथीइह द्विविध इंद्रियें फिरवि बुद्धि हे सारथीह्यांसम न दोर हे विषय ज्यामध्यें तोलतीतयांसहित भोक्तृता कुशळ आत्मया बोलती ॥९९॥
प्रगट करि मनीम वीशब्द येथें विचारश्रुतिविण वदणें ते सर्व वेडे विचारधरुनि निगम दीजे बोलणें युक्तिसिद्धत्रिभुवन करि त्यातें मान्य ऐसें प्रसिद्ध ॥१००॥
श्रुतितरि म्हणते कीं आत्मया भोग साचस्फुट मनन - विचारें अर्थ साधे असाचअसुखमय सुखाचा रोग हा ज्या भवार्तासुमति गणति त्याला मोक्ष - आरोग्य - वार्ता ॥१०१॥
मनासि जे भोगति भोग सारे त्यांला पुसीं मोक्ष मना कसा रेते बोलती कीं तरि कोण बुद्ध म्हणाल आत्मा तरि तें अबद्ध ॥१०२॥
जया भोग हा रोग हा बद्धवार्ता चिदंशा तया मोक्ष - आरोग्य वार्तामनांशा जयाला म्हणे चक्रपाणी विवेकाऽब्धिचें या वहू खोल पाणी ॥१०३॥
कळे निःशब्दत्वें स्फुरण उरणें कारणपणेंदिसे चित्सिंधूचें उघड जळऊर्मीत लपणेंचिदंगीं स्वांशाचें स्व - कृत - फळ - भोगीमच फिरणेंसदा तो बिंबैक्यें तरि जितचि दुःखाब्धि तरणें ॥१०४॥
चिदंश ज्ञ सर्वत्व नेणेम कदापी स्वअज्ञान शौर्य तई एकदा पीम्हणे इंद्रियाऽतीत - आत्म - स्वरुपीं नदेखों जगद्रूप कांहीं अरुपींस्वरुपीं त्या आत्मा जग सकल आकाश सुमनाप्रतीतीमध्यें त्या बुडवुनि असों नित्य सुमना ॥१०५॥
अविद्या तों गेली अजड निज सत्ताच कळलीवदे गोष्टी ऐशा चतुर परि विद्या न फळली ॥१०६॥
बुद्धीस ज्या जग दिसोनि नसे स्वरुपींसत्यत्व तीस उरलें दृढ विश्वरुपींविक्षेप - शक्ति उरलीच तिची अविद्याठावा न सर्वगत तो म्हणवे न वेद्या ॥१०७॥
नसोनी सर्वत्व स्वसुख जरि देहींच असतेंतुझें तें स्वाऽज्ञान स्वतनुभरि बोधें निरसतेंस्वदेहीं देहाचा स्व - कृत - फळ - भोक्ताच कळलाअगा ब्रम्हज्ञान - द्रुम अजुनि नाहींच फळला ॥१०८॥
इंद्रियें धरुनिही उपनेत्रें देखसी जग अगा मतिनेत्रेंत्याविणें जग दिसे न मतीतें व्योमपुष्प म्हणुही भयतीतें ॥१०९॥
रव पुष्प झालें मग विश्व सारें देहादिकें ही लटिकीं असारेंचित्सिंधु देखे न जडा तरंगी तों ते जड भ्रांतिच अंतरंगी ॥११०॥
चिदंबुत्वें पाहे स्थिर चर जडोर्मी बुडबुडेचिदब्धीमध्यें त्या जग जड समूळीं तरि बुडेतरंगाचीं रुपें जळ निवडितां व्योमसुमनेंरवपुष्पत्वें बापा मग जग पाहावें स्व सुमनें ॥१११॥
स्वांशत्वें कृष्ण बोले श्रुति - गण - सलिलीं भिन्न आत्मार्क भेदेंभोक्ता भिन्ना उपाधीप्रति म्हणतअसें अंशअंशीं अभेदेंअंशातें ज्ञानचक्षू करुनि अनुभवी भोग - काळीं पहातीभुंजानं वा म्हणोनी प्रभु म्हणत असे अंश सद्रश्मि होती ॥११२॥
गुरु दावी देहीं शरण तनुमध्येंच समजेनदेखे चित्सत्त स्थिरचर जगामाजि सम जेंकृतार्थ ज्ञानें त्या म्हणति गुरु सर्वज्ञ नकरीधनाच्या आशेनें अधन अधन - स्थान नुकरी ॥११३॥
शशी जातां अस्ता भ्रमर कुमुदामाजि गवसेतया मंदाराचा कुसुम - रसही केविं गवसेशशी जिज्ञासूचा गुरु करुनि अल्पज्ञ बुडवीसपूर्णत्वें गाजे मग जड चिदद्वैत उडवी ॥११४॥
तृप्त एक नकरी मधुपानें पुष्प हें धरियलें मधुपानेंआणिका शरण त्यासम जाया योग्य शिष्य - समता समजाया ॥११५॥
परब्रम्ह - नामें चिदंशास दावी असो ते किती भिन्न वार्त्ता वदावीनिषेधूनि देहा अहंप्रत्ययातें गुरु सांगतो ब्रम्ह तें सत्य यातें ॥११६॥
बुडविती शरणासह आपणा निखिल मानित तत्व अहंपणागुरु शिळा अप्ति गाढ गळा पडे तरि भवाऽब्धि थडी कसि सांपडे ॥११७॥
नवाटे स्व - देहात्मता सत्य यातें असें बोधुनीया अहंप्रत्ययातेंम्हणे केवळ ब्रम्ह हें सर्व सारें जडाच्या मनीं बोधतो सर्व सारे ॥११८॥
शाखा सशब्द निरसूनि शशांक दावीसत्ता स्वशब्द निरसूनि असी वदावीते आत्मता गणिति सात्विक मीपणातेंबोधें अशा म्हणविती गुरु आपणातें ॥११९॥
असो या प्रसंगांत कां दंभवार्ता जड ब्रम्ह दावी गुरु तो भवार्ताजडीं व्यापकत्व स्वशिष्यास दावी कसी पूर्ण ऐक्यार्थता ते वदावीअशब्दाच्या शब्दाविण गुरु जरी स्वाऽनुभव देअविद्या नासेना जरि जड जगीं त्यास नवदे ॥१२०॥
चिदंश - ज्ञानें त्या कसि निज - अविद्या निरसतेजड ब्रम्हाऽद्वैताविण विकळ विद्या निरस ते ॥१२१॥
दिसे सर्वा ठायीं तरिच निज चिद्वम्ह गवसेचिदात्मत्त्वें एके निजतनुमधें अंशहि वसेन तो चारी वाचा प्रकृतिहुनि तोही पर असेन देहाबाहेरी प्रतिति तनुमध्यें बहु असे ॥१२२॥
कळे ब्रम्ह तेव्हांच ते ब्रम्हविद्या अहं देह हे भावना ते अविद्यापरब्रम्ह ज्याला म्हणे वेदवाचा घडावा बरा बोध त्या वैभवाचा ॥१२३॥
सत्यज्ञान अनंत वेद म्हणती तीं लक्षणें ज्याकळेतेंचि ब्रम्ह परंतु शब्दचि तिन्हीं शब्दों न तें आकळेतेव्हां विश्व विलक्षणें विविधही हीं लक्षणें साधितीकीं मिथ्या जड अंतर्वत जग हें ऐसें गुरु बोधिती ॥१२४॥
सत्य ब्रम्ह मृषा प्रपंच परि तो सत्याविणें नाकळेज्ञानीं लक्षण हें द्वितीय गुरुच्या बोधें अहो तें कळेतेतों सर्व अनंत हें गुरु वदे यालागि ती लक्षणेंतेव्हां श्रीगुरुराज दाखवि जयीं पाहे कृपाईक्षणें ॥१२५॥
परम गुरुपदाची कीर्ति लोकीं कळायापरम - परम - बोधें दाखवी तो कळा याचरम मुख जयाचें शेषशायी हरी तोचरम - कुमत - वादा वामनात्मा हरीतो ॥१२६॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.