मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ध्यानमाळा

साहित्य

ध्यानमाळा

dhyanamala

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

भागवतात कपिल मुनींनी सांगितलेल्या ध्यानपद्धतीवर बांधलेले सोळा श्लोक. पावलांपासून सुरुवात करून वरवर जाणारे हरीच्या मूर्तीचे ध्यान — नखे, तळवे, तो चरणोदक जे शिवाने मस्तकी धरले. डोळ्यांसमोर उभे करण्यासाठी लिहिलेले वर्णन.

वंदूनियां जलधिजा - पतिच्या पदोंतेंवर्णीन त्या हरिचिया तनु संपदांतेंबोले मुनी कपिल भागवतीं स्ववाचेमानेस तेचि गुण गाइन केशवाचे ॥१॥
घ्यावें बरें हरिचिया पद - पंकजांतेंवज्यांऽकुश - ध्वज - सरोरुह अंक ज्यांतेंआरक्त वर्तुळ नखें हदयीं प्रभा तेनाशी अनादि तम सूर्य तसा प्रभाने ॥२॥
प्रक्षालिनां चरण ते शिव त्या जळालाघेनां शिरीं गरळ - दाह निवे जळालामाथां धरुनि शिवे तें शिवे नीर झालाघ्यावें असें स्मरत त्या पदनीरजाला ॥३॥
मांडीवरी चरण - सुंदर - पाद - पद्माप्रीतीकरुनि चुरिते जननी जनाचीमाता विधीचिहि वधू भव - भंजनाची ॥४॥
ज्या मांडिया खग - भुजांवरि वर्तमानाज्या सांवळ्या अनसिका - कुसुमा - समानापीतांबरावरिकटी अतिरम्यकांचीपंक्तीजिला मणि भया लघुघंटिकांची ॥५॥
नाभी र्हदीं कमळ पुत्र विरंचि ज्यांतत्रैलोक्य - उद्धव जया जगदंबुजांतविस्तीर्ण ऊरु नव - यौवन - भाव दावीज्या चिद्वनीं उगवल्या असि भावदावी ॥६॥
श्रीयुक्त त्दृत्कमळ त्या भव - मोचनाचेंजें दे मनासि सुग्व वाढवि लोचनाचेंघ्यावें चराऽचर - नमस्कृत - कंधरातेंजो कौस्तुभा मिरवितो अति कंधरातें ॥७॥
जे मंदरें मथिति बाहु सुधांबुधीनेंघ्यावें तया सकळ - वीर - सुधांबुधीनेंधारा दहाशत सुदर्शन चक्र हातींपद्मांत हंस करि शंख असा पहाती ॥८॥
कौमोदकी प्रिय गदा स्मर अंतरंगेंजे माखिली असुर - मर्दनि रक्त - रंगेंगुंजार वें करुनि सेविति भृंगमाळाकंठीं मणी जिववितो स्थिर - जंगमाला ॥९॥
झाला स्व - भृत्य - करुणेच करुनि रुपीत्याचें मुरवाञ्ज - सुख कोण जगीं निरुपीगंडस्थळीं मकर - कुंडल - मौक्तिकांचीडोळे प्रभा सरळता अति नासिकाची ॥१०॥
जी ज्यांत लुब्ध कुटिलाऽलक - भृंगजालाश्री मीन - युग्म करि ज्या वदनांबुजालासुभुमुखाज नयनाञ - युगें करुनीशोभे जळ - स्थळ - सरोरुह भा हरुनी ॥११॥
घ्यावें विशेष अवलोकन लोचनाचेंतापत्रया निवविजें भव - मोचनाचेंसस्त्रेह ज्यांत अति सुंदर हास्य मंदप्रेम - प्रसाद शुभ ज्यांत असे अमंद ॥१२॥
शोषी अशेष भव - शोक - समुद्र - वारीहांसे असा परम सुंदर दानऽवारीपीडा करी मुनि - मनांत रिघोनि कामभूमंडलें भुलवि त्यासहि पूर्ण - काम ॥१३॥
ध्यानास आश्रवअसें अतिहास्य देवेंकेलें जसे इतर नाठविजे सदैवेंआरक्त दंत अधरामृत - तेज यांतघ्यावा असा स्मरत विष्णु त्दृदंबुजांत ॥१४॥
रुपीं अशा हरिचिया जडतांचि भावप्रेमें महा उठनि सात्विक अष्टभावतो नाठवे हरिहि मानस - हंस - रुपींजाऊनियां मन बुडे निज - चित्स्वरुपीं ॥१५॥
हे ध्यानपद्धति चतुर्दश - रत्न - माळापायीं समर्पिलि तथा पुरुषोत्तमालापद्यासि पद्यचि निघे मुखिं वामनाच्यावृत्ती असोनि हरि - रुपमया मनाच्या ॥१६॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तया
— त्याला, त्या
सकळ
— सर्व

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.