मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
गीतार्णव

साहित्य

गीतार्णव

gitarnava

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

भागवत आणि भगवत्पद यांवरील रचना. ‘भगवत्तमा’ला वंदन करून, त्याच शब्दाचे पदर उलगडत कवी भागवतोत्तम कोण हे सांगतो — जे जगाला गुणांनी पाहतात ते बुध, आणि जे वास्तव भावाला पोहोचले ते भागवत.

प्रथम वंदुनियां भगवत्तमा मग तदात्मक भागवतोत्तमाअनुभवें भगवत्पद देखिलें कथिन जें मनिं वासन रेखिलें ॥१॥
मन रमे भगवत्पदलक्षणीं पुरुष तो पुरुषोत्तम - लक्षणीजग जगत्पति एकचि होतसे परम भागवतोत्तम हो तसे ॥२॥
पाहती जगचि हें गुण सा जे त्या बुधांस भगवत्पण साजेपावले भजत वास्तव - भावा त्यांस भागवत त्यास्तव भावा ॥३॥
ऐश्वर्ये ज्ञान पाहे जगचि तरि अहो तेंचि वैराग्य आहेधर्माची मूर्ति ही हें प्रभु - यशहि तई विश्व होवूनि राहेमावा गंगाच वाहे स्थिर चर अवघें श्रीहरीतेंचि साहेहें जाणे तो न मोहे क्रमविहित गुण स्वामिचे सा न मोहे ॥४॥
ऐश्वर्य - सामर्थ्य - गुणें सुजाणा ज्ञानत्व - बोधेंचि विराग जाणाविरागहेतूस्तव धर्म - सिद्धी धर्मे यश श्री असि हे प्रसिद्धी ॥५॥
म्हणे कृष्ण पार्था अलंकार हेमीं धरीतों तसे सर्वही लोक हे मीनगीं तें न तो त्या सुवर्णी असेना पहातां असी सर्वही भूत - सेना ॥६॥
ऐश्वर्य हें सर्वहि येरितीचें पाहें असें वाक्य जगत्पतीचेंगीर्तित जो दे गुरु - राज विद्या अध्याय तो यास्तव राजविद्या ॥७॥
हा विश्व - सर्प म्या दोरें व्यापिला स्व - अमूर्तिनेंसर्व भूतें मजमधें त्या सर्पी दोर मी नसेंतोही न मज रज्जूंन पाहे हे युक्ति ऐश्वरीभूतीं नसोनि धरितों कीं माझी बुद्धि कल्पिते ॥९॥
पाहें माजीं शतशतें रुपें पार्था सहस्त्रशानानाप्रकारिचीं दिव्यें जे नाना वर्ण आकृती ॥१०॥
ऐश्वर्य - युक्तचि म्हणे जग सर्व पाहेहें पाहणें परम अद्भुत मत्कृपा हेचिच्छक्ति मी मजवरी जड विश्वरुपेंमद्वुद्धि दाखवि असा गुण विश्वरुपें ॥११॥
हा ज्ञाननाम गुण दाखवि विश्व - रुपींस्थाणुत्व जेविं नर कल्पितसे स्वरुपींसर्वज्ञता तरिच कीं स्वयमेव सारेंगीतेंत येचरिति सर्वहि गुत्द्य सारें ॥१२॥
एवं प्रपंच अवघा लटिकाच झालावैराग्य हें सहज नित्य अधोक्षजालाकां श्रुक्ति - बोध रजतीं अनुराग दावीवैराग्य विश्व - रचनाच तई वदावी ॥१३॥
मी अलिप्त रचुनी रचना ही कीं मला तदभिलाषचि नाहींहा विरागगुण पांडुसुतातें वर्णिला कमल - संभव - तातें ॥१४॥
कर्मे न लिंपती मातें कीं न कर्म - फलीं स्पृहामातें जाणे असा तोही बद्ध कर्मी नव्हे कधीं ॥१५॥
अधर्म तो जो करि बंधनासी तो धर्म कीं जो भव - बंध नासीकरुनि स्रुष्ट्यादिकहि विरागी धर्मिष्ठ तो भक्त जनाऽनुरागीसत्कर्म आणि समता सदयत्व - रीतीहा मुख्य धर्म निगम स्फुट हें करीतीवैषम्य - निर्दयपणाविण लोक सारेझाला स्वयें जगचि धर्महि तो असा रे ॥१७॥
बरें कर्म जें तें यशोरुप दावी जगत्कल्पना कीर्ति ही हे वदावीम्हणे अर्जुना विश्व - ऐश्वर्य पाहें करी कीर्तिही सूचऊनी कृपा हे ॥१८॥
घडेना तें केलें जड जग तसें आणि गवसेवसे ऐसें चित्तीं अनुभव जया नित्य नवसेमनीं होती तों ती अभिनव गमे कीर्ति परमारमाकांताची ते मग निज - यशोरुपचि रमा ॥१९॥
यश - श्री - निमित्तें धनश्री - व्ययातें करीती भरीती यशा अव्ययातेंजगत्कीर्तिची श्रीच हें विश्व सारें असारें जगीं होति ती सर्व सारें ॥२०॥
एका वाइट एक ते प्रिय दुज्या वाटे बरी श्रीच तेएवं सृष्टि समस्त मायिकहि जे श्रीहोवुनी संचतेविश्वातें धरितो रमेसहि धरी विश्वंभर श्रीधरद्यूतालागिंहि जो विभूति म्हणतो गीतेंत बिंबाधर ॥२१॥
अपरा कार्यरुपा हे मूळप्रकृति ते पराचिदंशें जीव जे झाले जाणिजे तें जिणें जग ॥२२॥
श्रीच हें जग म्हणूनि रमा ते ईश - बुद्धि - सदनांतचि मातेजींत विश्व धरि त्या स्वमतीतें ठाव त्दृत्कमल तोचि सतीतें ॥२३॥
भूतीं नसोनि धरितों कीं माझी बुद्धि कल्पितेया गीतावचने विश्व त्दृदयींच रमातसी ॥२४॥
आत्मशब्दें बुद्धि जेथें भावना विश्व - कल्पनाबुद्धि माझी मजमधें कल्पिते जग अर्थ हा ॥२५॥
अहो बुद्धि चिच्छक्ति सर्वेश्वराची जगत्कल्पना युक्तिजे श्रीवराचीजसें विश्व बुद्धींत तैसी रमा ते मतीच्या स्थळीं श्री त्दृहञ्जांत मातेआपणा सुतपणें उपजाया स्त्री वरी पति म्हणे तिस जायाजींत जीवपण ते पर माया स्त्री करी जसि वधूच रमाया ॥२७॥
एवं अविद्यांशगुणेंचि माया जीवांचिया होय मती रमायातिला खरेंसे जग पाहिजेतें सहुद्धिनें षड्गुण पाहवें तें ॥२८॥
विश्वरुप परि षङ्गुण दावी कीं असी भजन - भक्ति वदावीआत्मवित् परम भक्त असा रे अन्य निर्गुण - उपासक सारे ॥२९॥
अध्याय हे धरियले मनिं याच भावेंपार्थे मुकुंद - निकटत्व - गुण - प्रभावेंते द्वादशी द्विविधही भजणार साचेजाणूनि घे कवळ भक्ति - सुधा - रसाचे ॥३०॥
कळोनि स्व - आत्मत्व - निर्धार साचा तदाधार या पङ्गुणाच्या रसाचाजगत् भाव पाहे सुखी तोचि जाणा वदे येरिती कृष्ण पार्था सुजाणाभजे निर्गुणातेंचि तो कष्ट भारी अहो पावतो हें वंदे कैठभारीनिजीं निर्गुणीं षङ्गुणी विश्व पाहे बहू आवडे भक्ति त्या विश्वपा हे ॥३२॥
अनायासें सार प्रभुगुण पहा सावध असाअसाध्या अव्यक्तासचि धरुनि आत्मज्ञ रमतीमनी त्यांच्या क्लेशें उपरमति वेगें न शमती ॥३३॥
निर्गुणत्व पहिलें समजावें षङ्गुणत्व मग हें उमजावेंभक्तिनें जरि असेंचि भजावें कष्टल्याविण श्रुभाश्रुभ जावें ॥३४॥
पहातां जगीं षडुणाचाच पावा मनामाजि आवेश त्याचाच यावाअहो बोलतों स्वानुभूतीच हे मी भरे तावितां अग्नि संपूर्ण हेमीं ॥३५॥
ऐश्वर्य ऐश्वर्य असेंच दावी कीं स्वानुभूतीच तसी वदावीहें ज्ञान जें ज्ञान - उपासकांही कीं जाणणे तों नउरेच काहीं ॥३६॥
वैराग्य वैराग्य असेंच दावी कीं जागरीं स्वप्न - कथा वदावीम्हणे प्रपंचास अधोक्ष जागा तो कां स्मरे स्वप्निक - भोग जागा ॥३७॥
वैराग्य दे यास असीच ठेवी कीं विश्व वैराग्य करुनि ठेवीइच्छी न जो मुक्तिहि वीतरागी जो भक्त वैकुंठ - पदाऽनुरागी ॥३८॥
जे सर्वसाम्यें करुणाच वाटे न चित्त चाले विषमत्ववाटेध्यातां जगीं धर्म जगत्मयाचा होतो वरा त्याहूनि धर्म त्याचा ॥३९॥
कर्मानुरुपें फळ ईश याजी तैंही म्हणे हा मजला नयो जीन ब्रम्ह - रुद्रादि - पदीं असोसी कीं दुःख दातृत्व न चित्त सोसी ॥४०॥
सर्वैद्रियीं मिरवि कीर्तिस याच वाटेकीं - विश्व - विश्वकर कीर्तिच याचवाटेसप्रेम गाय अवतार - पवित्र वार्ताकर्णामृतें निववि अन्यजना भवार्ता ॥४१॥
अनुभवि मनिं आत्मा श्रुक्ति तो विश्व रुपेंमनचि त्दृदय त्यांत श्रीच हे विश्वरुपेंनर - सुर - विधि - लक्ष्मी जो तदंशी न मोजीभव - विभव - विरक्ता स्वात्मभक्ता नमो जी ॥४२॥
बुद्धीस निर्गुण दिसे अपरोक्ष साचेंजें इंद्रिया विदित तें जग सार साचेंप्रत्यक्ष निर्गुणिच येरिति लोक सारेपाहे स्वयें न भगवान् हरि तो कसा रे ॥४३॥
दिसे भास हा निर्गुणोपासकाला करीतो जरी अन्वयें ब्रम्ह - कालामृषा भासही षङ्गुणत्वेंचि पाहे तरे शीघ्र हा ज्यास मोठी कृपा हे ॥४४॥
भवार्णवीं यास मुकुंद तारी कृपानिधी जो विविधावतारीतेतों तरों पाहति साधनानें साधी धनें वैश्य जसा धनानें ॥४५॥
तो ज्ञान होतो सगुणा उपेक्षी हा बोध आत्माच बहू अपेक्षीवर्णूनि दोघां स्वउपासकांही तारीन त्याला नम्हणेंच कांहीं ॥४६॥
कर्मे समर्पुनि समस्त उपासनाहीअद्वैत अन्य मजवांचुनि वास नाहींमी थोर एक निज - तारक ज्यांस वाटेतारीन त्यांस भव - सागरि पायवाटे ॥४७॥
असा द्वादशाध्याय येथें हरी तो किरीटीचिया संशयातें हरीतोबहू क्लेश आधीं तयाला वदोनी स्वभक्तां असे बोलतो श्लोक दोनीमातेंचि मानुनी थोर कर्मे सर्व समर्पितीतरी अद्वैतयोगेंची मातें ध्याती उपासिती ॥४९॥
ऐसीं चित्तें मजमधें त्यांचा मी भव - सागरींपार्था नलावितां वेळ होतों केवळ तारक ॥५०॥
नबोले असें निर्गुणोपासकाला तिहीं विश्व केलें जर्ही ब्रम्हकालाजयांला न हा तारक श्रीश वाटे स्वयत्नेंचि ते धांवती मोक्षवाटे ॥५१॥
न टीका असी निर्गुणोपासकांची अशा पक्कअर्थापुढें होय कांचीन आत्मज्ञ ते भक्त यालागिं देवा स्वकर्मे म्हणे अर्पिता वासुदेवा ॥५२॥
हे आत्मवेत्ते न जई गणावे ज्ञात्याहुनी थोर कसे म्हणावेकीं सप्तमाध्याय - विरोध होतो ज्ञानी म्हणे थोर हरी अहो तो ॥५३॥
याकारणें ज्ञानगुणें समान देवूनियां यास्तव त्यास मानहे थोर त्याहीहुनि बोलताहे कीं भक्तिची शीघ्र फळे लता हे ॥५४॥
हरी बोलिला येस्थळीं अर्थवादा असें बोलती एकते व्यर्थ वादामत - प्राप्त - युक्तीस जाणे हरी तो असे तर्क अध्याय - अंती हरी तो ॥५५॥
बोलिल्याच परी हें जे धर्म्यामृत उपासितीश्रद्धाळू थोर मी ज्यांला भक्त ते बहु मत्प्रिय ॥५६॥
जसें बोलिलों अर्जुना याचरीती असी षङ्गुणीपासना जे करीतीबहू प्रीति त्यांची मला श्रीहरी तो म्हणे अर्थवादत्व येथें हरीतो ॥५७॥
जे श्रद्दधान भजतीलचि याप्रकारेंहे श्रद्दधान करिती स्तव शास्त्रकारेंकृष्णेंचि योजुनि दुज्यां स्वउपासकांचीअश्रद्दधानमति सूचविलीच कांची ॥५८॥
यथोक्तशद्धावरि अर्थवादा कोठें उरे हो अवकाश वादाढीकामुखीं हा परिहार सारा असो वदावें किति त्या असारा ॥५९॥
उपासना हे भव - रोग - मात्रा ढांकूनियां निर्गुण - तत्वमात्राउपासिती क्लेश तयांस भारी होती म्हणे हे स्फुट कैठ भारी ॥६०॥
येथें दिसे विषमता त्रिजगत्पतीतेंतेही तसेंच परिसा समता - गतीतेंकल्पद्रुमें जसिच कल्पित कल्पना हीदेवूनि अर्थचि तयास विकल्प नाहीं ॥६१॥
सम मी सकळां भूतीं न द्वेषी मज न प्रियपरि जे भजती प्रेमें मी त्यांत मजमाजि जे ॥६२॥
ये यथार्माप्रपद्यंते तांस्त थैव भजाम्यहंहेंही गीतेंतचि वदे यासि वैषम्य हो कसें ॥६३॥
जे जसे भजति त्यांस तसा रे मी भजें मज समानचि सारेयागुणेंचि कमलोद्भव - तातें होइजे सुलभ भागवतातें ॥६४॥
ऐश्वर्य जे ध्याति तयांस देव स्व - अंश तो दे प्रभु वासुदेवअनीश्वरत्वा मग ठाव नाहीं अनीश हे नेणति भावनाहीं ॥६५॥
कष्टी अधिक ते होती अव्यक्तीं चित्त योजितांअव्यक्तगति ते देहीं दुःखें पावति यास्तव ॥६६॥
जरी निर्गुणीं बुद्धि योजूनि घाली न ऐश्वर्य - शक्ती स्वचित्तीं निघालीनव्हे ईश तो देह धारीच साचा नये स्वाद श्रद्धामृताच्या रसाचा ॥६७॥
म्हणे त्यास देही हरी याच भावें असे भक्त तो ईश्वरत्व - प्रभावेंजरी निर्गुणाभ्यास दोघां समान स्वभक्तां जसा दे न दे त्यांस मान ॥६८॥
यागुणेंचि म्हणतो निजभक्तां होय तारक अरे अविभक्तांकीं तयांत विभ - शक्ति निघाली निर्गुणीच मन आणुनि घाली ॥६९॥
बोधमात्रचि जयासहि आगळा ईश - भक्त म्हणती अजागळाविश्व ईश्वर असें कसें कळे पावले न तरि काय हो कळे ॥७०॥
सर्वाकृती कल्पुनि ईश आहे नजाणतां हे विषयाग्नि आहेतो बोधही पूर्ण कसा म्हणावा जीहीं उगा भासचि हा गणावा ॥७१॥
जों आपणा प्रभु न कल्पिल विश्वरुपेंतों केविं श्रुक्तिचवरी जड विश्व रुपेंपाषाण - गर्भ - कठिणत्व जनेंद्रियांसीठावे न कल्पक वदा तरि कोण यासी ॥७२॥
ईशास जों ज्ञानगुणें भजेना तों ज्ञान तें छिद्रचि जें विजेनायालागिं याला बहु कष्ट भारी म्हणूनि बोले प्रभु कैठभारी ॥७३॥
उगेंचि मिथ्या जग हें पहाती वैराग्य दे आणुनि ताप हातींवैराग्यशक्ती प्रभुते भजेना वैराग्यता दाभण लाभ जेना ॥७४॥
जेव्हां विवेक - बळ तेचघडी विरागीचित्त क्षणाउपरि त्या विषयानुरागींतें नावरे म्हणुनि त्यासचि कष्ट भारीयालागिं होति म्हणतो मधुकैठभारी ॥७५॥
वैराग्य षङ्गुणपणीं कळलें जयालामाझें तया श्रम घडे न मनोजयालागीतेमधेंच हरि सूचवितो स्ववाचाश्लोक प्रमाण अजि मागति तेचि वाचा ॥७६॥
कर्मे न लिंपती मातें कीं न कर्मफलीं स्पृहामातें जाणे असा तोही बद्ध कर्मी नव्हे कधीं ॥७७॥
स्पृहा - अभावें स्व - विराग दावी हे शक्ति सांशाक्तिमधें वदावीमी यागुणें कर्म - विमुक्त साच ऐशा मला लक्षिल तो तसाच ॥७८॥
ऐश्वर्य - शक्ति नव मी स्फुट दाखवीलीहे शक्तिची जसि फलश्रुति हे वदावीऐश्वर्य बोधफळ तेंच तयास दावी ॥७९॥
म्हणे कृष्ण ऐश्वर्य युक्तीस पाहें पहातांचि होणार ऐसी कृपा हेअसें पाहणारांत भूतें न भूतीं असे तो न तीं त्यांत हे स्वानुभूती ॥८०॥
सगुणसा अपरोक्ष भजे असें तरि तदशचि देतचि तो असेनभजतां सगुणा मन नावरे विवश कर्ण धराविण नाव रे ॥८१॥
जे पाहती स्थिरचरात्मक हा पसारापूर्वोक्त धर्म भगवद्गुणरुप साराते धर्म टाकितिहि अन्य तरी सदेवांविघ्नें तयां करवती न कदापि देवां ॥८२॥
एका मातें शरण ये सर्व - धर्मास टांकुनीसंचितें क्रियमाणें हीं मी नाशीन भिवूं नको ॥८३॥
एकीं अनेक जग त्या मज वासुदेवाएका अशा शरण येशिल देव - देवाटांकूनि अन्य - सुर - धर्म तधीं भयातेंहे मांडितील नव्हतां क्रतुलाभ यांतें ॥८४॥
विघ्नें जरी करिति इंद्रिय - देव - सेनामी रक्षणार तुज धाक कधीं असेनाकीं पातकें सकळ कर्ममयें असारेंनाशीन मी भिवुं नको निज - बोध - सारें ॥८५॥
हे गोड गोष्टि सहजें जसि चाखवीलीजरी टांकिले धर्म सर्वा सुरांचे ऋतू - कामधेनूचिया वासुरांचेभजे विश्वधर्मात्मका वासुदेवा मनीं देखतां उद्भवे त्रास देवां ॥८६॥
न हा लाभ त्यां निर्गुणोपासकांला करीती जरी अन्वयें ब्रम्हकालाम्हणूनीच ते पावती कष्ट भारी असें अर्जुनानें वदे कैठभारी ॥८७॥
निर्दयत्व विषमत्व असेना निर्मिली असि चराचर सेनाविष्णुधर्म जन हा अवलोकीं तो दयाळु सम मानव लोकी ॥८८॥
कृपेचा जो सिंधू निखिल - जनबंधू अधिपतीतयाचा जो धर्म स्थिरचर जया सर्व जपतीतयां सर्वा भूतीं सहज करुणा पूर्ण उकळीउठे कीं अंशत्वें हरिच दिसतो त्यास सकळीं ॥८९॥
उगा सर्वभूतीं परब्रम्ह पाहे तयाहूनि तो थोर ज्याला कृपा हेस्वटुःखासुखातुल्य जो सर्व - भूतीं कृपाळू प्रभूचीच होतां विभूती ॥९०॥
सर्वभूतीं स्वदृष्टांतें जो पाहे मज अर्जुनासुखा दुःखासही योगी तो थोर मज संमत ॥९१॥
जगाच्या पटाची धरुनी दसोडी जगद्वस्त्ररुपास तंतूस सोडीहिसे साधनें पावतो व्यर्थ कंषा न तो लाधतो वासुदेवानुकंपा ॥९२॥
कीर्तन श्रवण विष्णु - यशाचें नाशितें भजन विघ्नपिशाचेंआत्मता कळलिया यशरुपें विश्व - श्रुक्तिवरि त्या जड रुपें ॥९३॥
ते आत्मता कळलिया श्रवणादिरीतीटांकूनि निर्गुणचि एक अहो धरीतीतें चित्त होवुनि न वश्यहि कष्ट भारीक्लेशी तयांस म्हणतो मधु - कैठभारी ॥९४॥
श्री जे चराचर नदीच अगाध वाहेतारुं तिचा भजति त्याप्रति माधवा हेयालागिं मी त्वरित भागवतांस तारींऐसें म्हणे हरिच वृष्णिकुलावरारी ॥९५॥
मी देव माझी त्रिगुणा हे माया तरवे न जेमातेंचि जे भजनि ते मायेतें तरताति या ॥९६॥
मायानदीच्या प्रभुतारका या उपेक्षुनी पाहति विश्वकायाते पावती यास्तव कष्ट भारी गीतेंत बोले प्रभु कैठभारी ॥९७॥
विहित - भजन - मूळें यत्न भक्तांजनाहीश्रम तरि म्हणतो कां श्री महाराज नाहींवदतिल तरि ऐका प्रश्न सद्भाव योजीअधिकतर तयां हा शब्दही देव यो जी ॥९८॥
बहुत अधिक त्यांला लागती कष्ट भारीअधिकतर म्हणूनी बोलतो कैठभारीनधरिति भवसिंधूमाजि ते कास याचीधरितिल तरि चिंता त्यांसही कासयाची ॥९९॥
पडति उभयवर्गी पोहणी तत्समानेंतरि गिरिधर तारुं तें स्व - बोधाऽभिमानेंबहुत अधिक त्यांला यास्तव क्लेश भारीम्हणवुनि म्हणतो जी ये स्थळीं कैठभारी ॥१००॥
ब्रम्हीं ब्रम्हत्व वाटे सगुणपण असें द्वैत तेथें न वाटेमाया - संकल्प फाटे स्थिर - चर लटिकें होवुनी हीन दाटेअज्ञानाचेच कांटे वरि परि फणसीं षङ्गुणाचेच सांटेजो अव्यक्तींच आटे सुख - फळ परि तें साधितां ऊर फाटे ॥१०१॥
असी काढी गीता मथुनि हरि गीतार्णव सुधासुधारा हे गंगा करु अमृत - संतृप्त वसुधासुधा ब्रम्हांडीं हा सुपथ रचिला वामनपणींजगाच्या उद्धारा हरि करितसे षङ्गुणपणीं ॥१०२॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
वैराग्य
— आसक्ती सुटणे
मातें
— मला
पार्था
— पृथा म्हणजे कुंतीचा पुत्र — अर्जुन
माया
— भासमान करणारी शक्ती
एवं
— अशा प्रकारे
अर्जुना
— अर्जुन — संबोधन
ऐसें
— असे
पुरुष
— चैतन्यतत्त्व, जाणणारा
माजीं
— मध्ये, आत
वरी
— वर; शिवाय
अद्वैत
— दोन नसणे — जीव आणि ब्रह्म एकच
परिसा
— ऐका
तया
— त्याला, त्या
घडे
— घडते, शक्य होते
तुज
— तुला
सकळ
— सर्व
सहजें
— सहजपणे, आपोआप

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.