मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
कंसवध

साहित्य

कंसवध

kansavadha

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

कंसवधाचा प्रसंग, चोवीस श्लोकांत. शुकाचार्यांनी एकाच श्लोकात सांगितलेली गोष्ट रसज्ञांनी अनेक अर्थांनी उलगडावी — म्हणून नवरसांचा उल्लेख करून कवी सुरुवात करतो. रंगशाळेच्या दारातला हत्ती आणि मल्लरंगातला मुकुंद.

नवरसें भवरोग - रसायनेंकरि हरी करिती मुनि गायनेंकिमपि कंसवधीं रस देखिलेकथिन जे मनिंवामनिं रेखिले ॥१॥
रंगाचिया दारवटांचि हस्तीमारुनि घे साऽग्रज दंत हस्तींदेहीं गजाचे मद - रक्त बिंदूतो मल्लरगांत मुकुंद वंदूं ॥२॥
भिन्न भिन्न मतिच्या अवलोकींदेखिला कस कसा रस लोकींश्लोक एकचि वदे शुक रायाजे रसज्ञ तिहिं अर्थ कराया ॥३॥
मल्लां वज्र गमे नरा नृप गमे काम स्वयें स्त्रीजनागौळ्यां आप्त नृपां खळां प्रभू शिशू माता - पित्यांच्या मनाकंसा मृत्यु अशक्त पामरजनां संतांसि तत्त्वाऽमृतश्रीशेषासन यादवां हरि दिसे रंगांत रामाऽन्वित ॥४॥
दे मल्लां रस रौद्र अद्भुत नरां श्रृंगार नारी - जनांगौळ्यां हास्य नृपांस वीर करुणा मातापित्याच्या मनाकंसा लागिं भयानकाऽख्य रस दे बीभत्स मूढां भ्रमेसंतां शांत रस स्वभक्ति रस तो दे यादवां या क्रमें ॥५॥
नव - रस हरि दावी यांत मल्लादि - दृष्टीकरि दशम रसाची यादवांमाजि वृष्टीरस दश कथिले जे ज्याक्रमें श्रीश्रुकानेंहरिगुण - रस तैसे घ्या मुखें आणि कानें ॥६॥
दहा रस श्री शुक बोलिला होत्यांचा क्रमें घ्या श्रवणादि लाहोरसीं प्रति श्लोक - रसाऽव लोकीगुणाऽमृत - प्राशन मृत्युलोकीं ॥७॥
वधुनि दाखवटांचि महाकरीउभय दंत सहाग्रज घे करींगज वधूनि मृगांत जसा हरीत्वरित मल्लदळांत निघे हरी ॥८॥
रंगांऽगणीं लक्षुनि कैट भारीवज्राहुनी मानिति मल्ल भारीऐशा हरी रौद्ररसाशि दावीकया - रसाची रुचि हे वदावी ॥९॥
भोजराज विगतप्रभ झालाश्रीपती नृप गमे मनुजांलादाखवी सुरस अद्भुत लोकींकीं असें जन मला अवलोकी ॥१०॥
संगांग - श्रृंगाररसास नेत्रींकीं रंग दाऊनि कुरंग नेत्रींअनंगरंगांऽबुधिच्या तरंगींरंगीं करी व्याकुळ अंतरंगी ॥११॥
शरीर रक्तांकित दंत हस्तींयेतो कसा डोलत मत्त हस्तीह्नणोनी जे हांसति सख्य भावेंगोपाळ हा हास्य रस स्वभावें ॥१२॥
घेऊनियां याच नृपाऽसनातेंकरील आह्मां वरि शासनातेंवाटे असें दुःख नृपांसि भारीवीराऽख्य दावी रस कैठभारी ॥१३॥
कृष्ण हा परम देवदेव कींहें स्मरे न वसुदेव देवकीलेंकरुं ह्नणुनि वर्षती दयादाखवी हरि दया - रसोदया ॥१४॥
कृष्ण हीन - बळ बाळ लेंकरुंमल्ल मारितिल काय मी करुंयेरिती करिति खेद दंपतीफुंदती रडति आणि कांपती ॥१५॥
द्विरद दंत जसे उपडूनि घेरस भयानक कंसमनीं निघेमनीं ह्नणे निमिषें वधिला करीमजहि मारिल यावरि लौकरी ॥१६॥
अनंत - शक्तीसहि अज्ञ - लोकींअशक्त मानूनि कृपाऽवलोकींनिरुपिला खेद बहू प्रकारेंबीभत्स केला रस निर्विकारें ॥१७॥
श्रीमूर्ति देखूनि महा - विभूतीसंतां गमे स्वात्मसुखाऽनुभूतीते देखती शांत निज स्वरुपींदावी हरी शांतरस स्वरुपीं ॥१८॥
नव रस कवि गाती हेचि वर्णूनि जातीनिज चरित - रसीं त्या दाखवी दिव्यजानीदशम रस अनन्य प्रेमभक्तीस लोकींयदुपति हरि तो दे यादवां स्वाद लोकीं ॥१९॥
विना शेष शायी जनां यादवांलानसे देव ते देखती माधवालागमे राम तो शेष हा शेषशायीस्व पायीं तया दे रस प्रेमदायी ॥२०॥
इष्ट दैवत अभीष्ट अशेषेंदे जनां प्रिय हितेंचि विशेंषेंयादवां स्वसुख कल्पतरुचेंप्रेम हें सहज आदिगुरुचें ॥२१॥
इष्ट सर्वहि अभीष्ट असेनाकृष्णरुप सचराचर - सेनावामनास सकळात्मक - लाहोकीर्त्तनप्रिय असा कळला हो ॥२२॥
सविजे प्रिय मुकुंद उगा होकीर्त्तनीं अजि तयासिच गाहोया झणी सुख ह्नणाल जगा होहे मृगांबु ठकणार मृगां हो ॥२३॥
टीकाकार जसे क्रमें रस दहा हें बोलिलें श्रीधरेंश्लोकींचे रस त्या क्रमें कथियले हे वामनें सादरेंते येती कवणे - रिती अनुभवा तो भाव यां प्राकृतांश्लोकीं आणि पदीं असा अवघिया आधार जो संस्कृता ॥२४॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तया
— त्याला, त्या

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.